जाहिरात

Rama Ekadashi 2025: रमा एकादशीचे व्रत कसे करावे? पूजा विधी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Rama Ekadashi 2025: रमा एकादशीचे व्रत महत्त्वाचे का असते? आश्विन महिन्यातील कृष्णपक्षाच्या एकादशी तिथीच्या या व्रताची पूजा कशी करावी? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Rama Ekadashi 2025: रमा एकादशीचे व्रत कसे करावे? पूजा विधी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या
"Rama Ekadashi 2025: रमा एकादशी पूजा विधी शुभ मुहूर्त आणि पारण कालावधी"
NDTV

Rama Ekadashi 2025 Date And Puja Time: हिंदू धर्मामध्ये एकादशीचे व्रताचे अतिशय महत्त्व आहे. आश्विन महिन्यातील कृष्णपक्षाची एकादशी तिथी अधिक शुभ आणि फलदायी असते, यास 'रमा एकादशी' असे म्हणतात. मान्यतेनुसार भगवान विष्णू यांची पत्नी आणि धनाची देवता लक्ष्मीमाता यांचे 'रमा' असेही नाव आहे आणि हे नाव भगवान श्री हरिंना अतिशय प्रिय आहे. लक्ष्मीमातेच्या नावाशी जोडलेल्या या एकादशीचे व्रत विधीवत केल्यास सुखसमृद्धी-धनधान्याचा वर्षाव होते, असे म्हणतात. लक्ष्मीमातेची कृपादृष्टी होणाऱ्या रमा एकादशीचे व्रत कसे करावे, पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊया... 

रमा एकादशी 2025 तिथी कालावधी | Rama Ekadashi 2025 Tithi Start Time And End Time

  • 16 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10.35 वाजता एकादशी तिथीस प्रारंभ झाला आहे.
  • 17 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.12 वाजता एकादशी तिथी समाप्त होणार आहे. 

रमा एकादशी व्रताची पारण वेळ | Rama Ekadashi 2025 Paran Time

18 ऑक्टोबर 2025: सकाळी 6.33 वाजेपासून ते सकाळी 8.53 वाजेपर्यंत व्रताचा प्रारण कालावधी आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी शनिवारी व्रताचे पारण करावे. 

Latest and Breaking News on NDTV

रमा एकादशी व्रताची पूजा विधी | Rama Ekadashi 2025 Puja Vidhi 

  • रमा एकादशी व्रताच्या दिवशी पहाटे उठून स्नान करा, स्वच्छ कपडे परिधान करा. 
  • स्नानानंतर विधीवत व्रताचा संकल्प करावा. 
  • देवघर किंवा घराच्या ईशान्य दिशेला चौरंगावर पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरावे. त्यावर लक्ष्मीमाता आणि भगवान विष्णूची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी. 
  • देवतांच्या मूर्तीवर शुद्ध पाणी शिंपडावे. 
  • यानंतर भगवान विष्णू आणि लक्ष्मीमातेला हळद-कुंकू, चंदन अर्पण करावे. पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करावी.  
  • रमा एकादशीच्या पूजेसाठी नैवेद्यामध्ये पिवळ्या रंगाची मिठाई,फळांसह तुळसही अर्पण करा. 
  • यानंतर रमा एकादशीच्या व्रताची कथा ऐकावी किंवा श्री हरी आणि माता लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करावा.
  • आरती करून प्रसादाचे वाटप करावे. दुसऱ्या दिवशी पारण कालावधीदरम्यान पारण करावे. 
  • मान्यतेनुसार रमा एकादशी व्रताच्या दिवशी विधीवत पूजन आणि दीपदान केल्यास भगवान विष्णू आणि लक्ष्मीमातेची कृपा होते, जीवनामध्ये सुखशांती आणि धनधान्य प्राप्त होते, असेही म्हणतात. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.) 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com