जाहिरात

Bank holiday today : आज बँका सुरू असतील की बंद? राज्य सरकारने अधिसूचनेत नेमकं काय म्हटलंय? गोंधळ करा दूर

Eid e milad 2025 holiday : महाराष्ट्र सरकारने 3 सप्टेंबर 2025 रोजी एक शासन निर्णय जाहीर केला होता. यामध्ये 5 सप्टेंबर रोजी दिल्या जाणाऱ्या ईद-ए-मिलादच्या सुट्टीत बदल करण्यात येणार असल्याचा उल्लेख होता.

Bank holiday today : आज बँका सुरू असतील की बंद? राज्य सरकारने अधिसूचनेत नेमकं काय म्हटलंय? गोंधळ करा दूर
आज सोमवारी बँका, स्टॉक मार्केत सुरू राहतील की बंद, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम

eid e milad 2025 holiday today 8 september : 5 सप्टेंबर रोजी असलेली ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी (Public holiday on Monday 8 September) सोमवारी 8 सप्टेंबरला दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. 

महाराष्ट्र सरकारने 3 सप्टेंबर 2025 रोजी एक शासन निर्णय जाहीर केला होता. यामध्ये 5 सप्टेंबर रोजी दिल्या जाणाऱ्या ईद-ए-मिलादच्या सुट्टीत बदल करण्यात येणार असल्याचा उल्लेख होता. या अधिसूचनेनुसार, शुक्रवार, 5 सप्टेंबर 2025 ची सार्वजनिक सुट्टी सोमवारी 8 सप्टेंबर, 2025 जोरी जाहीर करण्यात आली होती. 

Important news: 1 सप्टेंबरपासून बदलणार 'हे' नियम, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

नक्की वाचा - Important news: 1 सप्टेंबरपासून बदलणार 'हे' नियम, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

मुंबई आणि उपनगरासाठी सार्वजनिक सुट्टी

मात्र हा निर्णय केवळ मुंबई शहर आणि उपनगरासाठी देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील सर्व बँका आज सोमवारी, 8 सप्टेंबरला बंद राहतील. याशिवाय मुंबई शहर आणि उपनगरातील शाळा, कॉलेज बंद राहतील. 

स्टॉक मार्केट मुंबईत असतं तरी आज सोमवारी सुरू राहील. स्टॉक मार्केटच्या वार्षिक सुट्ट्यांच्या ईद-ए-मिलादची सुट्टी देण्यात आलेली नाही. त्यामुळे स्टॉक मार्केट मुंबईत असलं तरी त्यांच्यासाठी हा नियम लागू नसेल. 

बँका बंद राहतील

महाराष्ट्र सरकारने 8 सप्टेंबर 2025 रोजी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट, 1881 च्या कलम 25 नुसार सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यापूर्वी जाहीर केलेली 5 सप्टेंबर 2025 ची सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे. त्यानुसार, 8  सप्टेंबर, 2025 रोजी सरकारी रोखे, परकीय चलन, मनी मार्केट आणि रुपया व्याजदर डेरिव्हेटिव्ह्जमध्ये कोणतेही व्यवहार आणि सेटलमेंट होणार नाहीत, असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केलं आहे. 8 सप्टेंबर 2025  म्हणजेच  सोमवारी होणाऱ्या सर्व प्रलंबित व्यवहारांचे सेटलमेंट पुढील कामकाजाच्या दिवशी म्हणजेच 9 सप्टेंबर 2025 मंगळवारी होईल. 4 सप्टेंबर 2025 गुरुवारी झालेल्या भारत सरकारच्या दिनांकित रोख्यांच्या लिलावाचे सेटलमेंट 9 सप्टेंबर 2025 मंगळवारी होईल.

सप्टेंबर महिन्यात सार्वजनिक सुट्ट्या कधी असतील? 

सप्टेंबर 12, शुक्रवार - जम्मू आणि श्रीनगर, ईद-ए-मिलाद-उल-नबी

सप्टेंबर 22, सोमवार - नवरात्रौत्सव, घटस्थापनेसाठी जयपूर येथील बँका बंद असतील

सप्टेंबर 23, मंगळवार - जम्मू आणि श्रीनगर, महाराज हरी सिंग जन्मदिन

सप्टेंबर 29, सोमवार - आगरताळा, गंगटोक आणि कोलकाता - महासप्तमी, दुर्गा पूजा

सप्टेंबर 30, मंगळवार - आगरताळा, भुवनेश्वर, इम्पाळ, जयपूर, गुवाहाटी, कोलकाता, पाटना, रांची - महाअष्टमी-दुर्गाअष्टमी


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com