जाहिरात

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाला भावाला कोणती राखी बांधावी? ट्रेंडी, स्टायलिश आणि वैदिक राखीमधील फरक वाचा

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधन सणानिमित्त तुम्हाला बाजारामध्ये कित्येक प्रकारच्या राखी मिळतील. पण तुमच्या भावाच्या मनगटावर कोणत्या प्रकारची राखी बांधावी, जेणेकरून त्याचे नशीब चमकेल? हे जाणून घेण्यासाठी ही माहिती नक्की वाचा...

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाला भावाला कोणती राखी बांधावी? ट्रेंडी, स्टायलिश आणि वैदिक राखीमधील फरक वाचा
"Raksha Bandhan 2025: वैदिक राखी बांधण्याचे फायदे"

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधन सणानिमित्त शहरांपासून ते गावपाड्यातील बाजारपेठांमध्येही वेगवेगळ्या प्रकारच्या राखी उपलब्ध होतात. रेशीम धाग्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या राखीची जागा आता सोने, चांदी, कार्टून, हीरो-हीरोईन यासारख्या गोष्टींनी घेतली आहे. वेगवेगळ्या थीमचे लोकांमध्ये आकर्षण वाढू लागले आहे. पण अशा प्रकारच्या राखीमुळे तुमच्या भावाला कोणत्याही प्रकारे फायदे होणार नाही, हे तुम्हाला माहिती आहे का? भावाच्या मनगटावर बांधल्या जाणाऱ्या या स्टायलिश राखीऐवजी वैदिक किंवा पारंपरिक पद्धतीची राखी बांधली तर ती भावासाठी कैकपटीने शुभ ठरेल. वैदिक राखी म्हणजे काय, काय आहेत याचे फायदे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

रक्षासूत्र वैदिक राखी म्हणजे काय?

काशी येथील अखिल भारतीय विद्वत परिषदेचे महासचिव प्रा. कामेश्वर उपाध्याय यांच्या मते, सनातन परंपरेत रक्षासूत्र (Raksha Sutra) आणि रक्षापोटली बांधण्याची परंपरा आहे. हे रक्षासूत्र मंत्रांनी अभिमंत्रित केल्यानंतरच भावाच्या मनगटावर बांधले जाते. आजकाल लोक यास वैदिक राखी असेही म्हणतात. प्राचीन काळी जेव्हा एखादी व्यक्ती युद्धाला जात असे तेव्हा पुजारी किंवा घरातील ज्येष्ठ साधिका माता त्याच्या मनगटावर मंत्रांनी पूजा केलेले आणि अभिषेक केलेले रक्षासूत्र बांधत असत. प्रा. कामेश्वर यांच्या मते मंत्रांनी अभिषेक केलेल्या राखीशिवाय रक्षाबंधन सणाच्या बंधनाला काहीही अर्थ नाही.

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाचा इतक्या तासांचा आहे शुभ मुहूर्त, भावाच्या प्रगतीसाठी त्याच्या राशीनुसार अशी निवडा राखी

(नक्की वाचा: Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाचा इतक्या तासांचा आहे शुभ मुहूर्त, भावाच्या प्रगतीसाठी त्याच्या राशीनुसार अशी निवडा राखी)

रक्षासूत्र बांधण्यासाठी  पौराणिक मंत्र 

ॐ येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः
तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल

वैदिक रक्षासूत्र शुभ का मानले जाते?

रक्षा सूत्रामध्ये मंत्राची शक्ती  (Rakhi Mantra) असते. आपल्या देशामध्ये हा मंत्र सूत, रेशीम किंवा लोकरीच्या धाग्यामध्ये प्रतिष्ठित केला जातो. या रक्षा सूत्रांमध्ये मंत्राची शक्ती धारण करण्याची क्षमता असते. अशा पद्धतीची राखी भावासाठी शुभ ठरते. 

Raksha Bandhan 2025: यंदा रक्षाबंधन कधी आहे? योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि राखी काढण्याची माहिती जाणून घ्या

(नक्की वाचा: Raksha Bandhan 2025: यंदा रक्षाबंधन कधी आहे? योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि राखी काढण्याची माहिती जाणून घ्या)

राखी विकत घेताना या गोष्टींची काळजी घ्यावी

रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुमच्या भावाच्या मनगटावर कोणती राखी सर्वात चांगली दिसेल याचा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे. पण मोठे डोळे, टोकदार दात आणि राक्षसी हास्य असलेली लबूबू राखी किंवा कार्टून शोमधील पात्रावर आधारित राखी घेणे टाळावे.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com