जाहिरात

Viral Video: तांबे-पितळेची भांडी कशी स्वच्छ करावी? 3 पांढऱ्या गोष्टींची पेस्ट वापरा, सोन्यासारखी चमकतील भांडी

Kitchen Tips: पितळेच्या किंवा तांब्याच्या धातूची भांडी जास्त कष्ट न घेता पटकन स्वच्छ करण्यासाठी साधा आणि सोपा उपाय जाणून घेऊया.

Viral Video: तांबे-पितळेची भांडी कशी स्वच्छ करावी? 3 पांढऱ्या गोष्टींची पेस्ट वापरा, सोन्यासारखी चमकतील भांडी
"Viral Video: पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी टिप्स"
Canva

How To Clean Brass And Copper Utensils At Home: पूजेची भांडी किंवा स्वयंपाकासाठी तुम्ही देखील पितळेच्या किंवा तांब्याच्या धातूच्या भांड्यांचा वापर करता का? पण ही भांडी काळी पडल्यानंतर स्वच्छ करणं अतिशय कठीण ठरते, हो ना? पण आता चिंता करू नका. जास्तीचे कष्ट न घेता ही भांडी काही मिनिटांतच स्वच्छ होतील. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तांबे-पितळेची भांडी कशी स्वच्छ करायची, याबाबतची माहिती देणारा व्हिडीओ व्हायरल होतोय, जाणून घेऊया सविस्तर माहिती...  

तांबे-पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी उपाय

foodsandflavorsbyshilpi नावाच्या इन्स्टाग्रामवर हँडलवर तांबे, पितळेच्या धातूची भांडी सोप्या पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी उपाय शेअर करण्यात आलाय. घरच्या घरी लिक्विड तयार करून तुम्ही सहजरित्या भांडी पटकन स्वच्छ करू शकता. 

  • एक चमचा पांढरे मीठ
  • दोन चमचे सायट्रिक अ‍ॅसिड किंवा लिंबाचा रस 
  • एक चमचा भांडी घासण्याचे लिक्विड  
  • दोन चमचे व्हिनेगर 
  • पाणी (आवश्यकतेनुसार) 

काही मिनिटांत चमकतील काळी पडलेली भांडी

तांबे, पितळ आणि कांस्य धातूची भांडी चमकवण्यासाठी एका भांड्यामध्ये एक चमचा मीठ, दोन चमचे सायट्रिक अ‍ॅसिड किंवा लिंबाचा रस,  एक चमचा भांडी घासण्याचे लिक्विड, दोन चमचे व्हिनेगर आणि आवश्यकतेनुसार पाणी मिक्स करावे. मिश्रण तयार झाल्यानंतर भांडी स्वच्छ करून घ्या. महत्त्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला भांड्यांवर जोर देऊन रगडण्याची आवश्यकता नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

Lemon Benefits: रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यावे का, दिवसभरात किती लिंबांचं सेवन करावे, फायद्या-तोट्यांसह 18 प्रश्नांची उत्तर वाचा

(नक्की वाचा: Lemon Benefits: रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यावे का, दिवसभरात किती लिंबांचं सेवन करावे, फायद्या-तोट्यांसह 18 प्रश्नांची उत्तर वाचा)

भांडी स्वच्छ करण्यासाठीच्या अन्य पद्धती

तांबे, पितळ आणि कांस्य धातूची भांडी स्वच्छ करण्यासाठी एक छोटा चमचा बेकिंग सोड्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा. पेस्ट तयार झाल्यानंतर भांड्यावर लावून भांडी स्वच्छ करा. चिंचेच्या कोळनेही भांडी स्वच्छ होतात. 

Better Sleep Tips: रात्रभर कुस बदलत राहता, झोप येत नाही? या अवयवांवर दाब द्या, शांत आणि गाढ झोप लगेचच येईल

(नक्की वाचा: Better Sleep Tips: रात्रभर कुस बदलत राहता, झोप येत नाही? या अवयवांवर दाब द्या, शांत आणि गाढ झोप लगेचच येईल)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com