जाहिरात

Kitchen Tips: तांबे-पितळेची भांडी या पाण्याने चमकतील सोन्यासारखी, शेवटपर्यंत पाहा VIDEO

Kitchen Tips : तुमच्या घरातील तांबे आणि पितळेची भांडी काही मिनिटांतच होतील स्वच्छ शिवाय हातांच्या त्वचेवरही दुष्परिणाम होणार नाहीत. जाणून घ्या रामबाण उपाय...

Kitchen Tips: तांबे-पितळेची भांडी या पाण्याने चमकतील सोन्यासारखी, शेवटपर्यंत पाहा VIDEO
Kitchen Tips : तांबे-पितळेची भांडी चमकवण्यासाठी सोपा घरगुती उपाय

Kitchen Tips In Marathi: तांबे आणि पितळेची भांडी वापरत असाल किंवा ही भांडी वापरात नसली तरीही पटकन काळी पडतात. ही भांडी स्वच्छ करण्यासाठी बहुंताश लोक पिंताबरी किंवा बाजारामध्ये मिळणारे एखादे लिक्विड किंवा साबणाचा वापर करतात. पण यामुळे हाताच्या त्वचेचे प्रचंड नुकसान होते. तुम्ही देखील या समस्येवर उपाय शोधत आहात का? चला तर मग जाणून घेऊया सोपा उपाय. तांबे-पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठीची सामग्री तुमच्या घरमध्ये उपलब्ध देखील असतील. स्टेप बाय स्टेप सर्व प्रक्रिया व्यवस्थित पाहा आणि तांबे-पितळेची भांडी झटपट स्वच्छ करा. महत्त्वाचे म्हणजे हाताच्या त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सामग्री

टोमॅटो, एक चमचा व्हिनेगर, एक चमचा मीठ आणि लिक्विड डिशवॉशर

World Health Day 2025: जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुंबई महापालिकेने मीठ-साखरेबाबत राबवले महत्त्वपूर्ण अभियान

(नक्की वाचा: World Health Day 2025: जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुंबई महापालिकेने मीठ-साखरेबाबत राबवले महत्त्वपूर्ण अभियान)

कसे तयार करायचे मिश्रण

- सर्वप्रथम तुम्ही टोमॅटो किसून घ्यावा किंवा मिक्सरमध्येही वाटून पेस्ट तयार करू शकता.
- टोमॅटो पेस्टमध्ये एक चमचा मीठ, एक चमचा व्हिनेगर आणि लिक्विड डिशवॉशर मिक्स करावे. 
- तांबे - पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठीचे मिश्रण तयार झाले आहे.

Morning Walk Benefits: उन्हाळ्यात सकाळी किती वेळ आणि कोणत्या वेळेस करावा वॉक?

(नक्की वाचा : Morning Walk Benefits: उन्हाळ्यात सकाळी किती वेळ आणि कोणत्या वेळेस करावा वॉक?)

मिश्रणाचा कसा करावा वापर?

- तयार झालेले मिश्रण भांड्यांवर लावा. 
- जोर देऊन भांडी घासण्याची आवश्यकता भासणार नाही. 
- काळी पडलेली भांडी अगदी सहजासहजी स्वच्छ होतील. 
- पिंताबरी पावडर वापरण्याची आवश्यकताही भासणार नाही. 

Video Credit @ Prajakta Salve
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: