जाहिरात

Akola News:अकोला सस्पेन्स वाढला ! भाजपाची कोंडी, 'नॉट रिचेबल' चा खेळ आणि महापौरपदासाठी 3 नावांची जोरदार चर्चा

Akola Municipal Election 2026:  अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता सर्वांचं लक्ष महापौरपदाच्या खुर्चीकडे लागलं आहे.

Akola News:अकोला सस्पेन्स वाढला ! भाजपाची कोंडी, 'नॉट रिचेबल' चा खेळ आणि महापौरपदासाठी 3 नावांची जोरदार चर्चा
Akola Municipal Election : अकोलाच्या महापौरपदी कोण विराजमान होणार? याचा सस्पेन्स चांगलाच वाढला आहे.
अकोला:

योगेश शिरसाट, प्रतिनिधी 

Akola Municipal Election 2026:  अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता सर्वांचं लक्ष महापौरपदाच्या खुर्चीकडे लागलं आहे. कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने फोडाफोडीचे राजकारण आणि पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे. त्यातच राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी आणि सूचक विधानांमुळे अकोल्याच्या राजकारणात मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे.

महापौरपदासाठी मोर्चेबांधणी आणि गुप्त हालचाली

अकोल्यात महापौर कोण होणार, यावरून सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे. काही नगरसेवक नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा रंगत असतानाच, भाजपचे माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अ‍ॅड. फैजान मिर्झा यांनी घेतलेली भेट चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. 

ही भेट केवळ शुभेच्छा देण्यासाठी असल्याचे सांगण्यात येत असले, तरी मिर्झा यांनी लवकरच गोड बातमी कळेल असे म्हटल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनीही जनतेला लवकरच गोड बातमी मिळेल असा दावा केल्याने महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सत्तेसाठी छुपी जुळवाजुळव सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

( नक्की वाचा : Jitendra Awhad : 'कैसा हराया'! जितेंद्र आव्हाडांच्या हातातून मुंब्रा निसटतंय? वाचा का सुरु झालीय चर्चा )

बहुमताचा आकडा आणि संख्याबळाचे चुरशीचे गणित

80 सदस्यांच्या अकोला महानगरपालिकेत बहुमतासाठी 41 हा आकडा गाठणे आवश्यक आहे. मात्र, यंदा कोणालाही निर्भेळ यश मिळालेले नाही. 

भाजप 38 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी त्यांना सत्ता स्थापनेसाठी अजून 3 नगरसेवकांची गरज आहे. काँग्रेसकडे 21, शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे 6, वंचित बहुजन आघाडीकडे 5 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 3 जागा आहेत. 

याशिवाय एमआयएमकडे 3, तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे प्रत्येकी 1 जागा आहे. 1 अपक्ष आणि 1 महानगर विकास आघाडीचा उमेदवारही रिंगणात आहे. भाजपला मागील निवडणुकीत 48 जागा मिळाल्या होत्या, मात्र यंदा त्यांचा आकडा घसरल्याने त्यांना अपक्ष किंवा छोट्या पक्षांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागणार आहे.

( नक्की वाचा : BMC Mayor: मुंबईत भाजपाचा महापौर होणार! पण, पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा ! वाचा विस्मरणातील 44 वर्ष जुना इतिहास )

आरक्षणाचा पेच आणि महापौरपदाचे संभाव्य दावेदार

सध्या सर्वांचे लक्ष महापौरपदाच्या आरक्षणाकडे लागले आहे. आतापर्यंत एकदाही अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी आरक्षण निघालेले नाही, त्यामुळे यंदा हे आरक्षण निघण्याची दाट शक्यता आहे. जर एसटी आरक्षण निघाले, तर भाजपची अडचण होऊ शकते, कारण त्यांच्याकडे या प्रवर्गाचा उमेदवार नाही. 

या स्थितीत अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार, शिवसेना शिंदे गटाच्या उषाराणी विर्क किंवा काँग्रेसच्या जया गेडाम यांच्या नावांची चर्चा होऊ शकते. विशेष म्हणजे, शहरात यंदा 25 मुस्लिम नगरसेवक निवडून आले आहेत, त्यामुळे या गटातूनही महापौरपदासाठी हालचाली सुरू आहेत. 2012 सारखाच चमत्कार होऊन एखादा अनपेक्षित चेहरा महापौरपदावर विराजमान होतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com