Online ITR Filing: घरबसल्या काही मिनिटांत फाइल करा इनकम टॅक्स रीटर्न , वाचा स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

Online ITR Filing: आयटीआर फाइल करण्यासाठी तुम्हाला कोणच्याही मदतीची आवश्यकता भासणार नाही. सीए किंवा तज्ज्ञाच्या मदतीशिवाय तुम्ही स्वतःच स्वतःचे आयटीआर फाइल करू शकता. कसे? वाचा सविस्त माहिती...

जाहिरात
Read Time: 2 mins

Online ITR Filing: कंपनीकडून तुम्हाला दरमहिन्याला पगार मिळतो का? या प्रश्नाचे उत्तर हो असेल तर कंपनीने तुम्हाला फॉर्म 16 देखील दिला असावा. ज्याद्वारे आयटीआर म्हणजेच इनकम टॅक्स रीटर्न फाइल करणे अतिशय सोपे ठरू शकते.   

आर्थिक वर्ष 2023-24 आणि मूल्यांकन वर्ष 2024-25साठी ITR भरण्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आयकर विभागाकडून ITR फाइल करण्यासाठी 31 जुलै 2024 ही अंतिम तारीख निश्चित केली आहे.  

घरी बसल्या आयटीआर ऑनलाइन कसा भरावा, याची माहिती आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहेत. विशेष म्हणजे तुम्हाला यासाठी कोणाच्याही मदतीची आवश्यकता भासणार नाही. सीए किंवा तज्ज्ञांच्या मदतीशिवाय तुम्ही स्वतःचा आयटीआर फाइल करू शकता.  

(नक्की वाचा: जुलै महिन्यात बँकांना 12 दिवस सुट्ट्या, महत्त्वाची कामं तातडीने करा पूर्ण)

सर्वप्रथम महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवा

ऑनलाइन ITR फाइल करण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे सबमिटी करावी लागतील.  

  • आधार कार्ड आणि पॅन कार्ड
  • बँक अकाउंट डिटेल्स
  • फॉर्म 16
  • TDS सर्टिफिकेट
  • टॅक्‍स डिडक्‍शनचा दावा करण्यासाठी गुंतवणुकीचा पुरावा
  • बँक आणि पोस्ट ऑफिस इत्यादींकडून मिळालेल्या व्याजाचा पुरावा

(नक्की वाचा: भारतातील सर्वाधिक महागडे शहर)

आयटीआर ऑनलाइन कसा फाइल करावा?

  • आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलला भेट द्या 

     https://www.incometax.gov.in/iec/foportal/

  • येथे e-Filing पोर्टलवर Login पर्यायावर क्लिक करा. 
  • आता पॅन कार्डवरील क्रमांक आणि जन्म तारीख सबमिट करा व Continue पर्यायावर क्लिक करा. 
  • आता पासवर्ड सबमिट करा आणि लॉग इन पर्यायावर क्लिक करा.  
  • ई-फाइलिंग अकाउंट लॉग इन केल्यानंतर Dashboard वर क्लिक करा 
  • येथे "e-File" > "Income Tax Return" > "File Income Tax Return" या पर्यायावर क्लिक करा.
  • रीटर्न फाइल करण्यासाठी उपलब्ध असलेल्या ITR फॉर्मची निवड करा आणि तपशील भरा.
  • येथे तुमचे उत्पन्न (Income), डिडक्शन (Deduction) आणि करपात्र उत्पन्नाचे (Taxable Income) तपशील भरा.
  • तपशील सबमिट केल्यानंतर, कर दायित्व (देय कर) (Payable Tax)  मोजले जाईल.
  • तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन टॅक्स भरू शकता.
  • आधार क्रमांक आणि ई-चिन्ह वापरून ITR रीटर्न व्हेरिफाय करू शकता.
  • काही चूक असल्यास ती दुरुस्त करून सबमिट बटणवर क्लिक करा.
  • तुमचा ITR जमा झाल्यानंतर याची पावती डाउनलोड करा आणि तुमच्या माहितीसाठी पावती सांभाळून ठेवा.
  • पावतीवरील क्रमांकाद्वारे (Acknowledgment No.) तुम्ही ITR स्टेटस ट्रॅक करू शकता. 

(नक्की वाचा : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, प्रतिलिटर मिळणार 'इतका' भाव)

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, 1 जुलैपासून नवे दर लागू; सरकारी बैठकीत काय निर्णय झाला?