जाहिरात

Sharad Purnima 2024 : कोजागरी पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या योग्य तारीख आणि शुभ मुहूर्त 

Sharad Purnima Muhurta 2024 : आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला चंद्रदेवाची उपासना केली जाते. जाणून घेऊया यंदा कोजागरी पौर्णिमा कधी आहे, काय आहे शुभ मुहूर्त आणि महत्त्व...

Sharad Purnima 2024 : कोजागरी पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या योग्य तारीख आणि शुभ मुहूर्त 

Sharad Purnima 2024 Date And Time: वर्षभरामध्ये येणाऱ्या पौर्णिमा महत्त्वाच्या असल्या तरीही शरद पौर्णिमेला (Sharad Purnima) विशेष महत्त्व आहे. ही पौर्णिमा कोजागरी पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. या पौर्णिमेच्या दिवशी उपवास करण्याची परंपरा आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच चंद्रदेवतेचीही पूजा केली जाते. यंदा कोजागरी पौर्णिमा कधी आहे? काय आहे शुभ मुहूर्त आणि महत्त्व? जाणून घेऊया सविस्तर माहिती... 

शरद पौर्णिमा 2024 कधी आहे? - Sharad Purnima Date 2024 

यंदा शरद पौर्णिमा 16 ऑक्टोबर 2024 रोजी साजरी करण्यात येणार आहे.  

शरद पौर्णिमा 2024 शुभ मुहूर्त  - Sharad Purnima Muhurta 2024

शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त 16 ऑक्टोबरला रात्री 8.40 वाजता सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 4.55 वाजेपर्यंत आहे.   

Kojagiri Purnima 2024 Wishes: लक्ष्मीदेवीची राहो कृपादृष्टी! कोजागरी पौर्णिमेच्या पाठवा खास शुभेच्छा

(नक्की वाचा: Kojagiri Purnima 2024 Wishes: लक्ष्मीदेवीची राहो कृपादृष्टी! कोजागरी पौर्णिमेच्या पाठवा खास शुभेच्छा)

चंद्र दर्शनाची वेळ - Chandra Darshan Timing on Sharad Purnima

शरद पौर्णिमेचे व्रत चंद्र दर्शनानंतरच सोडण्याची परंपरा आहे. चंद्रोदय (chandrouday) संध्याकाळी 5.04 वाजता होणार आहे. 

शरद पौर्णिमेचा पूजा मुहूर्त - Sharad Purnima Puja Muhurta

शरद पौर्णिमेच्या (16 ऑक्टोबर) दिवशी लक्ष्मी पूजा रात्री 11.42 वाजेपासून ते रात्री 12.32 वाजेपर्यंत करावी. 

शरद पौर्णिमेचे महत्त्व - Sharad Purnima Significance

शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र अन्य दिवसांच्या तुलनेमध्ये अधिक तेजस्वी असतो. तसेच या दिवशी चंद्राच्या किरणांमधून अमृताचा वर्षाव होतो, अशी मान्यता आहे.   

धार्मिक मान्यतेनुसार शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मीमाता पृथ्वीवर अवरते. जे कोणी या दिवशी धनाच्या देवतेची पूजा करतात, देवी लक्ष्मी त्यांच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करते; असे म्हणतात.

(नक्की वाचा: Tulsi Plant Rules: घरामध्ये तुळशीचे रोप असेल तर या गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल मोठे नुकसान)

पूजेची मांडणी कशी करावी? 

  • एका पाटावर किंवा चौरंगावर पूजेची मांडणी करावी. 
  • लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोडपानावर सुपारी ठेवावी. 
  • कुबेराचेही प्रतीक म्हणून विड्याच्या जोडपानावर सुपारी ठेवावी. 
  • तांदुळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या ठेवा ब्यामध्ये पाणी भरावे आणि त्यामध्ये आंब्याच्या डहाळ्याही ठेवा.  
  • यानंतर रात्री 12 ते 12.30 वाजेदरम्यान दुधाचे भांडे चंद्रकिरणामध्ये ठेवावे. 
  • रात्री 12.30 वाजता पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवा आणि हळद कुंकू, पांढरी फुले, अक्षता, अष्टगंध वाहून देवांची पूजा करावी. 
  • तुलसीपत्र दुपारीच तोडून ठेवावे. दुधामध्ये एक तुलसीपत्र सोडावे आणि नैवेद्य अर्पण करावा.  

(नक्की वाचा:  प्रभू श्रीरामाच्या नावावरून तुमच्या मुलाचे ठेवा सुंदर आणि अर्थपूर्ण नाव)

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com