दात-हिरड्या निरोगी नाहीत? येऊ शकतो हार्ट अटॅक, या वाईट सवयी ठरतील तुमच्या हृदयासाठी घातक

Oral Health: तोंडाच्या आरोग्याची नियमित व योग्य पद्धत देखभाल केल्यास कित्येक गंभीर आजारांपासून आरोग्याचे संरक्षण होते, हे तुम्हाला माहीत आहे का? अन्यथा हृदयविकारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.

जाहिरात
Read Time: 3 mins
Heart attack symptoms: दातांच्या आरोग्यावर मिळतात हृदयविकारांचे संकेत

Oral Health Problem : दातांची योग्य पद्धतीने स्वच्छता न केल्यास दातांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. उदाहरणार्थ दात किडणे, दातांमध्ये पोकळी निर्माण होणे, दात दुखणे आणि तोंडाला दुर्गंधी येणे यासारख्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. तसेच तुमच्या तोंडाचे आरोग्य (Oral Health) निरोगी नसेल तर याचा थेट परिणाम हृदयावर होऊ शकतो, हे तुम्हाला माहिती आहे का? कारण तोंडाचे आरोग्य थेट हृदयाच्या आरोग्याशी जोडलेले असते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे ज्यांचे दात व तोंडाचे आरोग्य निरोगी नसेलत, तर अशा लोकांना हृदयविकारांचा धोका अधिक असतो. दातांमुळे येणारा हृदयविकार झटका कसा ओळखावा?

याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया. जेणेकरून वेळीच या समस्यांवर औषधोपचार करण्यास तुम्हाला मदत मिळू शकेल.   

दातांच्या आरोग्यामुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका, जाणून घ्या लक्षणे (Heart Attack Symptoms On Teeth) 

जर दात आणि हिरड्या निरोगी नसतील, तर तुमच्या हृदयाशी जोडलेल्या मज्जातंतूमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. हृदयविकार  (Heart Disease) आणि हृदयविकाराचा झटका यासारख्या समस्या उद्भवण्याचे हे प्रमुख लक्षण मानले जाते. हृदयाशी जोडलेली नस बंद झाली झाल्यानंतर तुम्हाला सलग काही महिने दातांच्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.  

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हृदयविकाराचा झटका येण्याच्या काही महिन्यांपूर्वीच आपल्या शरीरामध्ये अनेक बदल होऊ लागतात. हृदयविकाराचा झटका येण्याची काही महत्त्वाची लक्षणे दात व जबड्याच्या आरोग्यावरही दिसू लागतात.

Advertisement

Photo Credit: iStock

दातदुखी 

दात व जबड्यामध्ये तीव्र वेदना होणे, हे देखील हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. त्यामुळे महिनोंमहिने असलेले दाताचे दुखणे जबड्याच्या भागातही जाणवू लागल्यास तातडीने डॉक्टरांना संपर्क करावा. 

दात-तोंड स्वच्छ न करता झोपणे

काही जणांना झोपताना आईस्क्रीम, गोड पदार्थ खाण्याची किंवा चहा, कॉफी, दूध पिण्याची सवय असते. पण काही खाल्ल्यानंतर अथवा प्यायल्यानंतर तोंड स्वच्छ न केल्यास यामुळे दातांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात.  

Photo Credit: iStock

दातांचा अयोग्य वापरआहारातील साखरेचे प्रमाण नखे चावणे

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

आणखी वाचा

ग्राहक झालेत फिटनेस फ्रीक, नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये देशी-परदेशी फळांच्या मागणीत वाढ 

Summer Health Tips: सावधान! उन्हाळ्यात बाटलीबंद थंड पाणी पिताय?

Reverse Walk Benefits: उलट्या पावली चालण्याचे 5 फायदे

Topics mentioned in this article