
Shardiya Navratri 2025 Date: हिंदू धर्मामध्ये नवरात्री सणाचे विशेष महत्त्व आहे. देशभरात शारदीय नवरात्रौत्सव उत्साहात साजरा केला जातो. यंदा शारदीय नवरात्रौत्सवास (Shardiya Navratri 2025) 22 सप्टेंबरपासून शुभारंभ होतोय. या नऊ दिवसांमध्ये दुर्गामातेच्या विविध रुपांची पूजा केली जाते. मनोभावे देवीची पूजा अर्चना केल्यास सर्व दुःख-संकटांपासून मुक्तता मिळते, असे म्हणतात. नवरात्रीचे नऊ दिवस व्रत करण्याचेही विशेष महत्त्व आहे. या दिवसांत काही भाविक ब्रह्मचर्य व्रताच्या नियमांचंही पालन करतात. पहिल्या दिवशी कोणत्या देवीची पूजा केली जाते आणि मातेला कोणत्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा, जाणून घेऊया...
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गामातेच्या कोणत्या रुपाची पूजा केली जाते?
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गामातेच्या शैलपुत्री देवीची पूजा केला जाते. पर्वतराजा हिमालयाची कन्या असल्याने देवीला "शैलपुत्री" असे म्हणतात. तिचे वाहन वृषभ (बैल) आहे, देवीच्या एका हातामध्ये त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात कमळाचे पुष्प धारण केलंय. नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी कोणते नैवेद्य अर्पण करावे, जाणून घेऊया माहिती...
शैलपुत्री देवी - नवरात्रीतील नवदुर्गा
शैलपुत्री मातेसाठी नैवेद्य (Maa Shailputri Bhog) | Shardiya Navratri First Day 22nd September
शैलपुत्री मातेला नैवेद्यामध्ये गाईचे तूप आणि दुधापासून तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावे.
(नक्की वाचा: Navratri 2025: नवरात्रीच्या 9 दिवसात देवीला कोणता नैवेद्य अर्पण केल्यास इच्छा पूर्ण होतील? जाणून घ्या एका क्लिकवर)
तुपाचा शिरा | Tupacha Shira Recipe In Marathi
सामग्री : रवा, गाईचे तूप, साखर, पाणी, वेलची पावडर, सुकामेवा
पाककृती :
- सर्वप्रथम पॅनमध्ये गाईचे तूप वितळवून घ्या.
- तूप वितळल्यानंतर मध्यम आचेवर रवा भाजून घ्यावा.
- रवा करपणार नाही, याची काळजी घ्यावी.
- एका वेगळ्या पॅनमध्ये पाणी गरम करत ठेवा आणि त्यामध्ये साखर मिक्स करा. साखर पूर्णपणे विरघळू द्यावी.
- भाजलेल्या रव्यामध्ये साखरेचे पाणी मिक्स करा आणि रवा व्यवस्थित ढवळत राहा.
- गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत ते शिजू द्यावे.
- यानंतर वेलची पूड आणि सुकामेवा मिक्स करावी.
- तुपाचा शिरा तयार झालाय.
(नक्की वाचा: Navratri 2025 Colours And Their Significance: नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग, प्रत्येक रंगाचे महत्त्व जाणून घ्या)
मखाण्याची खीर | Makhana Kheer Recipe In Marathi
सामग्री : मखाणे, गाईचे दूध, साखर, वेलची पावडर, सुकामेवा
पाककृती :
- मखाणे तुपामध्ये भाजून घ्यावे. तुम्हाला हवे असल्यास तुपाशिवायही मखाणे भाजू शकते.
- एका पॅनमध्ये दूध गरम करत ठेवा.
- गरम दुधामध्ये मखाणे मिक्स करा आणि गॅस मध्यम आचेवर ठेवा.
- साखर आणि वेलची पावडर मिक्स करावी.
- मिश्रण घट्ट होईपर्यंत सर्व सामग्री शिजू द्यावी.
- मखाण्याची खीर तयार आहे.
मखाण्याची खीर आणि तुपाचा शिऱ्याचा देवीमातेला नैवेद्य अर्पण केल्यानंतर सर्वांना प्रसादाचे वाटप करावे.
(नक्की वाचा: Navratri 2025 Fasting Rules: नवरात्रीचे व्रत कसे करावे? 9 दिवस काय खावे आणि काय टाळावे, जाणून घ्या नियम)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world