जाहिरात

Amazon Great Summer Sale मध्ये 21 हजार रुपयांनी स्वस्त मिळतोय iPhone 15, चेक करा ऑफर

Amazon Great Summer Sale : आयफोन 15 चा 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट अमेझॉनवर 59,499 रुपयांना लिस्टेड आहे. आयफोन 15 सप्टेंबर 2023 मध्ये 79,900 रुपयांना लाँच करण्यात आला होता.

Amazon Great Summer Sale मध्ये 21 हजार रुपयांनी स्वस्त मिळतोय iPhone 15, चेक करा ऑफर
iPhone 15

Amazon Great Summer Sale : अमेझॉनवर 'अमेझॉन ग्रेट समर सेल' सुरू झाला आहे. या सेलमध्ये अनेक वस्तूनच्या किमती सूट मिळत आहे तर बँक ऑफर्समुळेही किमतीत मोठी बचत होत आहे. सेल दरम्यान अॅपलच्या फ्लॅगशिप डिव्हाइस आयफोन 15 वर मोठी सूट मिळत आहे. आयफोन 15 मध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले फोन स्वस्तात घरेदीची संधी ग्राहकांना आहे. 

(NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आयफोन 15 चा 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट अमेझॉनवर 59,499 रुपयांना लिस्टेड आहे. आयफोन 15 सप्टेंबर 2023 मध्ये 79,900 रुपयांना लाँच करण्यात आला होता. सध्या बँक ऑफर्सनुसार HDFC बँक क्रेडिट कार्डच्या ट्रान्जॅक्शनवर 10 टक्के (1250 रुपयांपर्यंत) सूट मिळू शकते. ज्यानंतर हा 59,499 रुपयांचा फोन  58,240 रुपयांना मिळू शकेल. 

(नक्की वाचा -  ATM Withdrawal : एटीएममधून पैसे काढणे महागले; 1 मे पासून नवा नियम लागू)

एक्सचेंज ऑफर

तुमचा जुना किंवा सध्याचा फोन एक्सचेंज ऑफरमध्येही देऊ शकता. एक्सचेंज ऑफरद्वारेही तुम्ही मोठी सूट नवीन फोनवर मिळवू शकाल. मात्र एक्सचेंज ऑफरचा जास्तीत जास्त फायदा एक्सचेंजमध्ये दिलेल्या फोनच्या कंडिशन आणि मॉडेलवर अवलंबून असतो.

आयफोन 15 स्पेशिफिकेशन

आयफोन 15 मध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे. ज्याचे रिझोल्यूशन 1179x2556 पिक्सेल, 60Hz रिफ्रेश रेट आणि 2000 निट्स पर्यंत ब्राइटनेस आहे. हा आयफोन iOS 18 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. 

(नक्की वाचा- MHADA Offer : म्हाडाची 'बुक माय होम' भन्नाट ऑफर, नागरिकांना आवडेल ते घर खरेदीची संधी)

कॅमेरा सेटअपमध्ये आयफोन 15 च्या मागील बाजूस f/1.6 अपर्चरसह 48-मेगापिक्सेलचा वाइड-अँगल कॅमेरा आणि f/1.6 अपर्चर आणि सेन्सर शिफ्ट स्टॅबिलायझेशनसह 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. आयफोन 15 मध्ये Apple A16 बायोनिक चिपचा वापर केला जातो. हा कंपनीचा पहिला फोन आहे ज्यामध्ये USB टाइप-सी पोर्ट आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: