जाहिरात

Navratri 2024: मुंबा देवीची मूर्ती नवीन गाभाऱ्यामध्ये स्थापित का नाही? ही आहे कहाणी

Mumba Devi Mandir : मुंबईतील प्रसिद्ध मुंबा देवी मंदिराची ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?

Navratri 2024: मुंबा देवीची मूर्ती नवीन गाभाऱ्यामध्ये स्थापित का नाही? ही आहे कहाणी

Mumba Devi Mandir : जगाच्या पाठीवर कोठेही राहणाऱ्या व्यक्तीला मुंबई शहराचे असणारे आकर्षण वेगळेच असते. मुंबईच्या नावाचा इतिहास देखील आगळावेगळा आहे. मुंबईचे मुख्य ग्रामदैवत असणाऱ्या मुंबा देवीच्या (Mumba Devi) नावावरून शहराचे नाव 'मुंबई' पडले, असे म्हणतात. मुंबा म्हणजे महा अंबा आई आणि यातून मुंबई असा शब्द तयार झाला. नवरात्रौत्सवानिमित्त (Navratri 2024) मुंबा देवीच्या मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या सणानिमित्त जाणून घेऊया मुंबा देवी मंदिराचा इतिहास... 

Shardiya Navratri 2024: नवरात्रीचे व्रत करण्याची आणि देवीची ओटी भरण्याची ही आहे योग्य पद्धत, दुर्लक्ष करू नका

(नक्की वाचा: Shardiya Navratri 2024: नवरात्रीचे व्रत करण्याची आणि देवीची ओटी भरण्याची ही आहे योग्य पद्धत, दुर्लक्ष करू नका)

450 वर्षांचा जुना इतिहास

मुंबा देवीचा इतिहास जवळपास 450 वर्षे जुना आहे. मुंबा देवी ही आगरी आणि कोळ्यांची संरक्षक होती, असे म्हणतात. यापूर्वी मुंबा देवी मंदिर बोरी बंदर येथे होते. 1739 ते 1770च्या दरम्यान हे मंदिर नष्ट झाल्याचे मानले जाते. यानंतर मुंबादेवीचे नवीन मंदिर भुलेश्वर येथे उभारण्यात आले. ही देवी पृथ्वी मातेचे रूप धारण करते, असे मानले जाते. पूर्वी सीएसटी रेल्वे स्टेशन येथे कोळी मच्छिमारांनी या देवीचे मंदिर बांधले होते. त्या ठिकाणी बांधलेले मूळ मंदिर 1737च्या पाडण्यात आले. यानंतर फणसी तलाव येथे नवीन मंदिर उभारण्यात आले. आताच्या मंदिरामध्ये चांदीचा मुकुट, नाकातली नथ  आणि सोन्याचा हार घातलेल्या मुंबादेवीची प्रतिमा आहे.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Bhagyashree Pradhan

Navratri Colours 2024: नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग, जाणून घ्या प्रत्येक रंगाचे महत्त्व 

(नक्की वाचा: Navratri Colours 2024: नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग, जाणून घ्या प्रत्येक रंगाचे महत्त्व)

नवीन गाभाऱ्यामध्ये मूर्ती का नाहीय? 

मंदिरामध्ये देवीच्या मूर्तीसाठी गाभारा तयार करावा आणि तिचे स्थान थोडेसे उंच करावे, यासाठी आताच्या स्थानाशेजारी मंदिराचा गाभार उभारण्यात आला. यानंतर देवीची मूर्ती नवीन गाभाऱ्यामध्ये स्थापित करण्याचे ठरवण्यात आले. पण मंदिर प्रशासनाला यामध्ये यश मिळाले नाही, असे म्हणतात. यादरम्यान एका भाविकाच्या स्वप्नामध्ये देवी आली आणि तिने सांगितले की, मी या स्थानापासून हलणार नाही. पण नव्याने उभारण्यात आलेल्या गाभाऱ्यामध्ये तुम्ही माझी बहीण जगदंबा आणि अन्नपूर्णेची प्रतिष्ठापना करा. यानंतर नवीन गाभाऱ्यात अन्नपूर्णा माता आणि जगदंबेची मातेची प्रतिष्ठापणा करण्याचे ठरवण्यात आले, असेही म्हटले जाते  

Navratri Wishes 2024: अंबाबाईचा उदो उदो! नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी पाठवा हे मेसेज

(नक्की वाचा: Navratri Wishes 2024: अंबाबाईचा उदो उदो! नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी पाठवा हे मेसेज)

दिवसातून सहा वेळा केली जाते देवीची आरती 

मुंबा देवीची दररोज दिवसातून सहा वेळा आरती केली जाते. मंदिरात एकूण 16 पुजारी देवीची सेवा करत आहेत. देवीची पूजा, आरती, देवीला प्रसाद अर्पण करणे, या सर्व विधी पुजारी पार  पाडतात. मुंबा देवीला दररोज भात, भाजी आणि मिठाईचा प्रसाद अर्पण करण्याची पद्धत आहे. संध्याकाळची आरती झाल्यानंतर पुजाऱ्यांच्या देखरेखीत स्वच्छता करून मंदिर बंद केले जाते. नियमित पहाटे 4 वाजता मंदिराचे द्वारे उघडले जाते. मंदिराच्या कळसावर ध्वज देखील प्रत्येक महिन्याला बदलला जातो. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com