जाहिरात

एका दिवसात किती चपात्या खाव्यात? Weight Loss दरम्यान चपाती खावी की नाही? एक्सपर्ट काय सांगतात...

एका चपातीत किती कॅलरीज असतात, तूप लावल्यानंतर चपातीत किती कॅलरीज वाढतात आणि तुमचं वय, वजन आणि दैनंदिन हालचालीनुसार दररोज किती चपात्या खायल्या हव्यात असे अनेक प्रश्न उपस्थित राहतात. 

एका दिवसात किती चपात्या खाव्यात? Weight Loss दरम्यान चपाती खावी की नाही? एक्सपर्ट काय सांगतात...
NDTV

एका साधारण आकाराच्या (४० ग्रॅम) गव्हाच्या चपातीत तब्बल ११०-१२० कॅलरीज असतात. मात्र चपातीचा आकार, त्यातील तूप-तेलाच्या वापरातील कॅलरीच कमी-जास्त होऊ शकतात. याच कारणामुळे वजन कमी करणारे, मधुमेही किंवा फिटनेसकडे लक्ष देणाऱ्यांसमोर अनेकदा हा प्रश्न उपस्थित राहतो की, एका दिवसात किती चपात्या खायला हव्यात किंवा चपाती खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का?

भारतात चपाती सर्वाधिक प्रमाणात खाल्लं जातं. हा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, फायबर आणि अनेक आवश्यक पोषक तत्त्वांचा चांगला स्त्रोत मानला जातो. अशात एका चपातीत किती कॅलरीज असतात, तूप लावल्यानंतर चपातीत किती कॅलरीज वाढतात आणि तुमचं वय, वजन आणि दैनंदिन हालचालीनुसार दररोज किती चपात्या खायल्या हव्यात असे अनेक प्रश्न उपस्थित राहतात. 

एका गव्हाच्या चपातीत किती कॅलरीज असतात?

न्यूट्रिशनलिस्ट डॉ. दीप्ति खटूजा यांनी सांगितलं की, गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या एका साधारण आकाराच्या चपातीत (४० ग्रॅम) १२० कॅलरीज असतात. चपातीच्या आकारानुसार कॅलरीजमध्ये बदल होऊ शकतो. 

अर्धी मध्यम चपाती (20 ग्राम): 60 कॅलरी 
छोटी चपाती (32 ग्राम): 96 कॅलरी
मध्यम आकाराची चपाती (40 ग्राम): 120 कॅलरी
मोठी चपाती (52 ग्राम): 156 कॅलरी
दोन मध्यम आकाराच्या चपात्या(80 ग्राम): 240 कॅलरी
तीन मध्यम चपात्या (120 ग्राम): 360 कॅलरी

यानुसार, १०० ग्रॅमनुसार, चपातीतून साधारण ३०० कॅलरीज मिळतात. 

पोषक मूल्य
कॅलरीज - ७०–११० 
कर्बोदके - १४–२२ ग्रॅम
प्रथिने - २.५–४ ग्रॅम
फॅट - ०.५–१ ग्रॅम
फायबर - २–२.५ ग्रॅम
साखर - ०–०.५ ग्रॅम
लोह - ०.८–१ मिलिग्रॅम
मॅग्नेशियम -  २०–३५ मिलिग्रॅम

चपाती खाण्याचे फायदे...

  • शरीराला ऊर्जा देणारे कॉम्प्लेक्स कार्ब्स मिळतात. 
  • फायबर पचन चांगलं करण्यास मदत करतं
  • बराच काळ पोट भरलेलं राहतं
  • डाळ, भाजी किंवा पनीरसह खाल्ल्याने संतुलित आहार मिळतो.
  • गव्हाच्या पिठाच्या चपातीत बी-विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. 

जर तुम्ही चपातीला एक चमचा तूप लावत असाल तर यामध्ये ४० ते ४५ कॅलरीज वाढतात. 

नक्की वाचा - अमिताभ बच्चन यांना कोण-कोणते आजार? 83 व्या वर्षीही भयानक आरोग्याच्या समस्या

एका दिवसात किती चपात्या खाव्यात?

तुमच्या शरीराला किती कॅलरीजची आवश्यकता आहे, यावरुन तुम्ही किती चपात्या खाव्यात हे अवलंबून असतं. तुमचं वय, लिंग, उंची, वजन, शारिरीक हालचाल, आरोग्य यावर अवलंबून असतं. दीप्ति खटूजा यांच्यानुसार, एक स्वस्थ व्यक्ती प्रत्येक आहारात २ ते ४ मध्यम आकाराच्या चपात्या खाऊ शकतो. याचा अर्थ तुमच्या गरजेनुसार, तुम्ही एका दिवसात ६ ते १२ चपात्या खाऊ शकतात. मात्र यासोबत भरपूर भाजी, प्रथिनं आणि हेल्दी फॅटची आवश्यकता असते. 

चपाती खाण्याचे फायदे...

  • चपातीत कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेस असतं, ज्यामुळे हळूहळू एनर्जी मिळते. यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा राहते.  
  • गव्हाची चपाती डाएटरी फायबरचा एक चांगला स्त्रोत आहे. यामुळे पचन सुधारते. 
  • जर चपाती खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते अशी चिंता वाटत असेल, तर चपातीतील फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्ब्स रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करू शकतात.
संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com