
iPhone 16 Price Cut: सणासुदीच्या काळात ऑनलाइन शॉपिंगची धूम सुरू झाली असून, फ्लिपकार्टच्या बहुप्रतिक्षित 'बिग बिलियन डेज' सेलला 23 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या सेलमध्ये तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आयफोनच्या विविध मॉडेल्सवर विक्रमी सूट जाहीर झाली आहे. या सेलमध्ये नवीन iPhone 16 आणि iPhone 16 Pro सोबतच लोकप्रिय iPhone 14 देखील अतिशय कमी किमतीत उपलब्ध होणार आहे
iPhone 16 Pro सीरिजवर सर्वाधिक सूट
या सेलमध्ये सर्वात मोठा डिस्काउंट iPhone 16 Pro Max वर मिळत आहे. 1,44,900 रुपये लाँच किंमत असलेला हा फोन बँक ऑफरसह केवळ 89,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. याचा अर्थ, यावर तब्बल 42,901 रुपयांची बचत होणार आहे.
त्याचप्रमाणे, iPhone 16 Pro (1,19,900 रुपये लाँच किंमत) हा फोन 69,999 रुपयांच्या प्रभावी किमतीत मिळेल. यासाठी बँक क्रेडिट कार्ड वापरल्यास 5,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते.
( नक्की वाचा : New Bike Price: Royal Enfield, Hero, TVS सह अनेक दुचाकी 22 हजार रुपयांपर्यंत स्वस्त, सर्व किंमती इथे पाहा! )
iPhone 16 आणि iPhone 14 वरही मोठी सवलत
नव्या iPhone 16 मॉडेल्सवरही मोठी सूट जाहीर झाली आहे. iPhone 16 (74,900 रुपये लाँच किंमत) 51,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या आयफोनवर तब्बल 17,900 रुपयांहून जास्त डिस्काउंट आहे.
या सेलमध्ये जुन्या मॉडेल्सवरही चांगल्या ऑफर्स आहेत. iPhone 14 (79,900 रुपये लाँच किंमत) बँक ऑफरसह केवळ 39,999 रुपयांमध्ये मिळेल, ज्यामुळे 39,901 रुपयांची मोठी बचत होईल.
प्रमुख मॉडेल्सची वैशिष्ट्ये
iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max:
प्रोसेसर: A18 प्रो चिपसेट
डिस्प्ले: 6.3 इंच (Pro) आणि 6.9 इंच (Pro Max) LTPO OLED डिस्प्ले, 1,600 nits पीक ब्राइटनेस
कॅमेरा: 48MP मुख्य कॅमेरा, 48MP अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आणि 12MP 5x ऑप्टिकल झूमसह टेलीफोटो लेन्स
इतर: 12MP सेल्फी कॅमेरा
( नक्की वाचा : New GST Rates: बाहेर जेवायला जाताय? आता तुमचा खिसा जास्त रिकामा होणार नाही! वाचा कसा होणार तुमचा फायदा )
iPhone 16:
प्रोसेसर: A18 प्रोसेसर
डिस्प्ले: 6.1 इंच, 60Hz OLED डिस्प्ले
कॅमेरा: 48MP मुख्य कॅमेरा आणि 12MP अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स
इतर: 12MP सेल्फी कॅमेरा
iPhone 14:
प्रोसेसर: A15 बायोनिक चिप
डिस्प्ले: 6.1 इंच OLED डिस्प्ले
कॅमेरा: 12MP मुख्य कॅमेरा आणि 12MP अल्ट्रा-वाइड लेन्स
इतर: 12MP सेल्फी कॅमेरा, 60Hz रिफ्रेश रेट.
फ्लिपकार्टच्या या सेलमुळे ग्राहकांना आयफोनचे नवीनतम तसेच जुने मॉडेल्स विक्रमी कमी किमतीत खरेदी करण्याची सर्वोत्तम संधी आहे. त्यामुळे, तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही योग्य वेळ आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world