जाहिरात

Toilet Dual Flush Benefits: टॉयलेट सीटवर 2 फ्लश बटण का असतात? 99% लोक त्याचा योग्य वापर करत नाहीत, वाचा माहिती

Toilet Dual Flush Benefits: टॉयलेटमधील फ्लश टँकवर दोन बटण असतात, एक छोटे आणि एक मोठे. दोन्ही बटण दिसायला सामान्य वाटत असले तरीही याचा वापर कसा करावा, याबाबत फार कमी लोकांना माहिती आहे.

Toilet Dual Flush Benefits: टॉयलेट सीटवर 2 फ्लश बटण का असतात? 99% लोक त्याचा योग्य वापर करत नाहीत, वाचा माहिती
"Toilet Dual Flush Benefits: टॉयलेट सीटवर दोन फ्लश बटण का असतात?"
File Photo

Toilet Dual Flush Benefits: बाथरूम हा आपल्या दिनचर्येचा महत्त्वपूर्ण भाग आहे. सकाळी उठल्यानंतर असो किंवा रात्री झोपण्यापूर्वी प्रत्येकाला शौचालयाचा वापर करावा लागतो. पूर्वीच्या तुलनेत आता बहुतांश घरांमध्ये पाश्चिमात्य शौचालय बांधण्यावर भर दिला जातोय. गुडघ्यांची समस्या असलेल्या लोकांसह घरातील वृद्ध मंडळींकरिता पाश्चात्य शौचालय अधिक सोयीचं ठरतंय. वेस्टर्न टॉयलेट फ्लश टँकवर एक छोटे आणि एक मोठे असे दोन बटण असतात. पण या बटणांचा वापर कसा करावा? याची माहिती फारच कमी लोकांना आहे.  

टॉयलेट सीटवर दोन फ्लश बटण का असतात? | Why Do Toilets Have Two Flush Buttons

आधुनिक पद्धतीच्या या शौचालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या या प्रणालीस 'ड्युअल-फ्लश सिस्टम' (How To Use Dual Flush Toilet) असे म्हणतात. या प्रणालीमध्ये एक लहान आणि एक मोठ्या बटणाचा समावेश असतो. लहान बटण दाबवल्यास अंदाजे तीन ते साडेचार लिटर पाणी वापरले जाते, द्रवरुपी कचरा, लघवी यासारख्या गोष्टींसाठी छोट्या बटणाचा वापर केला जातो, ज्यामुळे पाण्याची बचत होते. मोठे बटण दाबल्यास जास्त प्रमाणात पाण्याचा वापर होतो, याद्वारे अंदाजे सहा लिटर पाणी वापरले जाते. हा फ्लश घनकचरा स्वच्छ करण्यासाठी वापरला जातो. तसेच पाण्याच्या जलद प्रवाहामुळे कमोडची स्वच्छताही चांगली होते. आवश्यकतेनुसार योग्य प्रमाणात पाणी वापरणे आणि अनावश्यक पाण्याचा अपव्यय रोखणे, या उद्देशानुसार बटणांचा वापर करावा. 

(नक्की वाचा: Morning Routine for Weight Loss: वेट लॉससाठी रोज सकाळी करा या 6 गोष्टी, काही दिवसांतच व्हाल सडपातळ)

दोन्ही बटणांचा वापर करताना होणारी सामान्य चूक

बहुतांश लोकांना दोन्ही बटणांबाबतची माहिती नसल्याने एकाच वेळेस दोन्ही बटण दाबले जातात. यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. शिवाय यामुळे सिस्टमवरही अनावश्यक ताण पडू शकतो.

Malasana Benefits: रोज मलासनाचा सराव केल्यास काय होतं? मलासनात किती वेळ बसावे? योगगुरूंनी दिली मोठी माहिती

(नक्की वाचा: Malasana Benefits: रोज मलासनाचा सराव केल्यास काय होतं? मलासनात किती वेळ बसावे? योगगुरूंनी दिली मोठी माहिती)

टॉयलेट फ्लश टँक का आणि कसे स्वच्छ करावे?

टॉयलेट फ्लश टँक स्वच्छ करण्याकडे बहुतांश लोक दुर्लक्ष करतात. टँकमध्ये बहुतांश वेळेस घाण, जड पाणी, सिलिकॉनची धूळ, बुरशी यासारख्या गोष्टी जमा होऊ शकतात. शिवाय या गोष्टींमुळे फ्लश देखील व्यवस्थित काम करत नाही. फ्लश सिस्टम योग्य पद्धतीने सुरू राहावी, यासाठी महिन्यातून एक टँक स्वच्छ करणं आवश्यक आहे. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com