डिजिटल फसवणुकीचे प्रकार वाढत असताना सर्वांनीच सावधगिरी बाळगणे आज गरजेचं बनलं आहे. आपल्या मोबाईल फोनद्वारे फसणूक होण्याची शक्यता जास्त असते. कारण हॅक करून डेटा हॅक केल्याचेही अनेक प्रकार समोर आले आहेत. अशात स्मार्टफोन हॅक झाल्यास मोठी आर्थिक किंवा खासगी माहितीची हानी होऊ शकते. त्यामुळे, तुमच्या फोनमध्ये हॅक झालाय का तपासणे आवश्यक आहे.
बॅटरी झपाट्याने कमी होणे किंवा फोन गरम होणे
जर तुमच्या फोनची बॅटरी सामान्य वेळेपेक्षा खूप लवकर संपत असेल किंवा तुमचा फोन जास्त गरम होत असेल, तर तो हॅक झाला असण्याची शक्यता आहे. कारण बॅकग्राउंडमध्ये हॅकर्सद्वारे ॲप्स किंवा स्पाईवेअर सतत ॲक्टिव्ह ठेवले जातात. यामुळे डेटा पाठवणे आणि प्राप्त करणे यांसारखी कामे सतत सुरू राहतात, ज्यामुळे बॅटरी लवकर संपते. अशावेळी बॅटरी सेटिंगमध्ये जाऊन कोणते अज्ञात ॲप्स जास्त पॉवर वापरत आहेत, हे तपासा.
(नक्की वाचा- Traffic Challans: ट्रॅफिक चलान 50% होईल माफ! सोपी कायदेशीर पद्धत ठरेल फायदेशीर)
डेटा आणि नेटवर्क ॲक्टिव्हिटीमध्ये अचानक वाढ
जर तुम्ही डेटा वापरत नसतानाही तुमच्या मोबाईल डेटाची खपत अचानक खूप वाढली असेल. तर शक्यता आहे की, हॅकर्स रिमोट ॲक्सेस टूल्सच्या माध्यमातून तुमचा फोन हॅक करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे तुमच्या नकळत डेटाची देवाणघेवाण सुरू राहते. यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन डेटा वापराचे मॉनिटरिंग करा. कोणतीही अज्ञात ॲप डेटा वापरत असल्याचे आढळल्यास फोन हॅक झाला असण्याची शक्यता आहे.
विचित्र पॉप-अप किंवा सेटिंग्जमध्ये बदल
तुमच्या स्क्रीनवर वारंवार जाहिरातींचे किंवा विचित्र पॉप-अप्स येत असतील किंवा तुम्हाला माहीत नसताना फोनच्या सेटिंग्जमध्ये बदल झालेला दिसल्यास सावध व्हा. ॲडवेअर किंवा धोकादायक सॉफ्टवेअर तुमच्या नकळत फोनमध्ये इन्स्टॉल झालेले असू शकते किंवा ते तुमच्या परवानग्यांमध्ये बदल करू शकते. अशावेळी फोनमध्ये कोणतेही अनोळखी ॲप इन्स्टॉल झाले आहे का, याची तपासणी करा आणि परवानग्यांमध्ये कोणताही बदल झाला असल्यास लगेच लक्ष द्या.
(नक्की वाचा- Social Media Rule: चीनचा ऐतिहासिक निर्णय! 'या' इन्फ्लुएन्सर्सच्या कंटेन्टवर येणार बंदी)
फोन स्लो होणे किंवा ॲप्स वारंवार थांबणे
जर तुमचा स्मार्टफोन अचानक स्लो झाला असेल, विचित्र पद्धतीने रीस्टार्ट होत असेल किंवा ॲप्स वारंवार क्रॅश होत असतील तर धोका ओळखा. मालवेअर किंवा हॅकरची ॲक्टिव्हिटी फोनच्या मेमरी आणि सीपीयूवर (CPU) जास्त दबाव आणते. अशावेळी नवीन काही इन्स्टॉल केल्यानंतर असे बदल दिसत असल्यास फोन हॅक होण्याची शक्यता जास्त आहे.
फोनमध्ये संशयास्पद ॲक्टिव्हिटी दिसणे
तुमच्या माहितीशिवाय तुमच्या नंबरवरून कोणाला मेसेज किंवा कॉल गेला असेल किंवा तुम्हाला माहीत नसलेल्या ठिकाणांहून तुमच्या ईमेल किंवा सोशल मीडिया अकाउंटमध्ये लॉगिन ॲक्टिव्हिटी आढळल्यास तुमचा फोन हॅक झालेला असू शकतो. याद्वारे हॅकर तुमचा फोन मालवेअर पसरवण्यासाठी किंवा तुमच्या अकाउंट्सचा ॲक्सेस मिळवण्यासाठी वापरू शकतात. अशावेळी तुम्ही तुमचे कॉल लॉग, मेसेज बॉक्स आणि ईमेल लॉगिन हिस्ट्री तपासा.
यापैकी कोणतेही गंभीर संकेत तुमच्या फोनमध्ये आढळल्यास, तुम्ही तुमचा फोन लगेच फॅक्टरी रिसेट करण्याचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचा विचार करू शकता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world