जाहिरात

Relationship Tips: पतीने मस्करीमध्येही पत्नीला बोलू नये या 4 गोष्टी, Relationship Coachने सांगितली मोठी कारणं

Relationship Tips: मस्करीमस्करीमध्येही पतीने पत्नीला काही गोष्टी बोलणं टाळलं पाहिजे. जाणून घेऊया यामागील कारणे...

Relationship Tips: पतीने मस्करीमध्येही पत्नीला बोलू नये या 4 गोष्टी, Relationship Coachने सांगितली मोठी कारणं
"Relationship Tips: नात्यामध्ये दुरावा निर्माण करू शकतील या चार गोष्टी"

Relationship Tips: पती-पत्नीच्या नात्यामध्ये प्रेमासह विश्वास आणि एकमेकांप्रति आदर असणंही आवश्यक आहे. कित्येकदा कळतनकळत प्रत्येकाकडून अशा गोष्टी घडतात, ज्यामुळे नात्यामध्ये गैरसमज निर्माण होऊ लागतात. विशेषतः पती मस्करीमध्ये असे काहीतरी बोलून जातो, ज्यामुळे पत्नीचे मन दुखावते. रिलेशनशिप कोच कोमल यांनीही त्यांच्या पोस्टद्वारे नात्यातील चार महत्त्वपूर्ण गोष्टींचा उल्लेख केलाय. कोमल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, मस्करीचे स्वरुप काहीही असो, पण त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाणार असतील तर तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. पतीने पत्नीला मस्करीमध्येही कोणत्या गोष्टी बोलू नये आणि यामुळे कोणते परिणाम होऊ शकतात, याबाबत माहिती जाणून घेऊया... 

पत्नीला तुम्ही या गोष्टी ऐकवून दाखवताय? नात्यामध्ये येईल दुरावा  
 
पत्नीची स्वतःच्या आईशी तुलना करणे
 

रिलेशनशिप कोच कोमल यांनी सांगितलं की, पती बहुतांश वेळेस मस्करीमध्ये बोलतात की तु तयार केलेला स्वयंपाक चांगला आहे पण त्यामध्ये आईच्या हाताची चव नाही. तुमच्यासाठी ही गोष्ट सामान्य असू शकते पण यामुळे पत्नीचे मन दुखावले जाऊ शकते. तिने केलेल्या प्रयत्नांना महत्त्वच नाही, असे पत्नीला वाटू शकते.  तुमच्या आईसोबत पत्नीची तुलना करू नये. त्यामुळे पार्टनरच्या कष्टाचा आणि प्रेमाचा आदर करावा.  

पत्नी किंवा तिच्या कुटुंबीयांचा अनादर करू नये 

कधीकधी पतीला पत्नीच्या कुटुंबीयांना टोमणे मारण्याची सवय असते. खरंतर ही मस्करी करूच नये. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या कुटुंबीयांशी जोडलेला असतो. आपल्या नवऱ्याने आपल्याच कुटुंबीयांना वाईट पद्धतीने टोमणे मारल्यास तुमची पत्नी दुखावलीच जाणार आहे. त्यामुळे मनामध्ये एखादी गोष्ट असेल तर आदरपूर्वक संवाद साधावा. पत्नीच्या कुटुंबीयांचा अनादर करणे तुमच्या नात्यासाठी धोक्याचे ठरू शकते.  

पत्नीच्या दिसण्यावर, शरीरावर मस्करी करणे 

पत्नीच्या शरीराचे वजन, रंग, दिसण्यावरुनही कधी मस्करी करू नका. यामुळे तिचा आत्मसन्मान दुखावला जाऊ शकतो.  

"तू अति रिअ‍ॅक्ट करतेय"

तू उगाचच अति रिअ‍ॅक्ट करत आहे, असे म्हटल्यानंतर कोणत्याही महिलेच्या भावना दुखावल्या जाणं स्वाभाविक आहे. माझ्या भावनांना काहीही महत्त्व नाही, असेच तिला वाटेल. त्यामुळे वाद घालण्याऐवजी तुमच्या पत्नीचे म्हणणं काय आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा. संवादामुळे नाते मजबूत होते. 

रिलेशनशिप कोचने सांगितलेल्या माहितीनुसार, नाते टिकवून ठेवण्यासाठी शब्दांचा काळजीपूर्वक वापर करावा. मस्करीमध्ये म्हटलेली एखादी गोष्ट पत्नीचे मन दुखावू शकते. पतीने पत्नीला आदर आणि प्रेमाने वागणूक दिली दोघांचे नाते आयुष्यभरासाठी सुंदर पद्धतीने टिकू शकते. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com