- स्नान करताना लघवी करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
- आंघोळ करताना स्नान करणं हे काही आजारांचे संकेत असू शकतात.
- एका निरोगी व्यक्तीने दिवसातून सहा ते आठ वेळा लघवी करणं सामान्य मानले जाते.
Peeing Or Urinating During Bath: शरीर स्वच्छ आणि सक्रिय राहावे, यासाठी रोज स्नान करणं आवश्यक आहे. काही लोकांना स्नान करताना लघवी येते. बहुतांश वेळेस लोक या सवयीकडे दुर्लक्ष करतात, पण तुमची ही सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. स्नान करताना लघवी का करू नये? स्नान करताना लघवी येणे ही कोणत्या आजारांची लक्षणं असू शकतात? हे तुम्हाला माहितीये का...युरो-गायनेकोलॉजिस्ट डॉ. टेरेसा इरविन यांच्या मते उभे राहून लघवी केल्यास मूत्राशय योग्यरित्या रिकामं होतं, पण शॉवरखाली आंघोळ करताना तुमच्या मेंदूला वाहत्या पाण्याचा आवाज ऐकू येताच लघवी होते.
स्नान करताना लघवी का करू नये?
आरोग्यतज्ज्ञांच्या माहितीनुसार, स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्नान करताना लघवी करू नये, असे सांगितलं जातं. लघवीतील बॅक्टेरिया आणि अमोनियामुळे बाथरुममधील दुर्गंध तसेच संसर्गामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा (UTI) धोका वाढू शकतो. वाहत्या पाण्याखाली आंघोळ करताना लघवी करणं मोठी गोष्ट नाही, असे अनेकांना वाटतं. पण सामान्य वाटणाऱ्या या गोष्टीमुळे शरीराच्या काही महत्त्वपूर्ण कार्यांवर दुष्परिणाम होऊ शकतात.
आंघोळ करताना लघवी येणे हे कोणत्या आजारांचे संकेत असू शकतात?
आंघोळ करताना लघवी येणे ही एक सामान्य शारीरिक प्रक्रिया आहे. पण वारंवार लघवी होणे तसेच लघवी रोखणे शक्य होत नसेल तर ओटीपोटीचा भाग कमकुवत असणे, मूत्राशय पूर्णपणे रिकामे न होणे, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन UTI), ओव्हरअॅक्टिव्ह ब्लॅडर किंवा मूत्राशय आणि किडनीशी संबंधित समस्याचं संकेत असू शकतात. यामुळे संसर्गाचा धोका अधिक वाढू शकतो.
(नक्की वाचा: Toilet Dual Flush Benefits: टॉयलेट सीटवर 2 फ्लश बटण का असतात? 99% लोक त्याचा योग्य वापर करत नाहीत, वाचा माहिती)
एक दिवसात किती वेळा लघवी होणे सामान्य मानले जाते?साधारणतः एका निरोगी व्यक्तीने दिवसभरात सहा ते आठ वेळा लघवी करणं सामान्य मानले जाते, पण चार ते 10 वेळा लघवी होणेही सामान्य बाब आहे. तुमचे आरोग्य आणि तुम्ही किती प्रमाणात द्रवयुक्त पदार्थांचे सेवन करता, यावर सर्वकाही अवलंबून आहे.
(नक्की वाचा: Morning Routine for Weight Loss: वेट लॉससाठी रोज सकाळी करा या 6 गोष्टी, काही दिवसांतच व्हाल सडपातळ)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

