
How To Clean Intestines At Home: आरोग्य निरोगी राहावे, अशी इच्छा असेल तर आपल्या शरीराच्या आतड्या स्वच्छ असणे अतिशय आवश्यक आहे. शरीराच्या आतील भागामध्ये असणाऱ्या आतड्या केवळ पचनप्रक्रियेचा मुख्य भाग नसून अन्य शारीरिक क्रिया नियंत्रित ठेवण्यामध्येही महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. पण बऱ्याचदा चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या वाईट सवयींमुळे आतड्यांमध्ये घाण जमा होऊ लागते, यामुळे पचनसंस्थेचे कार्य कमकुवत होऊ लागते. पोट आणि आतड्यांमध्ये जमा होणाऱ्या दुर्गंधीकडे आपण बऱ्याचदा दुर्लक्ष करतो. यामुळे अपचन, बद्धकोष्ठता, पोट फुगणे, आम्लपित्त, पोटदुखी यासारख्या समस्या निर्माण होतात; या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी लोक पोट स्वच्छ करण्याचे मार्ग शोधू लागतात. तोवर कोणालाही जाग येत नाही. पोट स्वच्छ नसेल तर संपूर्ण शरीराचे आरोग्य बिघडते, हे लक्षात ठेवा.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आतड्यांमध्ये कोणत्या कारणांमुळे घाण जमा होऊ लागते आणि या समस्येपासून सुटका कशी मिळवावी, यामागील कारणे तसेच उपाय जाणून घेऊया...
आतड्यांमध्ये घाण जमा होण्यामागील पाच प्रमुख कारणे (Five Big Reason Why Dirt Gets Accumulated In The Intestine)
फायबरची कमतरता : आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थांच्या कमतरतेमुळे शौचास कठीण होते, ज्यामुळे आतड्यांमध्ये घाण जमा होऊ लागते.
पाण्याची कमतरता : शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे पचनप्रक्रिया धीम्या गतीने होऊ लागते, यामुळेही आतड्यांमध्ये घाण जमा होऊ शकते.
प्रक्रिया केलेले आणि तिखट पदार्थ : जास्त तेलकट, तिखट पदार्थांचे सेवन केल्यास अन्नाचे पचन होण्यास अडथळे निर्माण होतात.
व्यायाम न करणे : नियमित व्यायाम न केल्यास आतड्यांची हालचाल मंदावते.
दीर्घकालीन बद्धकोष्ठतेचा त्रास : बद्धकोष्ठतेमुळेही शौचास कठीण होते. यामुळेही आतडे स्वच्छ होत नाहीत.
(नक्की वाचा: Clove Benefits: महिनाभर रिकाम्या पोटी लवंग चावून खा, कल्पनाही केली नसेल इतके मिळतील चमत्कारिक लाभ)
आतड्यांची स्वच्छ करण्यासाठी रामबाणी उपाय (Effective Tips To Clean The Intestine)
1. लिंबू-मधाचे पाणी
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबू आणि एक चमचा मध मिक्स करुन प्यावे. यामुळे आतड्यांची स्वच्छता होण्यास मदत मिळू शकते. लिंबातील 'व्हिटॅमिन सी'मुळे शरीरातील विषारी घटक सहजरित्या शरीराबाहेर फेकले जातील आणि मधामुळे पचनप्रक्रियेचे कार्य सुधारेल.
2. फायबरयुक्त आहार
डाएटमध्ये फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा. उदाहरणार्थ फळे, हिरव्या भाज्या, अख्खे कडधान्य, डाळी इत्यादी. फायबरमुळे पचनसंस्थेचे कार्य सुधारते आणि शौचासही त्रास होत नाही.
3. त्रिफळा चूर्ण
आयुर्वेदिक उपचारांमध्ये त्रिफळा चूर्ण अतिशय रामबाण उपाय मानले जाते. रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यामध्ये त्रिफळा चूर्ण मिक्स करा आणि प्या. यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण सहजरित्या बाहेर फेकली जाते.
(नक्की वाचा: पोट स्वच्छ होत नाही? दह्यात ही गोष्ट मिक्स करुन खा, आतड्यांच्या प्रत्येक कोपऱ्यातून घाण येईल बाहेर)
4. गरम पाणी प्यावे
दिवसभरात पुरेशा प्रमाणात गरम पाणी प्यावे. यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि आतड्यांमधील विषारी तत्त्व बाहेर फेकले जातील.
5. दही आणि अन्य प्रोबायोटिक्स
आहारामध्ये प्रोबायोटिक्सयुक्त पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश करावा. उदाहरणार्थ दही, ताक यामुळे आतड्यांमध्ये चांगल्या जंतूंची निर्मिती होण्यास मदत मिळते. या बॅक्टेरियांमुळे पचनप्रक्रिया सुधारते आणि विषारी घटक शरीराबाहेर फेकले जातात.
6. योग आणि व्यायाम
नियमित योगासने किंवा सोप्या स्वरुपातील व्यायाम 30 मिनिटांसाठी करावा. आतड्यांच्या आरोग्यासाठी सूर्य नमस्काराचा सराव करणे फायदेशीर ठरू शकते.
7. अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त पेय
ग्रीन टी आणि अॅलोव्हेरा ज्युसमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास आणि आतड्यांमधील जमा झालेली घाण स्वच्छ होण्यास मदत मिळू शकते.
दैनंदिन जीवनामध्ये हे उपाय केल्यास आतड्यांमधील घाण स्वच्छ होण्याव्यतिरिक्त संपूर्ण आरोग्यावर याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world