जाहिरात
Story ProgressBack

घरात किती ठेवू शकता रोखरक्कम? जाणून घ्या नियम अन्यथा आयकर विभाग टाकेल धाड

Cash Rules: आयकर विभाग, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ किंवा सीबीडीटी आणि अंमलबजावणी संचालनालय यासारख्या सरकारी एजन्सी काळा पैसा लपवून ठेवणाऱ्या लोकांवर नजर ठेवून असतात.

Read Time: 2 mins
घरात किती ठेवू शकता रोखरक्कम? जाणून घ्या नियम अन्यथा आयकर विभाग टाकेल धाड

कोरोना महामारीनंतर नागरिक आर्थिक व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्यावर मोठ्या प्रमाणात भर देत आहेत. पण काही मंडळी आजही रोखरक्कमेच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करणं पसंत करतात. म्हणूनच काही लोक संपूर्ण महिन्याचा खर्च चालवण्यासाठी एटीएममधून एकाच वेळेस पैसे काढतात. तर दुसरीकडे आजही कित्येक महिला पैशांची बचत करण्यासाठी बँकेचा नव्हे तर धान्याच्या डब्याचा अथवा कपाटाचा वापर करतात. पण घरामध्ये रोखरक्कम ठेवण्याबाबत आयकर विभागाचे नियम तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घेऊया सविस्तर...

(नक्की वाचा: ATM मधून पैसे काढण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार?)

घरामध्ये किती रक्कम ठेवू शकता? 

तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्हाला हवे तितक्या प्रमाणात पैसे ठेवू शकता. यावर कोणतेही बंदी नाही. पण आता तुमच्या मनात हा प्रश्न डोकावत असेल की घरामध्ये मर्यादेपेक्षा जास्त रोकड ठेवली तर आयकर विभाग नोटीस पाठवते का? तर या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. पण एखादी व्यक्ती आयकर विभागाच्या कचाट्यात आली तर घरात असलेल्या रक्कमेचा स्त्रोत काय आहे? याचं स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. 

जमा केलेल्या रक्कमेचे वैध स्त्रोत कागदपत्रे दाखवणे बंधनकारक  

आयकर विभागाच्या (Income Tax) नियमानुसार,  घरामध्ये ठेवण्यात आलेल्या पैशांचा वैध स्त्रोत तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कागदपत्रे सादर करावी लागतील. म्हणजेच तुम्ही चुकीच्या मार्गाने पैसे कमावले नसतील तर काळजी करण्याची आवश्यकता नाही. पैसे कुठून आले हे दाखवण्यासाठी तुमच्याकडे संपूर्ण कागदपत्रे असली पाहिजेत.

(नक्की वाचा: भारतीय वायू सेनेमध्ये नोकरीची मोठी संधी! पगार, परीक्षा व ऑनलाइन अर्जाची वाचा सविस्तर माहिती)

योग्य माहिती न दिल्यास वाढू शकतात अडचणी  

घरात ठेवलेल्या रोखरक्कमेचा अचून हिशेब न दिल्यास तपास यंत्रणेकडून मोठा दंड ठोठावला जाऊ शकतो. नोटाबंदीनंतर आयकर विभागाच्या नियमांनुसार जर तपासादरम्यान तुमच्याकडे अघोषित रोकड आढळली तर जप्त केलेल्या रकमेनुसार 137 टक्क्यांपर्यंत कर आकारला जाऊ शकतो.

कर चुकवल्यास जप्त होऊ शकतो जमा केलेला पैसा 

आयकर विभाग, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ किंवा सीबीडीटी आणि अंमलबजावणी संचालनालय या सारख्या सरकारी एजन्सी काळा पैसा लपवून ठेवलेल्या लोकांवर नजर ठेवून असतात. अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीकडे जमा केलेल्या रोखरक्कमेचा तपशील आयटीआरमध्ये व्यवस्थित नमूद केला नसेल तर संबंधित रक्कम जप्त केली जाऊ शकतो. 

अतिशय महत्त्वाची गोष्ट

नियमांनुसार, बँकेतून एकाच वेळेस 50 हजार रुपयांहून अधिक रक्कम काढल्यास अथवा जमा केल्यास पॅन कार्ड दाखवणे बंधनकारक आहे. खरेदी करतानाही तुम्ही 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रोखरक्कम देऊ शकत नाही. तुम्ही 2 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची खरेदी रोखीने करत असल्यास पॅन आणि आधार कार्डची प्रत द्यावी लागेल.

Daily ATM Withdrawal Limits | ATM मधून पैसे काढण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
भारतीय वायू सेनेमध्ये नोकरीची मोठी संधी! पगार, परीक्षा व ऑनलाइन अर्जाची वाचा सविस्तर माहिती
घरात किती ठेवू शकता रोखरक्कम? जाणून घ्या नियम अन्यथा आयकर विभाग टाकेल धाड
Vat Purnima 2024 Date muhurat rituals significance details
Next Article
Vat Purnima 2024: आज वटपौर्णिमा? जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त आणि वैशिष्ट्य
;