- ज्योतिषाचार्य श्रीकेतन कुलकर्णी
Makar Sankranti 2026 Date: हिंदू धर्मामध्ये मकरसंक्रांतीचा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. यंदा 14 जानेवारी 2026 रोजी मकरसंक्रांती साजरी केली जाईल. या दिवशी काय करावे? काय टाळावे? याबाबत ज्योतिषाचार्य श्रीकेतन कुलकर्णी यांनी दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊया...
मकरसंक्रांती 2026 कधी आहे| When Is Makar Sankranti 2026
- यंदा 14 जानेवारी 2026 रोजी मकरसंक्रांती आहे.
- दुपारी 3.06 वाजता सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे, या क्षणी मकर संक्रांतीस प्रारंभ होतोय.
मकरसंक्रांतीचा पुण्यकाल
दुपारी 3.06 वाजेपासून सूर्यास्तापर्यंत पुण्यकाल आहे.
मकरसंक्रांतीच्या दिवशी काय करावे?
या दिवशी सहा प्रकारे तिळाचा उपयोग करावा
- तीळमिश्रित उदकाने स्नान
- तिळाचे उटणे अंगास लावणे
- तीळहोम
- तीळतर्पण
- तीळभक्षण
- तीळदान
यावर्षी संक्रांत बालव करणावर होत आहे, म्हणून शास्त्रोक्त नियम पाळावे.
वाहनादि प्रकार
वाहन : वाघ
उपवाहन : घोडा
देवीचे स्वरूप
- देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे.
- हातात गदा घेतलेली आहे.
- केशराचा टिळा लावलेला आहे.
- वयाने कुमारी असून बसलेली आहे.
- वासाकरिता जाईचे फुल घेतले आहे.
- पायस भक्षण करत आहे.
- सर्प जाती आहे.
भूषणार्थ : मोत्यांची आभूषणे धारण केलेली आहेत.
नावे - वारनाव / नक्षत्रनाव : मंदाकिनी
दिशा: देवी पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे जात असून वायव्य दिशेकडे पाहत आहे.
मकर संक्रांती: नियम (पर्वकाळात टाळावयाच्या गोष्टी)- दात घासणे
- कठोर बोलणे
- वृक्ष आणि गवत तोडणे
- गाई-म्हशींची धार काढणे
- कामविषयक सेवन
(नक्की वाचा: Makar Sankranti 2026 Date: मकरसंक्रांतीला तिळाशी संबंधित हे 7 उपाय केले तर काय होईल? आताच वाचा यादी)
संक्रांती पर्वकाळात महिलांनी करावयाचे दान
यथाशक्ती पुढील दाने करावीत -
- नवे भांडे
- गाईला घास
- अन्न
- तिळपात्र
- गूळ, तीळ
- वस्त्र
- सोने
- भूमी
- गाय
- घोडा इत्यादी
संकल्प : देश-काल उच्चार करून पुढीलप्रमाणे संकल्प करावा -
"मम आत्मनः सकल पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं श्री सवितृ प्रीतिद्वारा सकलपापक्षयपूर्वकं स्थिर सौभाग्य, कुलाभिवृद्धी, धनधान्यसमृद्धी, दीर्घायुः, महैश्वर्य, मंगलाभ्युदय, सुखसंपादादि कल्पोक्त सिद्ध्यर्थं अस्मिन् मकरसंक्रमण पुण्यकाले दानमहं करिष्ये."
यानंतर जे दान करावयाचे आहे ते द्यावे आणि दक्षिणा अर्पण करावी.
(नक्की वाचा: Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीला या 3 राशींवर शनिदेव प्रसन्न, गुड न्यूज मिळणार, रखडलेली कामं होतील पूर्ण)
॥ अथ जन्मनक्षत्रवशात् फल ॥
पंथाः – विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा
भोगः – मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका
व्यथा – पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा, रेवती
वस्त्र – अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा
हानिः – पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा
विपुलं धनम् – मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती
विशेष सूचना : दरवर्षी मकर संक्रांतीच्या निमित्ताने ही संक्रांत अशुभ आहे अशा अफवा पसरवून लोकांना घाबरवले जाते. या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नाही, त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

