जाहिरात

Navratri 2025 Fasting Rules: नवरात्रीचे व्रत कसे करावे? 9 दिवस काय खावे आणि काय टाळावे, जाणून घ्या नियम

Navratri 2025 Fasting Rules In Marathi: नवरात्रौत्सवास 22 सप्टेंबरपासून शुभारंभ होतोय. नवरात्रीचे नऊ दिवसांचे व्रत कसे करावे, कोणत्या पदार्थांचे सेवन करावे आणि कोणत्या गोष्टी खाणे टाळावे? यासह नवरात्रीच्या व्रताचे नियम जाणून घेऊया...

Navratri 2025 Fasting Rules: नवरात्रीचे व्रत कसे करावे? 9 दिवस काय खावे आणि काय टाळावे, जाणून घ्या नियम
"Navratri 2025 Fasting Rules In Marathi: नवरात्रीच्या उपवासाचे नियम माहिती आहेत का?"

Navratri 2025 Fasting Rules In Marathi: शारदीय नवरात्रौत्सवास हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. नऊ दिवस दुर्गामातेच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा केली जाते. विधीवत आणि सच्च्या मनाने पूजा केली तर दुर्गादेवी तिच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करते, असे म्हणतात. यंदा शारदीय नवरात्रौत्सव 22 सप्टेंबर 2025पासून (सोमवार) ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत साजरा केला जाणार आहे. देवीची कृपादृष्टी व्हावी, यासाठी नवरात्रीतील व्रताच्या नियमांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती...

नवरात्रीच्या उपवासामध्ये काय करावे? Navratri 2025 Vrat Rules 

1. व्रताचा संकल्प

नवरात्रीच्या व्रतास सुरुवात करण्यापूर्वी संकल्प करावा. नवरात्रीचे व्रत एक वेळेस भोजन करुन करायचे आहे की केवळ फलाहार करायचाय, याचा निर्णय पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. मनामध्ये देवीप्रति श्रद्धा आणि भक्ती खरी असणे आवश्यक आहे. तसेच अष्टमी किंवा नवमी तिथीला कन्यापूजन करावे.  

2. भक्ती आणि प्रार्थना 

नवरात्रौत्सवामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवीची विधीवत पूजा करावी. देवीच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर दिवा प्रज्वलित करावा.   

3. ध्यान, मंत्रांचा जप आणि दानधर्म 

उपवासादरम्यान मन शुद्ध ठेवावे, यासाठी ध्यानधारणा आणि मंत्रांचा जप करावा. या काळात दान करण्यासही विशेष महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण आवर्जून करावे.  तसेच देवीला नियमित नैवेद्य अर्पण करावा.

4. सात्विक भोजन 

उपवासादरम्यान पूर्णपणे सात्विक भोजनाचे सेवन करावे. यानुसार आहारामध्ये तुम्ही ताजी फळे, भाज्या, दूध, दुग्धजन्य पदार्थ, सुकामेवा यासारख्या गोष्टींचा समावेश करावा. 

5. ब्रह्मचर्य व्रताचे नियम

सत्य बोलावे, मनावर संयम ठेवावा, देवीमातेच्या मंत्रांचा जप करावा. ब्रह्मचर्य व्रताच्या नियमांचे पालन करावे. 

6. सैंधव मीठ 

दैनंदिन वापरातील मिठाऐवजी आहारामध्ये सैंधव मिठाचा समावेश करावा. फराळाच्या पदार्थांमध्ये सैंधव मीठ वापरावे, जे आरोग्यासाठी फायदेशीर असते.  

7. स्वच्छता पाळावी

उपवासादरम्यान घर आणि देवघर स्वच्छ ठेवावे. ज्या घरात स्वच्छता असते, तेथे देवी लक्ष्मीचा निवास असतो आणि घरामध्ये समृद्धी येते, असे म्हणतात. 

नवरात्रीच्या व्रतादरम्यान या गोष्टी करणे टाळावे (Avoid These Things During Navratri)

1. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. खोटे बोलणे, रागराग करणे टाळावे.
2. मद्यपान, मांसाहार करणे टाळावे. तामसिक भोजनाचे सेवन करू नये.  

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: PTI

नवरात्रीमध्ये दुर्गामातेच्या नऊ रुपांची पूजा करावी | Navratri 2025 Nine Goddess Significance

  • 22 सप्टेंबर 2025 पहिला दिवस : शैलपुत्री माता
  • 23 सप्टेंबर 2025 दुसरा दिवस : ब्रह्मचारिणी माता
  • 24 सप्टेंबर 2025 तिसरा दिवस : चंद्रघंटा माता
  • 25 सप्टेंबर 2025 चौथा दिवस : कुष्मांडा माता
  • 26 सप्टेंबर 2025 पाचवा दिवस : स्कंदमाता माता
  • 27 सप्टेंबर 2025 सहावा दिवस : कात्यायनी माता
  • 28 सप्टेंबर 2025 सातवा दिवस : कालरात्री माता
  • 29 सप्टेंबर 2025 आठवा दिवस : महागौरी माता
  • 30 सप्टेंबर 2025 नववा दिवस : सिद्धिदात्री माता

Navratri 2025 Date: नवरात्रौत्सव कधी आहे? तिथी, घटस्थापना, शुभ मुहूर्त, 9 रंग आणि त्यांचे महत्त्व जाणून घ्या

(नक्की वाचा: Navratri 2025 Date: नवरात्रौत्सव कधी आहे? तिथी, घटस्थापना, शुभ मुहूर्त, 9 रंग आणि त्यांचे महत्त्व जाणून घ्या)

नवरात्रौत्सवातील नऊ रंग  | Navratri 2025 Nine Colours In Marathi

Navratri 2025: नवरात्रीच्या 9 दिवसात देवीला कोणता नैवेद्य अर्पण केल्यास इच्छा पूर्ण होतील? जाणून घ्या एका क्लिकवर

(नक्की वाचा: Navratri 2025: नवरात्रीच्या 9 दिवसात देवीला कोणता नैवेद्य अर्पण केल्यास इच्छा पूर्ण होतील? जाणून घ्या एका क्लिकवर)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com