जाहिरात

Railway Job: रेल्वेत 'लोको पायलट' कसं बनायचं? जाणून घ्या पात्रता, पगारही लाखांच्या घरात

Railway Job: भारतीय रेल्वेमध्ये 'लोको पायलट' बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी असू शकते. लोको पायलट पदासाठी निवड प्रक्रिया आणि पगार याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Railway Job: रेल्वेत 'लोको पायलट' कसं बनायचं? जाणून घ्या पात्रता, पगारही लाखांच्या घरात

Railway Job: भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यांपैकी एक आहे आणि लाखो तरुणांचे स्वप्न या विभागात नोकरी करण्याचे असते. रेल्वेमधील सर्वात जबाबदारीचे आणि आकर्षणाचे पद म्हणजे 'लोको पायलट' (ट्रेन ड्रायव्हर). जर तुम्हालाही ट्रेन चालवण्याची ओढ असेल, तर त्यासाठी नेमकी काय तयारी करावी लागते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

लोको पायलटसाठी आवश्यक पात्रता

लोको पायलट होण्यासाठी केवळ पदवी असून चालत नाही, तर तांत्रिक ज्ञानाची जोड असणे आवश्यक आहे. उमेदवाराने  10 वी उत्तीर्ण केल्यानंतर संबंधित ट्रेडमध्ये (फिटर/इलेक्ट्रिशियन/मेकॅनिक इ.) ITI पूर्ण केलेला असावा. किंवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा डिग्री असणे अनिवार्य आहे.

वयोमर्यादा आणि वैद्यकीय पात्रता

या पदासाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे (राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार सवलत मिळते) आहे. तसेच तुमची दृष्टी 6/6 असणे अत्यंत आवश्यक आहे. लोको पायलटसाठी कोणत्याही प्रकारचे कलर ब्लाइंडनेस चालत नाही.

(नक्की वाचा- US-Iran War : इराणची नवी खेळी! होर्मुजमधून जहाज वाहतूक सुरू होणार, मात्र भारतासह अनेक देशांना फटका बसणार)

निवड प्रक्रिया कशी असते? 

  • CBT-1: प्राथमिक संगणक आधारित परीक्षा.
  • CBT-2: मुख्य परीक्षा, ज्यात तांत्रिक विषयांचा समावेश असतो.
  • CBAT: कलचाचणी (Aptitude Test).
  • कागदपत्र पडताळणी: डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सखोल वैद्यकीय चाचणी.

पदोन्नती कशी होते?

रेल्वेमध्ये कोणालाही थेट एक्स्प्रेस ट्रेन चालवायला दिली जात नाही. हा प्रवास टप्प्याटप्प्याने होतो.

  • असिस्टंट लोको पायलट (ALP): सुरुवातीला साहाय्यक म्हणून काम करावे लागते.
  • लोको पायलट (Goods): मालगाडी चालवण्याचा अनुभव दिला जातो.
  • लोको पायलट (Passenger/Express): अनुभवानंतर प्रवासी आणि एक्स्प्रेस गाड्यांची जबाबदारी मिळते.

(नक्की वाचा- Oil India: इंधन संकटादरम्यान राजस्थानातून गुड न्यूज! वाळवंटातून निघालं 'काळं सोनं)

पगार आणि इतर सवलती

लोको पायलटला मिळणारा पगार हा त्यांच्या अनुभवावर आणि श्रेणीवर अवलंबून असतो. असिस्टंट लोको पायलट 25 ते ३35 हजार रुपये,  लोको पायलटला (Goods) 40 ते 60 हजार रुपये, लोको पायलटला (Express) 60 ते 90+ हजार रुपये प्रति महिना पगार असतो. पगाराव्यतिरिक्त घरभाडे भत्ता (HRA), महागाई भत्ता (DA), ओव्हरटाइम भत्ता, मोफत रेल्वे पास आणि वैद्यकीय सुविधा हे देखील मिळते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com