जाहिरात

January 2026 Calendar: मकर संक्रांती ते मौनी अमावस्या; वाचा नववर्षातील पहिल्या महिन्यातील सर्व सण आणि उत्सव

January 2026 Calendar: दरवर्षीप्रमाणे 2026 मधील जानेवारी महिना हा धार्मिक आणि राष्ट्रीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

January 2026 Calendar: मकर संक्रांती ते मौनी अमावस्या;  वाचा नववर्षातील पहिल्या महिन्यातील सर्व सण आणि उत्सव
मुंबई:

January 2026 Calendar:  दरवर्षीप्रमाणे 2026 मधील जानेवारी महिना हा धार्मिक आणि राष्ट्रीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या महिन्यात सूर्य देवाच्या उपासनेचा मकर संक्रांती हा मोठा सण साजरा होईल, तर दुसरीकडे पितरांच्या आशीर्वादासाठी महत्त्वाची मानली जाणारी मौनी अमावस्याही याच महिन्यात आहे. 

याशिवाय शक्तीची उपासना करण्यासाठीची गुप्त नवरात्री आणि विद्येची देवता माता सरस्वतीची पूजा करण्याचा वसंत पंचमी हा सणही याच काळात येणार आहे. अध्यात्मिक सणांसोबतच स्वामी विवेकानंद आणि गुरु गोविंद सिंह यांच्यासारख्या महापुरुषांची जयंती आणि 26 जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन देखील उत्साहात साजरा केला जाईल.

माघ महिन्याला सुरुवात (03 जानेवारी 2026 )

हिंदू धर्मात माघ महिना हा अत्यंत पवित्र आणि पुण्य देणारा मानला जातो. या महिन्याची सुरुवात 3 जानेवारी 2026 पासून होईल आणि 1 फेब्रुवारी 2026 ला माघ पूर्णिमेने या महिन्याची सांगता होईल. माघ महिन्यात गंगा स्नान करणे, प्रयागराज येथे कल्पवास करणे, तसेच जप, तप आणि व्रत यांना विशेष महत्त्व आहे. अशी मान्यता आहे की, या पवित्र महिन्यात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने वर्षभर घरात सुख आणि समृद्धी टिकून राहते.

(नक्की वाचा : Viral News : नवरी नटली अन् कामाला बसली, लग्न मंडपात केला 'बग' फिक्स, हनिमुनमध्येही 3 तास काम, चर्चा तर होणारच! )


मकर संक्रांती (14 जानेवारी 2026)

मकर संक्रांतीचा सण हा सूर्य देवाच्या पूजेसाठी आणि दानासाठी सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी सूर्य धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतो, ज्याला उत्तरायण असेही म्हणतात. 2026 मध्ये मकर संक्रांती 14 जानेवारीला साजरी केली जाईल. या दिवशी नदीत स्नान करून दानधर्म केल्याने मोठे पुण्य मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

मौनी अमावस्या ( 18 जानेवारी 2026 )

माघ महिन्यात येणारी अमावस्या म्हणजे मौनी अमावस्या, जी 18 जानेवारी 2026 ला असेल. या दिवशी गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी मौन पाळून साधना करणाऱ्या व्यक्तीला अक्षय पुण्य प्राप्त होते. तसेच हे व्रत पितरांच्या मुक्तीसाठी आणि त्यांच्या आशीर्वादासाठी अतिशय फलदायी मानले जाते.

माघ गुप्त नवरात्री (19 जानेवारी 2026)

शक्तीची उपासना करणाऱ्यांसाठी माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीचे महत्त्व मोठे आहे. देवी दुर्गाच्या 10 विद्यांची म्हणजे दशमहाविद्यांची साधना करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. या वर्षातील गुप्त नवरात्री 19 जानेवारी 2026 ला सुरू होईल आणि 28 जानेवारी 2026 पर्यंत चालेल. या काळात देवीची मनोभावे पूजा केली जाते.

वसंत पंचमी ( 23 जानेवारी 2026) 

विद्येची देवता माता सरस्वतीची पूजा करण्याचा दिवस म्हणजे वसंत पंचमी, जो माघ महिन्याच्या शुद्ध पंचमीला येतो. यावर्षी हा सण 23 जानेवारी 2026 ला साजरा केला जाईल. असे मानले जाते की या दिवशी माता सरस्वतीची पूजा केल्याने बुद्धी आणि ज्ञानाचा आशीर्वाद मिळतो.

जानेवारी 2026 मधील सण आणि उत्सवांची संपूर्ण यादी 

01 जानेवारी 2026 : इंग्रजी नवीन वर्ष प्रारंभ, गुरु प्रदोष व्रत
03 जानेवारी 2026 : स्नान-दानाची पौष पौर्णिमा, शाकंभरी जयंती
03 जानेवारी 2026 : माघ महिना प्रारंभ
05 जानेवारी 2026 : गुरु गोविंद सिंह जयंती
06 जानेवारी 2026 : सकट चौथ, सौभाग्यसुंदरी व्रत
12 जानेवारी 2026 : स्वामी विवेकानंद जयंती, राष्ट्रीय युवा दिन
13 जानेवारी 2026 : लोहडी
14 जानेवारी 2026 : मकर संक्रांती, षटतिला एकादशी, पोंगल, उत्तरायण
15 जानेवारी 2026 : संक्रांती पुण्यकाळ, षटतिला एकादशी, कृष्ण कूर्म द्वादशी, मट्टू पोंगल, माघ बिहू
16 जानेवारी 2026 : शुक्र प्रदोष व्रत, मासिक शिवरात्री, शबे मेराज
18 जानेवारी 2026 : मौनी अमावस्या, माघ अमावस्या
19 जानेवारी 2026 : माघ गुप्त नवरात्री प्रारंभ
20 जानेवारी 2026 : चंद्र दर्शन
22 जानेवारी 2026 : गणेश जयंती, रामलला प्राणप्रतिष्ठा दिन, गौरी गणेश चतुर्थी
23 जानेवारी 2026 : वसंत पंचमी, सरस्वती जयंती, सुभाषचंद्र बोस जयंती
24 जानेवारी 2026 : स्कंद षष्ठी
25 जानेवारी 2026 : भानु सप्तमी, रथ सप्तमी, नर्मदा जयंती
26 जानेवारी 2026 : प्रजासत्ताक दिन, भीमाष्टमी
29 जानेवारी 2026 : जया एकादशी व्रत, भीष्म द्वादशी
30 जानेवारी 2026 : जया एकादशी व्रत पारण, गांधीजी पुण्यतिथी, शुक्र प्रदोष व्रत

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com