Pregnancy Big Mistakes : गर्भावस्थेदरम्यान महिलांनी आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या काळात त्यांनी योग्य आहार, नियमित तपास आणि डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र या काळात तुम्ही किंवा कुटुंबाने थोडं जरी दुर्लक्ष केलं तर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
नुकताच एक असं प्रकरण समोर आलं आहे, ज्यामध्ये गर्भवती महिलेच्या कुटुंबाच्या एका चुकीमुळे बाळाचा डोक्याच्या भागाचा विकास झाला नाही. त्याला जन्मत: दोष आढळून आला आहे. कुटुंबाने नेमकी काय चूक केली? स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोनिया गुप्ता यांनी यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे.
सहा महिन्यात बाळाच्या डोक्याच्या भागाचा विकास झाला नाही
सहाव्या महिन्यापर्यंत गर्भातील बाळाची पूर्ण वाढ होते. मात्र या पीडित महिलेच्या बाबतीत तिच्या बाळाच्या डोक्याचा विकास झाला नव्हता. बाळात विकृती होती. डॉक्टरांनी महिलेला विचारलं होतं , तिने आतापर्यंत चेकअप केला होता की नाही? महिलेने कुटुंबाला अनेकदा याबाबत सांगितलं होतं. मात्र कुटुंबाने महिलेने डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्यास मनाई केली. याचा परिणाम म्हणजे महिलेला Anencephaly म्हणजे विना डोक्याचं बाळं राहिलं. हा गंभीर जन्मजात विकार आहे.
नक्की वाचा - Uric Acid : शरीरात युरिक अॅसिड कधीच वाढणार नाही, फक्त सकाळी रिकाम्या पोटी 1 कप प्या हे ड्रिंक
डॉक्टरांनी सांगितलं की, या स्थितीत बाळाचा मेंदू आणि डोक्यावरील भाग विकसित होत नाही. असं बाळ जिवंत राहू शकत नाही. गरोदरपणाच्या पहिल्या आठवड्यांमध्ये फॉलिक अॅसिडच्या कमतरतेमुळे ही गंभीर समस्या उद्भवू शकते. फोलिक अॅसिड गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात बाळाचं डोकं आणि पाठीच्या कण्याचा विकास करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं.
स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात की, महिलेच्या कुटुंबातील मंडळी निष्काळजीपणा करीत असतील तर अशा वेळी महिलेनेच पुढाकार घ्यायला हवा. या प्रकरणात जर कुटुंबाने दुर्लक्ष केलं नसतं तर योग्य वेळेत फोलिक अॅसिडच्या गोळ्यांमुळे बाळ वाचलं असतं आणि त्याच्या डोक्याचा विकास झाला असता. त्यामुळे प्रेग्नेन्सीची टेस्ट पॉझिटिव्ह येताच फोलिक अॅसिड टॅबलेट (डॉक्टरांच्या सल्ल्याने) घेऊ शकता. तिसऱ्या महिन्यातील सोनोग्राफी अत्यंत आवश्यक आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world