जाहिरात

Shardiya Navratri 2024: 300 वर्षे जुने मुंबईतील प्रसिद्ध काळबादेवीचे मंदिर,जाणून घ्या धार्मिक स्थळाचा इतिहास

Shardiya Navratri 2024: मुंबईतील 300 वर्षे जुने काळबादेवीच्या मंदिराचा हा इतिहास माहिती आहे का?

Shardiya Navratri 2024: 300 वर्षे जुने मुंबईतील प्रसिद्ध काळबादेवीचे मंदिर,जाणून घ्या धार्मिक स्थळाचा इतिहास

Shardiya Navratri 2024: मुंबईमधील सुप्रसिद्ध काळबादेवी मंदिराच्या नावावरून तेथील परिसर देखील ओळखला जातो. हे मंदिर तीनशे वर्षांपूर्वीचे आहे, असे म्हणतात. मुंबईतील महत्त्वाच्या आणि गजबलेल्या परिसरामध्ये काळबादेवीचे मंदिर आहे. हे मंदिर काळबादेवी परिसरात असले तरीही याचे मूळ स्थान सुरुवातीला माहिम आणि नंतर आझाद मैदान म्हणजे पूर्वीचे कापाचे मैदान येथे होते, असा इतिहासात उल्लेख आहे. तीनशे वर्षांपूर्वी आझाद मैदानामध्ये रघुनाथ कृष्ण जोशी यांनी काळबादेवीची प्रतिष्ठापना केली होती.   

जोशी घराण्याची सातवी पिढी सांभाळते मंदिर व्यवस्था 

रघुनाथ कृष्ण जोशी यांच्या निधनानंतर 225 वर्षांपूर्वी ब्रिटिशांच्या दबावामुळे देवीचे मंदिर पुन्हा काळबादेवी परिसरात स्थलांतर करण्यात आले. देवी आणि देवीच्या मंदिराची संपूर्ण व्यवस्था आज जोशी घराण्याची सातवी पिढी पाहत आहे. दिनेश जोशी हे जोशी कुटुंबाच्या सातव्या पिढीतील विश्वस्त आहेत. काळबादेवी ही स्वयंभू जागृत देवी असल्याचे म्हटले जाते. काळबादेवीसोबत महालक्ष्मी देवी आणि सरस्वती देवी या देवीचीही प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. 

Latest and Breaking News on NDTV

Shardiya Navratri 2024: नवरात्रीचे व्रत करण्याची आणि देवीची ओटी भरण्याची ही आहे योग्य पद्धत, दुर्लक्ष करू नका

(नक्की वाचा: Shardiya Navratri 2024: नवरात्रीचे व्रत करण्याची आणि देवीची ओटी भरण्याची ही आहे योग्य पद्धत, दुर्लक्ष करू नका)

मंदिरात नवमीला करतात हवन 

नवरात्रौत्सवामध्ये भाविकांची मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. नवरात्रौत्सवामध्ये परंपरा प्रथेप्रमाणे येथे धार्मिक पूजाविधी होत असतात, नवमीला येथे हवनाचेही आयोजन करण्यात येते. काळबादेवीला गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो.  

मार्गशीर्ष अमावस्येची जत्रा 

डिसेंबर आणि जानेवारी महिन्यादरम्यान मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील अमावस्येला येथे मोठी जत्रा भरते. या देवीचे दर्शन गगनगिरी महाराज, पिंगळाचे राहुल महाराज, इंदुरचे नाना महाराज अशा सर्व महान व्यक्तींसह धर्म पंडितांनीही घेतले आहे; असे म्हणतात.

Navratri Colours 2024: नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग, जाणून घ्या प्रत्येक रंगाचे महत्त्व 

(नक्की वाचा: Navratri Colours 2024: नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग, जाणून घ्या प्रत्येक रंगाचे महत्त्व)

काळबादेवी मंदिरातून इंग्रजांविरुद्धच्या आंदोलनाला सुरुवात 

इंग्रजांविरुद्ध पुकारलेल्या बंड आणि आंदोलनामध्ये ज्या क्रांतिकारकांमुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यापैकी काही क्रांतिकारक श्री काळबादेवीच्या मंदिर परिसरातच वास्तव्यास होते. त्यापैकी हुतात्मा बाबू गेनू, चाफेकर बंधूंचे अनेक सहकारी काळबादेवी मंदिराचे दर्शन घेऊनच आपल्या क्रांतिकारक विचारांना सुरुवात करत होते, असे सांगितले जाते. 

Navratri Wishes 2024: अंबाबाईचा उदो उदो! नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी पाठवा हे मेसेज

(नक्की वाचा: Navratri Wishes 2024: अंबाबाईचा उदो उदो! नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी पाठवा हे मेसेज)

लवकरच होणार मंदिराचा जीर्णोद्धार 

देवीचे मंदिर अगदीच अडचणीच्या ठिकाणी आणि भरगर्दीच्या बाजारपेठेत असल्याने भाविकांना सहजरित्या देवीचे दर्शन घेता येत नाही. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे आणि मंदिराची जागा देखील वाढवण्यात येणार असल्याची माहिती विश्वस्त दिनेश जोशी यांनी दिली. 

Latest and Breaking News on NDTV

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Mumbadevi Navratri 2024 | मुंबादेवी मंदिरात आज घटस्थापना,सकाळपासून भक्तांची गर्दी

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com