जाहिरात

Crime News: इंजिनिअर तरुणीला थायलंडमध्ये विकले, नोकरीला लावण्याच्या बहाण्याने फसवणूक

अविनाश याने तिला स्कॅमिंग कामाची पूर्व कल्पना न देता फसवणूक केली. तसेच बेकायदेशीर कामासाठी थायलंड व पुढे कम्बोडिया येथे पाठविल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुंबईतील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी सहारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

Crime News: इंजिनिअर तरुणीला थायलंडमध्ये विकले, नोकरीला लावण्याच्या बहाण्याने फसवणूक

सुमीत पवार, छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : इंजिनिअर तरुणीची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. कंपनी मालकाने हे कृत्य केले. पीडित तरुणीने भारतीय दूतावासाच्या मदतीने स्वतःची सुटका करून घेत मायदेश गाठला. यानंतर तिने नोंदवलेल्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. अविनाश रामभाऊ उढाण, असे आरोपीचे नाव आहे.

तक्रारदार तरुणी ही इलेक्ट्रिक इंजिनिअर आहे. 2021 मध्ये शहरातील लेडीज होस्टेलमध्ये राहत होती. तेव्हा तिने अॅग्रो केअर मशिनरीज या कंपनीत काम केले. यानंतर 2025 मध्ये ती उल्कानगरी रोडवरील शंकरा रेसिडेन्सी येथील एफ व्होल्ट या कंपनीत नोकरीला लागली. तेथे काम करत असताना कंपनी मालक अविनाश रामभाऊ उढाण सोबत ओळख झाली होती. तेव्हा त्याने थायलंड येथे मार्केटिंग मॅनेजरची नोकरी असल्याचे तिला सांगितले.

(नक्की वाचा-  VIDEO : खा खा खाल्लं अन् बिल भरायच्या वेळी पळ काढला; हॉटेल मालकांने चांगली अद्दल घडवली)

या जॉबकरिता त्याने तिच्याकडून रोख दीड लाख रुपये घेतले. यानंतर जॉब कन्फर्म झाल्याचे सांगितले. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उढाणने तिला थायलंड येथे जाण्यासाठी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेऊन सोडले. तेथून ती बँकॉकला पोहोचली. तेथे हरप्रित सिंग हा तिला घेण्यासाठी आला होता. त्याने तिला कम्पोट गाती (कम्बोडिया) टॅक्सीने क्रिएटिव्ह माइंडसेट या कंपनीत नेऊन सोडले.

या कंपनीत तिच्याकडून स्कॅमिंगचे काम करून घेतले जात होते. उढाणने आपल्याला स्कॅमिंग काम करण्यासाठीच थायलंडला विक्री केल्याची तिची खात्री झाली. यानंतर दोन महिन्यांनी संबंधित कंपनीला 2 हजार अमेरिकन डॉलर भरून सुटका करून घेतली. कम्बोडिया येथील भारतीय दूतावासाच्या मदतीने 21 ऑक्टोबर रोजी ती मुंबईला परतली.

(नक्की वाचा- Air India Viral : 'त्या' झुरळाला मरेपर्यंत फाशी! एअर इंडियाचं विमान पुन्हा एकदा चर्चेत)

अविनाश याने तिला स्कॅमिंग कामाची पूर्व कल्पना न देता फसवणूक केली. तसेच बेकायदेशीर कामासाठी थायलंड व पुढे कम्बोडिया येथे पाठविल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुंबईतील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी सहारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com