उन्हाळा आणि शरद ऋतूमध्ये बाजारात विविध प्रकारची फळे विकायला असतात. भारतात जवळपास प्रत्येकाला आंबा, लिची हे फळ आवडत. मात्र या हंगामात एक फळ असंही आहे जे वर्षभर मिळत नाही तर केवळ दोन महिनेच बाजारात उपलब्ध होतात. मात्र याचा आरोग्याला मोठा फायदा होतो. म्हणूनच आरोग्य तज्ज्ञ त्या हंगामात हे फळ खाण्याचा सल्ला देतात.
या फळामध्ये अनेक आवश्यक पोषक तत्वे, अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक संयुगे असतात, जे शरीराला असंख्य फायदे देऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, जर याचं मर्यादित प्रमाणात सेवन केलं तर त्याचा शरीराचा चांगला फायदा होतो. वैद्यकीय अहवालानुसार, हे फळ रक्तातील साखर नियंत्रित करतं. पचनक्रिया सुधारते आणि यकृत निरोगी ठेवण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी उपयुक्त मानलं जातं. दोन महिने बाजारात उपलब्ध होणारं हे फळ कोणतं आहे?
कोणतं फळ फक्त दोन महिने बाजारात उपलब्ध असते?
जांभूळ हे एक हंगामी फळ आहे जे वर्षभर उपलब्ध नसतं. जांभूळ केवळ दोन महिने बाजारात उपलब्ध असतात. त्यामुळे, डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञ त्याच्या हंगामात खाण्याचा सल्ला देतात. अहवालानुसार, जांभळामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम, लोह आणि अँथोसायनिन यांसारखी अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात. ही पोषक तत्वे शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करतात. शिवाय, जांभळामधील नैसर्गिक घटक रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी, पचनसंस्था सुधारण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी देखील उपयुक्त मानलं जातं. जांभळामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे ते पचन सुधारण्यास आणि पोट स्वच्छ ठेवण्यास देखील मदत करू शकते. म्हणूनच अनेक तज्ज्ञ पावसाळ्यात जांभूळ मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला देतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world