Health News: वय वाढणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. वाढत्या वयाची लक्षणं सर्वप्रथम चेहऱ्यावर दिसतात. त्वचा सैल पडण्यासह चेहऱ्यावर सुरकुत्याही दिसू लागतात. वाढत्या वयोमानानुसार चेहऱ्यामध्ये बदल होणं सामान्य बाब आहे. पण काही लोकांना कमी वयातच म्हातारपण येऊ लागते. यामागील मोठं कारण म्हणजे शरीरातील व्हिटॅमिन्सची कमतरता. काही व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी होणे, निस्तेज दिसणं आणि चेहऱ्यावर सुरकुत्या दिसणं यासारख्या समस्या उद्भवतात. कोणत्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे लवकर म्हातारपण येऊ शकते, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
कोणत्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे म्हातारपण येते? Which Vitamin Deficiecny Make You Older
व्हिटॅमिन Cची कमतरता ( Vitamin C Deficiency)
व्हिटॅमिन C च्या कमतरतेमुळे त्वचा निर्जीव होऊ लागते. व्हिटॅमिन सी त्वचेसाठी अतिशय आवश्यक आहे. या व्हिटॅमिनमुळे त्वचेमध्ये कोलेजनचे उत्पादन होण्यास मदत मिळते. व्हिटॅमिन Cच्या कमतरेमुळे त्वचेतील लवचिकपणा कमी होऊ लागते, ज्यामुळे सुरकुत्या येण्यासह त्वचा सैल देखील पडते.
व्हिटॅमिन Cची कमतरता कशी भरून काढावी?
डाएटमध्ये संत्रे, लिंबू, आवळा, स्ट्रॉबेरी, टोमॅटो अशा व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थांचा समावेश करावा. यासह व्हिटॅमिन सीयुक्त स्किन केअर प्रोडक्ट्सचाही वापर करणं फायदेशीर ठरेल.
व्हिटॅमिन E (Vitamin E Deficiency)
व्हिटॅमिन E देखील एक महत्त्वपूर्ण आणि शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट्स आहे, ज्यामुळे त्वचेचं संरक्षण होते आणि त्वचा फ्रेश दिसते. याद्वारे त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत मिळते. व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू शकते, शिवाय सुरकुत्याही वाढू शकतात.
व्हिटॅमिन Eची कमतरता कशी भरून काढावी?
विटामिन Eची कमतरता भरून काढण्यासाठी डाएटमध्ये सुकामेवा, बिया, पालेभाज्या यासारख्या गोष्टींचा समावेश करावा. याव्यतिरिक्त व्हिटॅमिन E युक्त स्किन केअर प्रोडक्ट्स उदाहरणार्थ बदाम तेल, एरंडेल तेलही वापरू शकता.
(नक्की वाचा: Winter Skin Care: हिवाळ्यात नारळाचे तेल चेहऱ्यावर लावू शकतो का? त्वचेवर नारळ तेल लावल्यास काय होईल? डॉक्टरांनी सांगितली माहिती)
व्हिटॅमिन A (Vitamin A Deficiency)निरोगी त्वचेसाठी व्हिटॅमिन ए देखील अतिशय महत्त्वाचे आहे. व्हिटॅमिन A च्या कमतरतेमुळे त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात.
(नक्की वाचा: Hair Loss Remedies: केसगळतीमुळे हैराण? 1 चमचा तुपात हळद मिक्स करून लावल्यास काय होईल? जाणून घ्या 4 रामबाण उपाय)
व्हिटॅमिन Aची कमतरता कशी भरून काढावी?व्हिटॅमिन Aची कमतरता दूर करण्यासाठी गाजर, रताळं, पालक आणि पालेभाज्यांचा डाएटमध्ये समावेश करावा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

