
Sarva Pitru Amavasya 2025: हिंदू परंपरेमध्ये भाद्रपद महिन्यातील अमावस्येचे अतिशय धार्मिक महत्त्व आहे. कारण पितृपक्षामध्ये केल्या जाणाऱ्या श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान विधींचा हा शेवटचा दिवस असतो. विधीपूर्वक पितरांची पूजा केल्यानंतर पृथ्वीवर आलेल्या पितरांना निरोप देण्याची परंपरा आहे. ज्या लोकांना त्यांच्या कुटुंबातील मृत पावलेल्या सदस्यांची निधनाची तारीख माहीत नसते, ते मंडळी या दिवशी श्राद्ध विधी करू शकतात. सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध कधी आणि कसे करावे? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
सर्वपित्री अमावस्या तिथी | Sarva Pitru Amavasya 2025 Tithi
पंचांगानुसार पितरांच्या पूजेसाठी महत्त्वाची मानली जाणारी सर्वपित्री अमावस्या तिथीस 21 सप्टेंबर 2025 उत्तररात्री 12:16(AM) वाजता सुरुवात होणार आहे आणि 22 सप्टेंबर उत्तरात्री 01:23 (AM) वाजता तिथी समाप्त होईल. उदया तिथीनुसार सर्वपित्री अमावस्येशी संबंधित पूजा आणि श्राद्ध 21 सप्टेंबर 2025 रोजी केले जाईल.
सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी श्राद्ध विधी कसा करावा? | Sarva Pitru Amavasya 2025 Shraddh
- मान्यतेनुसार सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पहाटे आंघोळ करावी.
- आपल्या घरातील दिवंगत सदस्यांचे फोटो दक्षिण दिशेला ठेवून त्यावर गंगाजल अर्पण करावे.
- यानंतर फुले आणि फुलांच्या माळाही प्रतिमेस अर्पण करा.
- धूप, दिवे प्रज्वलित करा.
- यानंतर नैवेद्याचे पाच पान काढून ठेवा. यामध्ये पितरांसाठी विशेष नैवेद्याचे पान असावे.
- सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी ब्राह्मणाला आदरपूर्वक आमंत्रित करुन त्यांनाही भोजन द्यावे. स्वतःच्या क्षमतेनुसार त्यांना अन्न-धन इत्यादी गोष्टींचे दान करावे.
(नक्की वाचा: Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्या कधी आहे? श्राद्ध, तर्पण आणि पिंडदानची संपूर्ण विधी जाणून घ्या)
सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी ही कामं अवश्य करा
- सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी शक्य असल्यास एखाद्या नदीकाठावर किंवा पिंपळाच्या वृक्षाखाली श्राद्ध विधी करा.
- सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितरांचे तर्पण, पिंडदान इत्यादी गोष्टी श्रद्धेनेच कराव्या.
- पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी गाय, श्वान, कावळे, मुंगी, देवतांनाही नैवेद्य अर्पण करणे विसरू नये.
- सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी शक्य असल्यास एक, तीन किंवा पाच ब्राह्मणांना भोजनासाठी आमंत्रित करावे.
- भोजनासाठी आमंत्रित करणे शक्य नसल्यास ब्राह्मणांना अन्न-धन दान करावे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world