
शरद सातपुते, सांगली: भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यामध्ये जोरदार जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. जयंत पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि माझ्याविरोधात पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांना थेट आव्हान दिले होते. पडळकर यांच्या या आव्हानावरुन आता जयंत पाटील यांनी जोरदार पलटवार केला आहे.
काय म्हणाले जयंत पाटील?
"माझा प्रॉब्लेम काय आहे. मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही? पण मुद्दा काय आहे, वोट चोरी झाली तिथे राजीनामा द्या आणि परत निवडणुका घ्या. आता हे महिनाभर चालेल. समाजामध्ये असेही काही लोक लागतात. जे निंदा करतात. अलीकडे मी ही अशी लोक तयार करू लागलो आहे. अशी टीका जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली आहे. ते सांगलीमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन परिषदमध्ये बोलत होते.
Manoj Jarange Patil Maratha Morcha : मराठा आंदोलनादरम्यान हळहळ! आणखी एका मराठा बांधवाचा मृत्यू
या देशांमध्ये अलीकडे मोठा प्रॉब्लेम झाला आहे. वाचाळविरांची फार संख्या वाढली आहे. वरिष्ठ यांच्याकडे कधी बघणार. हा जिल्हा ब्रिटिशांना घाबरलेला नसलेला आहे. यांचं काय घेऊन बसलाय, सर्व जातीवर प्रेम करा. पण समाजामध्ये भेद करू नका. हा जिल्हा जसा डोक्यावर घेतो तसा पायाखाली घेतो, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
दरम्यान, "या सरकारने ही सत्ता कशी मिळवली. वोट चोरीने ही सत्ता मिळवली. लोकशाही वर घाला घालणाऱ्याना आपण किती पोसायचं आणि त्याचा विचार आपण केला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला तुमच्या माझ्या मताचा अधिकार दिला त्याला सुरुंग लावण्याचं काम यांनी केले. या देशात कोणाला खड्ड्यात घालायचा आणि कोणाला वर काढायचं या पाठीमागे एक शक्ती काम करू लागले. या देशात उपराष्ट्रपती गायब होऊ शकतो. तुम्ही आम्ही किस झाड की पत्ती?" असेही पाटील म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world