जाहिरात

Ladki Bahin Yojana e-KYC Required Documents: लाडकी बहीण योजना e-KYC साठी ही कागदपत्रं आवश्यक, फायदे कोणते?

Ladki Bahin Yojana e-KYC Required Documents: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून e-KYC करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रं आवश्यक आहेत, यामुळे कोणते लाभ मिळणार आहेत? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Ladki Bahin Yojana e-KYC Required Documents: लाडकी बहीण योजना e-KYC साठी ही कागदपत्रं आवश्यक, फायदे कोणते?
"Ladki Bahin Yojana e-KYC Required Documents: लाडकी बहीण योजना ई-केवायसीसाठी कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत"

Ladki Bahin Yojana e-KYC Required Documents: 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' या योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता महाराष्ट्र सरकारकडून e-KYC करण्याची प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलीय. https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटवर e-KYC ची सुविधा उपलब्ध करण्यात आलीय. पुढील दोन महिन्यात ई-केवायसी प्रक्रिया लाभार्थ्यांनी पूर्ण करण्याचे आवाहन महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलंय. या प्रक्रियेमुळे भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितलंय. महिला आणि बाल विकास विभागाकडून e-KYC माध्यमातून लाभार्थींचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे. e-KYCची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. दरम्यान यासंदर्भात आर्थिक मागणी करत असेल त्यास लाभार्थींनी बळी पडू नये, असे आवाहनही महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना e-KYC प्रक्रियेसाठी कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत तसेच यामुळे कोणते फायदे मिळणार आहेत, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना e-KYC साठी आवश्यक असणारी कागदपत्रं | Mukhyamantri-Majhi Ladki Bahin Yojana e-KYC Required Documents

1. लाभार्थी महिलेचे आधार कार्ड | Aadhaar Card

2. लाभार्थी महिलेचा फोटो | Ladki Bahin Yojana Beneficiary Woman Photo

3. उत्पन्नाचा दाखला| Income Certificate
- वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक

4. विवाह प्रमाणपत्र | Marriage Certificate 
- महिलेचे नाव रेशन कार्डवर नसेल किंवा महिला नवविवाहिती असेल तर विवाह प्रमाणपत्र आवश्यक आहे.

5. आधार कार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील | Bank Account Details

6. लाभार्थी महिलेचे हमीपत्र | Ladki Bahin Yojana Beneficiary Woman Affirmation Letter

7. अधिवास प्रमाणपत्र | Domicile Proof 
- अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, तर तुम्ही खालीलपैकी कोणतेही कागदपत्रं अपलोड करू शकता:
- 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड (Ration Card)
- 15 वर्षांपूर्वीचे  मतदार ओळखपत्र (Voter ID)
- जन्म प्रमाणपत्र (Birth Certificate)
- शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate)

(नक्की वाचा: Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो, E-KYC कशी कराल? कोणती कागदपत्रे लागणार? जाणून घ्या सर्व प्रोसेस)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना e-KYC प्रक्रिया कशी पूर्ण करावी, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया | How to Complete Mukhyamantri - Majhi Ladki Bahin Yojana e-KYC

  • ब्राउझर ओपन करुन ladakibahin.maharashtra.gov.in. या वेबसाइटला भेट द्या.
  • पोर्टलवरील ई-केवायसी पर्यायावर क्लिक करा.
  • आधार कार्डवरील क्रमांक, कॅप्चा सबमिट करुन e-KYC प्रक्रियेस सुरुवात करा. 
  • तुमच्याबाबतची आवश्यक माहिती, कागदपत्रं सबमिट करुन बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण करा. 

ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य का करण्यात आलीय? लाभार्थी महिलांना कोणते लाभ मिळणार | Majhi Ladki Bahin Yojana e-KYC Benefits 

  • लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता सुनिश्चित करण्यासह पात्र महिलांना नियमित लाभ देणे, हा उद्देश आहे.
  • भविष्यात अन्य सरकारी योजनांचे लाभ घेण्यास मदत मिळू शकते.
  • ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास योजनेचा लाभ रोखला जाऊ शकतो.  

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना मिळणारे हप्ते अधिक सुलभ, सुकर आणि पारदर्शक व्हावेत यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन महिला आणि बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com