How To Reduce Wrinkle: प्रत्येकाने आपल्या त्वचेची काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. कारण चमकदार त्वचेमुळे केवळ व्यक्तिमत्त्वच आकर्षक दिसत नाही तर आत्मविश्वास देखील वाढतो. त्वचा निरोगी असावी आणि चमकदार दिसावी, याकरिता आहारामध्ये आवश्यक पोषणतत्त्वांचा समावेश करणे तसेच त्वचेची देखील वेळोवेळी काळजी घेणे; तितकेच महत्त्व आहे. विशेषतः तिशीनंतर त्वचा तरुण दिसावी, याकरिता आहारामध्ये पोषकघटकांचा समावेश करावा. ज्याद्वारे शरीरामध्ये कोलेजनचे उत्पादन वाढण्यास मदत मिळेल. त्वचेच्या आरोग्यासाठी कोलेजन हे एक अतिशय आवश्यक व महत्त्वपूर्ण प्रोटीन आहे. कोलेजनमुळे त्वचा तरुण राहते तसेच सैल देखील पडत नाही.
(नक्की वाचा: सावधान! या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे तुम्हाला येतेय जास्त झोप, डाएटमध्ये या पदार्थांचा करा समावेश)
त्वचेसाठी कोलेजन हे प्रोटीन का आहे महत्त्वाचे?
वाढत्या वयोमानानुसार शरीरातील कोलेजनच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागतात. यामुळे त्वचेवर सुरकुत्या येणे, त्वचा सैल पडणे यासारख्या समस्या निर्माण होतात. त्वचेवर सुरकुत्या दिसू नये, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. सुरकुत्या कमी करण्यासाठी लोक कित्येक महागड्या ट्रीटमेंट देखील करतात. पण याऐवजी आपण आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश केला तर सुरकुत्यांची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते. डाएटमध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश करावा, जाणून घेऊया सविस्तर माहिती....
(नक्की वाचा: बेलीफॅटपासून ते पचनप्रक्रियेपर्यंतच्या सर्व समस्या होतील दूर, या आसनांचा करा सराव)
कोलेजन वाढवणारे सुपरफुड्स (Foods With Collagen To Remove Wrinkles)
1. पालक
पालकमध्ये 'व्हिटॅमिन सी', 'व्हिटॅमिन ए' सह ल्युटीन आणि झिअॅक्सेंथिन हे पोषणतत्त्व देखील असतात; ज्यामुळे शरीरामध्ये कोलेजनचे उत्पादन वाढण्यास मदत मिळते.
2. 'व्हिटॅमिन सी'युक्त सॅलेड
'व्हिटॅमिन सी'युक्त फळे तसेच भाज्याचे सॅलेड करून खाल्ल्यास शरीरामध्ये कोलेजनचे उत्पादन वाढू शकते.
(नक्की वाचा: Mother's Day 2024: पहिल्यांदाच आई होताय? महिलांनो अशी घ्या शारीरिक-मानसिक आरोग्याची काळजी)
3. मसूर डाळ
मसूर डाळीमध्ये प्रोटीन, लोह आणि फॉलिक अॅसिड या पोषणतत्त्वाचे प्रमाण जास्त असते. हे घटक त्वचेच्या आरोग्यासाठी पोषक आणि लाभदायक आहेत.
4. तीळ
तिळामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिडचे घटक आहेत, जे त्वचेसाठी अतिशय उपयोगी आहेत.
5. नारळ पाणी
नारळाच्या पाण्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत मिळते. यामध्ये त्वचेसाठी पोषक असणाऱ्या व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशिअम यासारख्या घटकांचा उत्तम साठा आहे.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आपल्या डाएटमध्ये या सुपरफुड्सचा समावेश केल्यास त्वचा निरोगी आणि चिरतरुण राहण्यास मदत मिळेल. यामुळे त्वचेवरील सुरकुत्यांची समस्या देखील कमी होईल. याव्यतिरिक्त आवश्यक प्रमाणात पाणी पिणे, पुरेशा प्रमाणात झोप घेणे आणि नियमित व्यायाम करणेही त्वचेसाठी फायदेशीर ठरते.
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.