Republic Day 2026 Speech: प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व संविधान, लोकशाही आणि नागरी हक्कांशी जोडलेले आहे. या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांसह कार्यालय तसेच सोसायटींमध्येही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. भाषण स्पर्धांचे आयोजन केले जाते. प्रजासत्ताक दिनानिमित्त तुमची मुलंही भाषण स्पर्धेमध्ये सहभागी होणार असतील तर त्यांच्यासाठी साधे-सोपे शब्दांतील भाषणांची उदाहरणं या लेखाद्वारे मिळतील. ज्याद्वारे तुमच्या मुलांचे भाषण नक्कीच प्रभावी होण्यास मदत मिळेल...
1.आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्यवर शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, | Republic Day 2026 Speech 1
26 जानेवारी 1950 हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्णदिन आहे. या दिवशी भारताने स्वतःचे संविधान अंमलात आणले आणि आपण खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक राष्ट्र झालो. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर आपल्याला स्वतःचे कायदे स्वतः ठरवण्याचा अधिकार मिळाला. हे संविधान केवळ कायद्यांचा ग्रंथ नसून भारतीय लोकशाहीचा पाया आहे. आजच्या दिवशी आपण संविधानाची मूल्ये आचरणात आणण्याचा संकल्प केला पाहिजे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य, लोकांसाठी आणि लोकांनी चालवलेले शासन. मतदानाचा हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि समान अधिकार ही लोकशाहीची मोठी शक्ती आहे. मात्र अधिकारांसोबत जबाबदारीही येते. प्रामाणिक मतदार, जागरूक नागरिक आणि कायद्याचा आदर करणारी जनता असेल तरच लोकशाही मजबूत राहते.
Happy Republic Day 2026 Wishes Quotes
2. प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व | Republic Day 2026 Speech 2 | 2 Minute Speech On Republic Day
आदरणीय प्रमुख पाहुणे,
आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. 26 जानेवारी 1950 रोजी भारताने संविधान स्वीकारून लोकशाही राष्ट्र म्हणून नवी ओळख मिळवली. हे संविधान आपल्याला अधिकार देते, पण त्याचबरोबर कर्तव्यांची आठवणही करून देते. स्वातंत्र्य शहिदांच्या बलिदानातून मिळालंय. त्यामुळे देशासाठी प्रामाणिकपणे काम करणे हीच खरी देशभक्ती आहे. एकता, समानता आणि बंधुता ही आपल्या राष्ट्राची मूल्य आहेत. चला ही मूल्य जपत भारताला प्रगतीच्या मार्गावर नेऊया.
जय हिंद!
Happy Republic Day 2026 Wishes

Photo Credit: Canva
(नक्की वाचा: Republic Day 2026 Wishes,Greetings: संविधानाचा सन्मान म्हणजे देशाचा सन्मान, प्रजासत्ताक दिनाचे शुभेच्छा संदेश)
3. तरुणाई आणि भारताचे भविष्य | Republic Day 2026 Speech 3 | Republic Day Speech In Marathi 10 Linesआदरणीय उपस्थितांनो,
आजचा भारत तरुणांच्या हातात आहे. देशाची दिशा आणि दशा ठरवण्याची ताकद आपल्या तरुणांमध्ये आहे. शिक्षण, तंत्रज्ञान, नवकल्पना आणि कष्ट यांच्या जोरावर भारत महासत्ता बनू शकतो. पण यासाठी फक्त स्वप्न पाहून चालणार नाही, तर ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. संविधानाने दिलेले अधिकार जपताना आपली कर्तव्येही प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजेत. चला जबाबदार नागरिक बनून भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान देऊया.
जय हिंद!
Happy Republic Day 2026 Wishes

Photo Credit: Canva
4. विविधतेत एकता | Republic Day 2026 Speech 4 | 26 January 2026 Republic Day speechमाझ्या प्रिय भारतीयांनो,
भारताची खरी ओळख म्हणजे विविधतेत एकता. इथे वेगवेगळे धर्म, भाषा, संस्कृती असूनही आपण एक आहोत. ही एकता टिकवणे हीच आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे. संविधान आपल्याला समान अधिकार देते आणि भेदभाव न करण्याचा संदेश देते. आजच्या काळात एकमेकांचा आदर, सहिष्णुता आणि बंधुभाव फार महत्त्वाचा आहे. चला मतभेद विसरून एकत्र उभे राहूया आणि भारताची एकता अधिक मजबूत करूया.
जय हिंद!
Republic Day 2026 Wishes
(नक्की वाचा: Republic Day 2026 Speech: नागरिक म्हणून जबाबदारींची आठवण करून देणारा दिवस, प्रजासत्ताक दिनी असे करा दमदार भाषण)
आदरणीय मान्यवरांनो,
भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. ते आपल्याला स्वातंत्र्य, समानता आणि न्याय देते. संविधानामुळेच भारत एक मजबूत लोकशाही राष्ट्र बनलाय. पण संविधान केवळ पुस्तकात न राहता आपल्या आचरणात उतरले पाहिजे. कायद्याचा सन्मान करणे, इतरांचे अधिकार जपणे आणि कर्तव्ये पार पाडणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. तसेच देशभक्ती म्हणजे केवळ घोषणा देणे नाही, तर रोजच्या आयुष्यात जबाबदारीने वागणे होय. नियम पाळणे, प्रामाणिकपणे काम करणे, स्वच्छता राखणे आणि समाजासाठी योगदान देणे हीच खरी देशसेवा आहे. सैनिक सीमेवर देशाचे रक्षण करतात, तर आपण नागरिक म्हणून देश मजबूत करण्याचे काम करतो. प्रत्येक छोटं चांगलं काम भारताला पुढे नेऊ शकतं. चला, कृतीतून देशप्रेम दाखवूया आणि संविधानाच्या मूल्यांवर चालण्याची शपथ घेऊया.
जय हिंद!
Happy Republic Day 2026 Wishes Status
(नक्की वाचा: Happy Republic Day 2026 Wishes Quotes: भारताची खरी ओळख विविधतेत एकता, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!)

Photo Credit: Canva
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world