
Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. संभाजीनगरमधील एका अकॅडमीच्या संचालकाने आपलाच प्रशिक्षणार्थी विद्यार्थी अमोल डख याचं अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेमप्रकरणात अडकलेल्या अकॅडमीच्या संचालकावर आपल्या प्रशिक्षणार्थीचं (Chhatrapati Sambhajinagar News) अपहरण करण्याची वेळ आली. या प्रकरणात आरोपी संचालकाला अटक करण्यात आली आहे. यामध्ये संचालकांसह आणखी तीन जणांचा समावेश आहे. या चौघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगरमधील हिंदवी करिअर अकॅडमीचा संचालक दशरथ जाधव याचं अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या एका मुलीवर प्रेम जडलं होतं. यासाठी त्याने विद्यार्थी अमोल डख याची मदत घेतली होती. मात्र आपला चुकीच्या पद्धतीने वापर केल्याचं अमोलच्या लक्षात येताच संचालक आणि त्याच्यामध्ये वाद झाला. यानंतर दशरथ यांनी अमोलला अकॅडमीमधून काढून टाकलं. मात्र अमोलकडे दशरथच्या प्रेमसंबंधाचे काही व्हॉइस रेकॉर्डिंग आणि पुरावे होते. तो आपलं बिंग फोडेल ही त्याला भीती होती. या भीतीने दशरथने अमोलचं अपहरण करण्याचं ठरवलं.
नक्की वाचा - Crime News : संभाजीनगरात MD विकणाऱ्या पेडलरच्या घरावर छापा; ड्रग्सऐवजी असं काही दिसलं की पोलिसही हैराण!
यासाठी दशरथने दोन मुलांची मदत घेतली. त्याने आधी अमोलला केळगाव घाटात बोलावल. येथे अमोलला मारहाण करून त्याच्याकडून सर्व पुरावे घेतले आणि त्याला कारमध्ये टाकून अपहरण केलं. त्याला सिल्लोडला घेऊन जाण्याचा प्लान होता. मात्र त्यादरम्यान एक ओळखीच्या व्यक्तीने अमोलला दशरथसोबत गाडीत पाहिलं. त्याने हा सर्व प्रकार अमोलच्या घरी सांगितला. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत अमोलची सुटका केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world