जाहिरात

Clove Eating Benefits: रात्री लवंग खाऊन झोपल्यास काय होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या योग्य पद्धत आणि फायदे

Clove Eating Benefits: लवंग खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. रात्री झोपण्यापूर्वी लवंग खाल्ल्यास आरोग्यावर कोणते परिणाम होतात, जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती...

Clove Eating Benefits: रात्री लवंग खाऊन झोपल्यास काय होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या योग्य पद्धत आणि फायदे
"Clove Eating Benefits: रात्री झोपण्यापूर्वी लवंग खाल्ल्यास काय होते?"

Clove Eating Benefits: गरम मसाल्यातील लवंग बहुतांश खाद्यपदार्थांमध्ये वापरली जाते. लवंगमुळे जेवणाची चव वाढते आणि आरोग्यासही अगणित लाभ मिळतात. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी लवंग खाल्ल्यास शरीरामध्ये सकारात्मक बदल घडतील. अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर एरिक बर्ग यांनी लवंग खाण्याचे (Clove Benefits) फायदे सांगितले आहेत, जाणून घेऊया माहिती. 

लवंग खाण्याबाबत काय म्हणाले डॉक्टर? | Cloves Benefits In Marathi

डॉक्टर बर्ग यांनी त्यांच्या यु-ट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलंय की, छोटीशी लवंग खाल्ल्यास आरोग्यामध्ये मोठे बदल अनुभवायला मिळती. रात्री झोपण्यापूर्वी लवंग खाणे किंवा लवंगाचे पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. 

रात्री लवंग खाणे किंवा लवंगाचे पाणी पिण्याचे फायदे | Cloves Water Benefits In Marathi

1. पचनप्रक्रिया सुधारेल

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार झोपण्यापूर्वी लवंग खाल्ल्यास किंवा लवंगाचे पाणी प्यायल्यास अपचन आणि पोट फुगणे यासारख्या समस्या कमी होतील. 

2. चांगली झोप येईल

लवंगमध्ये अशा काही नैसर्गिक तत्त्वांचा समावेश आहे, ज्यामुळे तणाव कमी होऊन मेंदू शांत होण्यास मदत मिळते आणि झोप चांगली येईल.   

3. यकृत डिटॉक्स होईल

लवंगातील औषधी गुणधर्मामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर सहजरित्या फेकले जाण्यास मदत मिळेल. रात्री झोपण्यापूर्वी लवंग खाल्ल्यास लिव्हर डिटॉक्स होण्यास मदत मिळेल. 

4. सर्दी-खोकला दूर होईल 

डॉक्टर बर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवंगाची प्रकृती उष्ण आहे आणि यातील अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्मामुळे घशातील खवखव, खोकला-सर्दी, कफच्या समस्येतून सुटका मिळेल. 

Cardamom And Clove Benefits: रोज वेलची-लवंग एकत्र खाल्ल्यास काय होईल? या 4 लोकांच्या आयुष्यात होईल मोठा बदल

(नक्की वाचा: Cardamom And Clove Benefits: रोज वेलची-लवंग एकत्र खाल्ल्यास काय होईल? या 4 लोकांच्या आयुष्यात होईल मोठा बदल)

5. दात आणि हिरड्यांसाठी फायदेशीर

रात्री झोपण्यापूर्वी लवंग चावून खाल्ल्यास तोंडाला येणारा दुर्गंध कमी होईल. तसेच तोंडाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल. विशेषतः दात दुखीपासून आराम मिळू शकतो.

(नक्की वाचा: Lemon and Clove Remedy: लवंग आणि लिंबू एकत्र खाल्ल्यास काय होते? डॉक्टरांनुसार फक्त 3 दिवसांत शरीरात दिसेल मोठा फरक)

6. हृदय आणि रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारेल 

लवंगाचे पाणी प्यायल्यास शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारेल आणि यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल. 

7. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होईल 

लवंगमधील अँटी-मायक्रोबिअल गुणधर्मामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळेल. 

लवंगाचे पाणी कस तयार करावे? 

  1. चार ते पाच लवंग एक कप पाण्यात उकळा. 
  2. उकळ आल्यानंतर पाच मिनिटे गॅसच्या मध्यम आचेवर पाणी गरम करावे.  
  3. गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्यावे.  
  4. लवंगाचे पाणी तयार झाल्यानंतर जवळपास एक तासानंतर पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय.
  5. झोपण्यापूर्वी 30 मिनिटे आधी लवंगाचे पाणी प्यावे. यामुळे काही दिवसांत शरीरामध्ये सकारात्मक बदल जाणवतील.  
  6. मर्यादित स्वरुपातच लवंगाचे पाणी प्यावे, असाही सल्ला डॉक्टर बर्ग यांनी दिलाय. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com