जाहिरात

Tea Best Recipe: चहा तयार करताना सर्वात आधी काय मिक्स करावे पावडर, साखर की दूध? 90% लोक करतात ही चूक

Tea Best Recipe: भारतामध्ये 90 टक्क्यांहून अधिक लोकांचे चहा हे आवडते पेय आहे. ही मंडळी दिवसभरात दोन ते तीन वेळा चहा पितात. पण चहा चुकीच्या पद्धतीने करतात.

Tea Best Recipe: चहा तयार करताना सर्वात आधी काय मिक्स करावे पावडर, साखर की दूध? 90% लोक करतात ही चूक
"Tea Recipe : चहा तयार करण्याची योग्य पद्धत"

Tea Best Recipe In Marathi: सकाळी उठल्यानंतर काही लोकांना सर्वात आधी गरमागरम चहा पिण्याची इच्छा होते. त्याशिवाय चहाप्रेमींना दिवसाची सुरुवात झाल्यासारखे वाटत नाही. काही लोकांना तर चहा पिण्यासाठी केवळ कारण लागते. भारत देशामध्ये चहा हे केवळ एक पेय नाहीय तर भावना आहे. काही लोकांच्या दिवसाची सुरुवात तसेच शेवटही चहा पिऊनच होते, तेही चहा चवीला चांगला असणं महत्त्वाचे आहे. तुम्ही कशा पद्धतीने चहा तयार करताय, यावर चहाची अवलंबून असते; हे तुम्हाला माहितीये का? म्हणजे चहा तयार करताना पाण्यामध्ये सर्वप्रथम चहा पावडर, साखर आणि दूध मिक्स करण्याची योग्य वेळच ठरवते की चहा परफेक्ट होणार की नाही? चला तर मग जाणून घेऊया चहा तयार करण्याची योग्य पद्धत...

परफेक्ट चहा तयार करण्यासाठी टिप्स (Why Making Perfect Tea is Important?)

बहुतांश लोकांना वाटतं की चहा तयार करणे अतिशय सोपे काम आहे. पाणी, दूध, चहा पावडर एकत्रित केले तर झाला चहा तयार, असा अनेकांचा समज आहे. पण चहा परफेक्ट पद्धतीने तयार करणं ही देखील एक कला आहे. जी सर्वांनाच जमते, असे नव्हे. योग्य पद्धत जाणून घेतल्यास चहाची चव, आरोग्य आणि मूडवर सकारात्मक परिणाम होतील. 

स्टेप 1: पाणी आणि पावडर (Step 1: Water And Tea Powder)

चहा तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवा. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये चहा पावडर मिक्स करा. पाच मिनिटे पाणी उकळू द्यावे. यानंतर तुम्हाला हवे असल्यास त्यामध्ये आले किंवा वेलची पावडर मिक्स करावी. यामुळे चहाची चव वाढण्यास मदत मिळेल. 

(नक्की वाचा: Tea Best Time: चहा पिण्याची सर्वात चांगली वेळ कोणती?)

स्टेप 2: साखर कधी मिक्स करावी? (Step 2: When to Add Sugar?)

काही लोक चहा तयार करताना पाण्यामध्ये दुधानंतर चहा मिक्स करतात. खरंतर चहा पावडरनंतर पाण्यात साखर मिक्स करावी आणि ती व्यवस्थित विरघळू द्यावी.    

स्टेप 3: दूध मिक्स करण्याची योग्य वेळ (Step 3: Right Time to Add Milk)

साखर विरघळल्यानंतर दूध मिक्स करावे. पाच मिनिटे चहा गॅसच्या मध्यम आचेवर गरम होऊ द्यावी. चहा तयार झाल्यानंतर गॅस बंद करा. हे आहे परफेक्ट चहाचे सीक्रेट.

(नक्की वाचा: Jaggery Tea Recipe : गुळाचा चहा कसा तयार करावा? मिळतील इतके फायदे)

चहा तयार करताना लोक कोणत्या चुका करतात? (Common Mistakes People Make)

काही लोक चहा तयार करताना सर्व गोष्टी एकत्रित मिक्स करतात. यामुळे चहाची चव बिघडते. 

जास्त वेळ चहा उकळणे: काहींना असे वाटतं की जास्त वेळ चहा उकळल्यास चव वाढते. पण यामुळे चहा कडू होतो आणि गॅस-अ‍ॅसिडिटीच्या समस्येचा सामना करावा लागतो. 

जास्त चहा पावडर मिक्स करणे: चहा कडक व्हावा म्हणून काही लोक जास्त चहा पावडर वापरतात. यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतात. 

आरोग्य आणि चहाचा काय संबंध? (Health & Tea Connection)

  • चहा योग्य पद्धतीने तयार केल्यास मूड चांगला होऊ शकते. 

  • चुकीच्या पद्धतीने तयार केल्यास अ‍ॅसिडिटी आणि गॅसची समस्या निर्माण होऊ शकते. 
  • त्यामुळे दूध, साखर आणि चहा पावडर समप्रमाणात ठेवा. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Listen to the latest songs, only on JioSaavn.com