जाहिरात

iPhone 15 Price cut : Apple iPhone 15 वर 20,000 पर्यंत सूट, कधीपासून सुरू होणार Amazon Prime Day चा सेल?

Amazon Prime Day :आयफोन 15 च्या दिलेल्या किमतीवर बँक सवलत आणि अन्य ऑफर्सही उपलब्ध आहे. ग्राहक Amazon Pay ICICI Bank क्रेडिट कार्डाच्या मदतीने अतिरिक्त पाच टक्क्यांपर्यंत सूट मिळवू शकता.

iPhone 15 Price cut : Apple iPhone 15 वर 20,000 पर्यंत सूट, कधीपासून सुरू होणार Amazon Prime Day चा सेल?

iPhone 15 Price cut, Amazon Prime Day Sale 2025 : Apple चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. iPhone 15 (128 GH) मोबाइलवर बहुप्रतीक्षित प्राइम डे 2025 सेलमध्ये मोठी सवलत मिळणार आहे. प्राइम डे सेल 12 जुलै ते 14 जुलैदरम्यान असणार आहे. विशेषत: प्राइम सदस्यांसाठी आयोजित केलेल्या या सेलमध्ये स्मार्टफोन  57,249 रुपयात खरेदी करता येणार आहे. या मोबाइलची मूळ लॉन्च करीत असतानाची किंमत 79,900 रुपये आहे. 

आयफोन 15 च्या दिलेल्या किमतीवर बँक सवलत आणि अन्य ऑफर्सही उपलब्ध आहे. ग्राहक Amazon Pay ICICI Bank क्रेडिट कार्डाच्या मदतीने अतिरिक्त पाच टक्क्यांपर्यंत सूट मिळवू शकता. तर ICICI आणि SBI Bank कार्डाच्या माध्यमातून आयफोन 16 वर दहा टक्क्यांपर्यंत सवलत मिळू शकते. 

इंस्टेंट ऑफर्स व्यतिरिक्त अॅमेझॉन ग्राहकांना नो-कॉस्ट EMI ऑप्शन ऑफर करीत आहे. दहा हजार रुपये प्रति महिन्याला ईएमआयवर हँडसेट खरेदी करू शकतात. याशिवाय ग्राहक एक्सचेंज ऑफरअंतर्गत अपग्रेड करण्याचा फायदाही घेऊ शकतात. एक्सचेंज ऑफरअंतर्गत 52,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. 

PhD Food Delivery Rider: ऑक्सफर्डची पदवी अन् पीएचडी, तरीही साधी नोकरी; उच्चशिक्षित तरुण का बनला डिलिव्हरी बॉय?

नक्की वाचा - PhD Food Delivery Rider: ऑक्सफर्डची पदवी अन् पीएचडी, तरीही साधी नोकरी; उच्चशिक्षित तरुण का बनला डिलिव्हरी बॉय?

2025 मध्ये iPhone 15 खरेदी करणं किती योग्य?

2025 मध्ये आयफोन 15 खरेदी करणं चांगला पर्याय आहे. विशेषत: Amazon Prime Day 2025 मध्ये कमी किमतीत आणि चांगली ऑफर मिळल्यामुळे या फोनची डिल फायदेशीर ठरू शकते. 

तसं पाहायला गेलं तर आगामी iPhone 17 series च्या तुलनेत  1 हा फोन दोन जनरेशन मागे आहे. मात्र या फोनमध्ये A16 Bionic चिप देण्यात आलं आहे. त्यामुळे दर दिवसाचे टास्क, गेमिंग, प्रोडक्टिव्हिटीसाठी योग्य आहे. फोनमध्ये जबरदस्त कॅमेरा सिस्टिम असल्याने चांगल्या दर्जाचे फोटो आणि व्हिडिओ शूट करता येतील. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com