
Benefits of Walking In The Morning: उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेणे हे मोठे आव्हान असते. तापमानाचा पारा वाढू लागल्यास शारीरिक थकवा जाणवणे आणि शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होऊ लागली. उन्हाच्या तडाख्यामुळे घराबाहेर पडणंही त्रासदायक वाटू लागते. पण व्यायाम टाळून उपयोग नाही. सकाळच्या वेळेस चालण्याचा व्यायाम करणे अतिशय फायदेशीर ठरू शकते. यामुळे शरीरामध्ये दिवसभरासाठी ऊर्जा देखील टिकून राहते. पण उन्हाळ्यात चालण्याचा व्यायाम नेमके कोणते वेळेत करावा? जेणेकरून उष्माघाताचाही त्रास होणार नाही आणि आरोग्याचीही काळजी घेतली जाईल. याबाबत जाणून घेऊया सविस्तर माहिती...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सकाळी वॉक करण्याची योग्य वेळ (Right Time For Morning Walk)
उन्हाळ्याच्या दिवसांत सकाळी व्यायाम करणे सर्वाधिक फायदेशीर ठरेल. कारण यावेळेस उन्हाचा तडाखा अधिक नसतो.
सर्वोत्तम वेळ : पहाटे 5 वाजेपासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत.
यावेळेस सूर्याची किरणे प्रखर नसतात. ज्यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळेल आणि उष्माघाताचाही त्रास होणार नाही.
चालण्याचा व्यायाम किती वेळ करावा?
- जर तुम्ही चालण्याचा व्यायाम करण्यास शुभारंभ करत आहात तर सुरुवातीस 20 ते 30 मिनिटे व्यायाम करावा.
- यानंतर सराव करून हळूहळू 30 ते 60 मिनिटांपर्यंत वॉक करण्यास सुरुवात करावी.
- स्वतःच्या शारीरिक क्षमतेनुसारच व्यायाम करावा, हे कायम लक्षात ठेवावे.
उन्हाळ्यात वॉक करण्याचे फायदे
- दिवसभराच्या तुलनेत पहाटेच्या वेळेस हवेत किंचितसा गारवा असतो. त्यामुळे प्रखर सूर्यकिरणांपासून बचाव करण्यासाठी पहाटेच्या वेळेस वॉक करावा. यामुळे शरीराला ऊर्जाही मिळेल.
- सकाळच्या वेळेस वॉक केल्यास शरीराची चयापचयाची क्षमता मजबूत होईल आणि शरीरातील अतिरिक्त कॅलरीज् बर्न होण्यास मदत मिळेल. यामुळे वजन कमी होऊ शकते.
- नियमित वॉक केल्यास रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहील आणि हृदयविकाराचा धोका कमी होईल. कारण सकाळची ताजी हवा हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.
- सकाळी वॉक केल्यास तणाव कमी होऊन मानसिक शांतता लाभेल.
- शरीराची रोगप्रतिकारकशक्तीही मजबूत होईल. म्हणून सकाळी चालण्याचा व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो.
- पचनप्रक्रिया मजबूत होईल, यामुळे बद्धकोष्ठता, गॅस यासारख्या समस्यांपासून सुटका मिळू शकते.
(नक्की वाचा: पोट स्वच्छ होत नाहीय? मग प्या हे तेल, किती आणि कसे प्यावे? जाणून घ्या न्युट्रिशनिस्टने दिलेली माहिती)
या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका
- आरामदायी आणि पातळ कपडे परिधान करावे.
- पाण्याची बाटली स्वतःसोबत ठेवावी, जेणेकरून शरीर हायड्रेट राहील.
- चालण्याचा व्यायाम केल्यानंतर पचनास हलका पौष्टिक नाश्ता करावा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world