
Maha Shivratri 2025: महादेवाच्या भाविकांसाठी महाशिवरात्रीचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असतो. देशभरामध्ये हा दिवस भक्तिभावाने साजरा केला जातो. महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागीही होतात. या दिवशी शंकर भगवान आणि माता पार्वतीची पूजा केल्यास वैवाहिक जीवनात आनंद-समृद्धी येते, असे मानले जातात. या दिवशी रुद्राभिषेक करुन महामृत्यूंजय मंत्राचा जप करुन शिवलिंगावर जल आणि बेलपत्र अर्पण करावे, यामुळे भगवान शंकराची कृपादृष्टी कायम राहते; असेही म्हणतात. यंदा महाशिवरात्री कधी साजरी करण्यात येणार आहे, पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त काय आहेत, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाशिवरात्री कधी आहे? Mahashivratri 2025 Date (Mahashivratri Kadhi Aahe)
दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यंदा 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे. पंचांगानुसार 26 फेब्रुवारी 2025 रोजी चतुर्दशी तिथीचा शुभारंभ सकाळी 11.08 वाजता होणार असून 27 फेब्रुवारीला सकाळी 8:54 वाजता तिथी समाप्त होईल. या दिवशी भगवान शंकराची पूजा करणे, रुद्राभिषेक आणि उपवास केल्यास शुभ फळ मिळते, असे म्हणतात.
महाशिवरात्री 2025 निशिता काल पूजा मुहूर्त
महाशिवरात्रीच्या दिवशी निशिता काल पूजेचे विशेष महत्त्व आहे. यंदा ही पूजा करण्यासाठीचा शुभ मुहूर्त 27 फेब्रुवारीला मध्य रात्री 12:27 वाजेपासून ते मध्यरात्री 1:16 वाजेपर्यंत असणार आहे.
(नक्की वाचा: New Year 2025 Festivals And Important Days: 2025मधील सणउत्सव आणि दिनविशेषांची संपूर्ण यादी पाहा एका क्लिकवर)
महाशिवरात्रीच्या पूजेचा मुहूर्त
- रात्रीच्या प्रथम प्रहराच्या पूजेची वेळ 26 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:43 वाजेपासून ते रात्री 9:47 वाजेपर्यंत असणार आहे.
- रात्रीच्या द्वितीय प्रहराच्या पूजेची वेळ 26 फेब्रुवारी रोजी रात्री 9:47 वाजेपासून ते मध्यरात्री (27 फेब्रुवारी 2025) 12:51 वाजेपर्यंत असणार आहे.
- रात्रीच्या तृतीय प्रहराच्या पूजेची वेळ 27 फेब्रुवारी 2025 रोजी मध्यरात्री 12:51 वाजेपासून ते पहाटे 3:55 वाजेपर्यंत आहे.
- रात्रीच्या चतुर्थ प्रहराच्या पूजेची 27 फेब्रुवारी 2025 पहाटे 3:55 वाजेपासून ते संध्याकाळी 6:59 वाजेपर्यंत आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरांमध्ये विशेष पूजा-अर्जनेचे आयोजन केले जाते. या दिवशी 'ॐ नमः शिवाय' मंत्राचा जप करावा. रात्रभर जागरण करुन शिव पुराणाचे पठण करतात. महाशिवरात्रीचे व्रत केल्यास विशेष फळ मिळते, असे म्हणतात.
महाशिवरात्रीची पूजा आणि व्रत कसे करावे?
- महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करुन स्वच्छ कपडे परिधान करावे.
- संकल्प करुन व्रत करावा.
- सकाळी आणि संध्याकाळीही शंकर भगवान - पार्वती मातेची पूजा करावी.
- पूजेदरम्यान भगवान शिव आणि माता पार्वतीला वस्त्र अर्पित करणे शुभ मानले जाते.
- विवाहित महिलांसाठी या दिवस अतिशय महत्त्वाचा असतो, या दिवशी पार्वती मातेला संपूर्ण श्रृंगार सामग्री अर्पित करावी.
- महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणे शुभ मानले जाते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world