उन्हाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्याल?

उन्हाळ्यात पचायला हलका आणि कमी आहार घ्यावा. टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी, केळी, काकडी फळांचं सेवन वाढवावं.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

निसर्गनियमानुसार वातावरणात बदल होणं हे स्वाभाविक असतं. उन्हाळ्यात उष्णता वाढल्यानं आरोग्यविषयक अनेक समस्या डोकं वर काढत असतात. शिवाय ऋतुमानानुसार आहारशैलीत बदल केल्यास आरोग्य उत्तम ठेवण्यास तेवढीच मदत होते. यंदा मार्चमध्येच मे महिन्यातील उष्णता जाणवायला लागली आहे. उष्णता वाढली की, अनेक आजार देखील अचानक डोकं वर काढतात. अशावेळी तब्येतीची काळजी घेणे खूपच गरजेचे असतं. 

उन्हाळ्यात उष्माघात, जंतुसंसर्ग, डायरिया, कावीळ, टायफॉईड, लहान मुलांमधील जंतुसंसर्ग, गोवर, कांजण्या, गलगंड, डोळ्यांचे विकार, त्वचेचे आजार वाढण्याची शक्यता अधिक असते. उन्हाळ्यात घामाच्या रुपाने उष्णता बाहेर पडत असते. त्यामुळे शरीराच्या आतील आणि बाहेरील त्वचा कोरडी पडत असते. अशावेळी शरीराला पाण्याची अत्यंत गरज असते. यासाठी वेळोवेळी पाणी पित राहाणं गरजेचं असतं. 

उन्हाळ्यात त्वचेची कशी काळजी घ्याल?
- सूर्याच्या किरणांपासून संरक्षण करण्यासाठी चेहरा मऊ कापडाने बांधून घ्या
- त्वचेच्या डेड सेल्स वेळोवेळी काढून टाकाव्यात
- त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि फळांचं सेवन वाढवा. 
- उन्हाळ्यात दोन वेळा आंघोळ करणं फायद्याचं ठरू शकतं.
- उन्हाळ्यात चेहऱ्यावर तेल जास्त स्त्रवतं, अशावेळी सतत चेहरा धुवा. 

नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि भरपूर पाणी पिणं आदी बाबींचं पालन करणं गरजेचं असल्याचं डॉक्टरदेखील सांगत असतात. त्यामुळे उन्हाळ्यात आहारात बदल करणं आवश्यक आहे. उन्हाळ्यात पचायला हलका आणि कमी आहार घ्यावा. टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी, केळी, काकडी फळांचं सेवन वाढवावं. थंड तुपाचाही आहारात सामावेश करावा. नारळ पाणी, ऊसाचा रस, कोकम सरबत प्यायल्याने उष्णतेचा त्रास कमी जाणवेल. याशिवाय मांसाहार टाळावं आणि भरपूर पाणी प्यावं. याशिवाय उष्माघाताचा त्रास होत असलेल्या रुग्णाला जास्तीतजास्त द्रव आहार द्यावा तसेत ताप कमी होत नसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Advertisement

शरीर हायड्रेटेड ठेवा

पाण्याअभावी उन्हाळ्यात अनेकदा डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. यामुळे अनेक जण विविध आजारांना बळी पडतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला उष्णतेपासून स्वत:चा बचाव करायचा असेल, तर स्वतःला पूर्णपणे हायड्रेटेड ठेवणं आवश्यक आहे. यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणं गरजेचं आहे. याशिवाय हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन करा. याशिवाय लिंबू पाणी, लस्सी यांसारखी पेये प्या. गरज पडल्यास ORS घ्या.
 

Topics mentioned in this article