जाहिरात

Rose Day 2025: कोणत्या रंगाच्या गुलाबाचा काय असतो अर्थ? जाणून घ्या माहिती

Happy Rose Day: व्हॅलेंटाइन वीकमधील पहिल्या दिवशी रोझ डे साजरा केला जातो. कोणत्या रंगाच्या गुलाबाचा नेमका काय अर्थ असतो, हे जाणून घेऊया... 

Rose Day 2025: कोणत्या रंगाच्या गुलाबाचा काय असतो अर्थ? जाणून घ्या माहिती

Happy Rose Day 2025: व्हॅलेंटाइन वीक (Valentine's Week) प्रेमी युगुलांसाठी अतिशय खास असतो. या आठवड्यातील पहिल्या दिवशी म्हणजे दरवर्षी 7 फेब्रुवारीला रोझ डे साजरा केला जातो. 'रोझ डे'पासूनच कित्येकांच्या प्रेमकहाणीस सुरुवात होते. तरुण तसेच तरुणी त्यांच्या पार्टनरला गुलाब देऊन मनातील भावना व्यक्त करतात. पण 'रोझ डे'ला केवळ लाल रंगाचेच गुलाबचे फुल दिले जाते, असा नियम नाहीय. तर वेगवेगळ्या रंगांचेही गुलाबाचे फुल तुम्ही तुमच्या पार्टनरला देऊ शकता. या वेगवेगळ्या रंगांच्या गुलाबाच्या फुलाचे महत्त्व आणि अर्थही वेगवेगळे असतात. तुमच्या मनातील कोणत्या भावना व्यक्त करण्यासाठी कोणत्या रंगाचे गुलाबाचे फुल निवडावे, जाणून घेऊया सविस्तर माहिती... 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

'रोझ डे'निमित्त वेगवेगळ्या रंगांच्या गुलाबाचे अर्थ जाणून घेऊया 

लाल रंगाचे गुलाब (Red Rose)
'रोझ डे'निमित्त तुमच्या मनातील प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी लाल रंगाचे गुलाब दिले जाते. कारण लाल रंग प्रेमाचा प्रतीक मानला जातो.  

गुलाबी रंगाचे गुलाब (Pink Rose)
एखादा व्यक्ती तुम्हाला आवडत असेल तर त्याला/तिला गुलाबी रंगाचे गुलाब द्यावे. एखाद्याप्रती तुम्हाला कृतज्ञतेची भावना व्यक्त करायची असल्यास गुलाबी रंगाचे गुलाब देऊ शकता. 

(नक्की वाचा: Maha Shivratri 2025: महाशिवरात्री कधी आहे? जाणून घ्या तारीख, पूजा विधी आणि शुभ मुहूर्त)

पिवळ्या रंगाचे गुलाब (Yellow Rose) 
पिवळ्या रंगाचे गुलाब मैत्रीचे प्रतीक मानले जाते. तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना पिवळ्या रंगाचे गुलाब देऊन रोझ डे साजरा करू शकता. 

पांढऱ्या रंगाचे गुलाब (White Rose) 
पांढऱ्या रंगाचे गुलाब शांतीचे प्रतीक मानले जाते. नात्यातील प्रामाणिकपणा दर्शवण्यासाठीही तुम्ही पांढऱ्या रंगाचे गुलाब देऊ शकता.

(नक्की वाचा: New Year 2025 Festivals And Important Days: 2025मधील सणउत्सव आणि दिनविशेषांची संपूर्ण यादी पाहा एका क्लिकवर)

नारिंगी रंगाचे गुलाब (Orange Rose) 
ऊर्जा, आनंद आणि उत्साहाचे प्रतीक म्हणजे नारिंगी रंग. नात्यामध्ये उत्साह निर्माण व्हावा याकरिता तुम्ही पार्टनरला नारिंगी रंगाचे गुलाब देऊ शकता. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: