Sankashti Chaturthi Shubh Muhurat 2024 : हिंदू धर्मामध्ये संकष्ट चतुर्थीच्या व्रताचे अतिशय विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी असते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेश स्त्रोताचे पठण केल्यास सुख-समृद्धी प्राप्त होते, असे मानतात. सप्टेंबर महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी कधी आहे? याचे महत्त्व आणि पूजा विधीबाबत माहिती जाणून घेऊया...
कधी आहे संकष्ट चतुर्थी (September Month Sankashti Chaturthi)
अनंत चतुर्दशीनंतर सप्टेंबर महिन्यामध्ये 21 सप्टेंबरला संकष्ट चतुर्थी आहे. 21 सप्टेंबरला चंद्रोदय 8.34 वाजता होणार आहे.
(नक्की वाचा: पितृपक्षामध्ये दिवा लावताना या गोष्टी ठेवा लक्षात, पितृदोष कमी होण्यास मिळेल मोठी मदत)
कधी करावी पूजा विधी
- संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पहाटे उठून स्नान करावे.
- स्वच्छ कपडे परिधान करा.
- पूजेचे स्थान स्वच्छ करून तेथे गंगाजल शिंपडावे.
- गणेशमूर्ती किंवा गणेश प्रतिमा स्थापित करावी.
(नक्की वाचा: हनुमान चालीसाचे पठण करताना अजिबात करू नका या चुका, जाणून घ्या नियम)
- यानंतर विधिवत गणपती बाप्पाची पूजा करावी.
- पूजा करताना ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करावा.
- गणपती बाप्पाला मोदकांचा नैवेद्य अर्पण करावा.
(नक्की वाचा: प्रभू श्रीरामाच्या नावावरून तुमच्या मुलाचे ठेवा सुंदर आणि अर्थपूर्ण नाव)
संकष्ट चतुर्थीचा व्रत केल्यास घरामध्ये सुख-शांती आणि समृद्धी येते असे म्हणतात.
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world