जाहिरात
Story ProgressBack

Hanuman Jayanti 2024 : हनुमान जयंती कधी आहे? जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त

Hanuman Jayanti 2024 : हनुमान जयंती कधी आहे? जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त
हनुमान जयंती कधी आहे? जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त
मुंबई:

हिंदू धर्मात चैत्र महिना धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. या महिन्यात गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती असे अनेक सण असतात. चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती उत्साहात साजरी केली जाते. त्रेतायुगातील या शुभ दिवशी बजरंगबलीचा जन्म झाला असे शास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे या दिवशी भक्त हनुमानाची पूजा करतात. या दिवशी मंदिरे सजविली जातात आणि ठिकठिकाणी भंडारे व कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी म्हणजे 2024 मध्ये हनुमान जयंतीची तारीख आणि पूजा करण्याचा शुभ मुहूर्त जाणून घेवूया...

हनुमान जयंती कधी आहे?

हिंदू कॅलेंडर आणि उदया तिथीनुसार, यावेळी चैत्र महिन्याची पौर्णिमा 23 एप्रिलला म्हणजेच मंगळवारी पहाटे 3.26 वाजता सुरु होऊन दुसऱ्या दिवशी 24 एप्रिल रोजी पहाटे 5.18 वाजता संपणार आहे. उदया तिथीनुसार 23 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाते. या दिवशी प्रभू रामासह बजरंगबली ची पूजा करावी कारण यामुळे बजरंगबली लवकर प्रसन्न होतो.

(नक्की वाचा : अंत्यसंस्कार, तेराव्यात जाण्याचेही घेतात पैसे; अभिनेत्याकडून बॉलिवूडचं डार्क सिक्रेट उघड)

जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त...

बजरंग बली यांचा जन्म मंगळवारी झाला असे सांगितले जाते. म्हणूनच बजरंग बली यांना मंगलमूर्ती हे नाव देखील दिले आहे. या वर्षी 23 एप्रिलला मंगळवारी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. 23 एप्रिलला दिवसभर पौर्णिमा असल्याने तुम्ही कधीही बजरंग बलीची पूजा करू शकता. पण शुभ मुहूर्तावर पूजा केल्यास आपल्या इच्छा पूर्ण होतात. हनुमान जयंतीच्या पूजेची विशेष वेळ सकाळी 9.14 ते 10.49 यानंतर दुपारी 12.25 ते 2 ही पूजेची विशेष वेळ आहे तर दुपारी 3.36 ते सायंकाळी 5.11 पर्यंत पूजेसाठी शुभ मुहूर्त आहे. रात्रीची शुभ मुहूर्त 8:14 ते 9:25 पर्यंत असेल.

(नक्की वाचा : राहुल गांधींची तब्येत अचानक बिघडली; मध्य प्रदेश, झारखंड दौरा रद्द)

हनुमानजयंतीला भाद्रावस योग आहे तरी काय?

हनुमान जयंतीच्या दिवशी भाद्रावस योग असल्याचे ज्योतिषांनी सांगितले आहे. भद्रा म्हणजेच शनीची बहीण या दिवशी पाताळात असेल आणि पृथ्वीवरील सर्व प्रकारचे धार्मिक आणि शुभ कार्यक्रम शुभ होतील. असे म्हटले जाते की जेव्हा भद्रा पाताळात राहते तेव्हा पृथ्वीवरील भक्तांनी केलेली पूजा फायदेशीर आणि पवित्र फलते. या दिवशी सायंकाळी 4.25 वाजल्यापासून भाद्रावस योग आहे. यावेळी बजरंगबलीची पूजा केल्याने साधक आणि संपूर्ण कुटुंबाला शाश्वत फळ मिळण्याचे वरदान मिळण्याची शक्यता आहे.

(नक्की वाचा : रिलेटिव इंपोटेन्सी म्हणजे काय? त्या आधारे लग्न रद्द; मुंबई न्यायालयाच्या निर्णयाची चर्चा)

बजरंगबलीची योग्य पूजा कशी करावी?

बजरंगबलीची पूजा करण्यापूर्वी मंदिरासमोर एक पाठ ठेवा. त्यावर लाल कपडा पसरवा. यानंतर प्रभू श्री राम आणि बजरंग बली यांचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करा. आता देवाला चंदनाचा टिळा लावा. यानंतर बजरंग बलीला लाडू आणि तुळशीची पाने अर्पण करावी. प्रथम प्रभू रामाची आरती करावी व नंतर बजरंग बलीची आरती करावी. बजरंग बाण आणि हनुमान चालिसाचे पठण करावे.

नक्की पाहा :

सोलापुरात प्रणितींच्या प्रचारासाठी चक्क अवतरला शाहरुख खान, लोकांनीही दिली पसंती 

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
अवघ्या तीस वर्षांच्या Fashion influencer सुरभी जैनचे निधन
Hanuman Jayanti 2024 : हनुमान जयंती कधी आहे? जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त
avoid these mistakes while reading hanuman chalisa follow these rules
Next Article
हनुमान चालीसाचे पठण करताना अजिबात करू नका या चुका, जाणून घ्या नियम
;