जाहिरात

Tulsi Vivah 2025 Muhurat: तुलसी विवाहचे 2 ते 5 नोव्हेंबरपर्यंतचे शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व जाणून घ्या

Tulsi Vivah 2025 Shubh Muhurat: तुळशीच्या लग्नाचे 2 नोव्हेंबरपासून ते 5 नोव्हेंबरपर्यंतचे शुभ मुहूर्त जाणून घ्या. तुमच्या शहरातील मुहूर्त वेळ वाचा एका क्लिकवर...

Tulsi Vivah 2025 Muhurat: तुलसी विवाहचे 2 ते 5 नोव्हेंबरपर्यंतचे शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व जाणून घ्या
"Tulsi Vivah 2025 Shubh Muhurat : तुळशीच्या विवाहाचे शुभ मुहूर्त जाणून घ्या"
Canva

Tulsi Vivah 2025 Shubh Muhurat: हिंदू धर्मामध्ये तुलसी विवाहचे विशेष धार्मिक महत्त्व आहे. कार्तिक महिन्यातील शुक्लपक्षाच्या द्वादशी तिथीला तुलसी विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. तुलसी मातेचा विवाह भगवान विष्णू यांचे प्रतीक मानले जाणाऱ्या शाळिग्रामसह लावले जाते. तुलसी विवाहच्या दिवशी विधीवत पूजा केल्यास घरामध्ये सुख-शांती-समृद्धी नांदते, असे म्हणतात. यंदा तुळशीचे लग्न कधी आहे? तिथी, शुभ मुहूर्त, पूजा विधी जाणून घेऊया...

तुलसी विवाह 2025 तिथी | तुळशीचे लग्न 2025 तिथी | Tulsi Vivah 2025 Tithi | Tulshiche Lagn 2025 Tithi 

कार्तिक शुक्ल पक्ष द्वादशी तिथी प्रारंभ : रविवारी 2 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 07:31 वाजता 
कार्तिक शुक्ल पक्ष द्वादशी तिथी प्रारंभ : सोमवार 3 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 05:07 वाजता
यानुसार 2 नोव्हेंबर 2025 रोजी तुलसी विवाह संपन्न केला जाईल. 

कार्तिकी द्वादशी तिथीपासून ते कार्तिक पौर्णिमा या काळादरम्यान तुळशीचा विवाह संध्याकाळी गोरज मुहूर्तावर साजरा केला जातो. त्यानुसार 2 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबरपर्यतचे मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुणे शहरातील शुभ मुहूर्त जाणून घेऊया...

तुलसी विवाह 2025 शुभ मुहूर्त | तुळशीचे लग्न 2025 शुभ मुहूर्त | Tulsi Vivah 2025 Shubh Muhurat | Tulshiche Lagn 2025 Shubh Muhurat  

मुंबई शहर तुलसी विवाह 2025 शुभ मुहूर्त | Mumbai City Tulsi Vivah 2025 Shubh Muhurat

  • 2 नोव्हेंबर 2025 गोधूलि मुहूर्त : संध्याकाळी 6.04 वाजेपासून ते संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत आहे.
  • 3 नोव्हेंबर 2025 गोधूलि मुहूर्त : संध्याकाळी 6.04 वाजेपासून ते संध्याकाळी 6.29 वाजेपर्यंत आहे.
  • 4 नोव्हेंबर 2025 गोधूलि मुहूर्त : संध्याकाळी 6.04 वाजेपासून ते संध्याकाळी 6.29 वाजेपर्यंत आहे.
  • 5 नोव्हेंबर 2025 गोधूलि मुहूर्त : संध्याकाळी 6.03 वाजेपासून ते संध्याकाळी 6.28 वाजेपर्यंत आहे. 

नवी मुंबई शहर तुलसी विवाह 2025 शुभ मुहूर्त | Navi Mumbai City Tulsi Vivah 2025 Shubh Muhurat

  • 2 नोव्हेंबर 2025 गोधूलि मुहूर्त : संध्याकाळी 6.04 वाजेपासून ते संध्याकाळी 6.29 वाजेपर्यंत आहे.
  • 3 नोव्हेंबर 2025 गोधूलि मुहूर्त : संध्याकाळी 6.04 वाजेपासून ते संध्याकाळी 6.29 वाजेपर्यंत आहे.
  • 4 नोव्हेंबर 2025 गोधूलि मुहूर्त : संध्याकाळी 6.03 वाजेपासून ते संध्याकाळी 6.28 वाजेपर्यंत आहे.
  • 5 नोव्हेंबर 2025 गोधूलि मुहूर्त : संध्याकाळी 6.03 वाजेपासून ते संध्याकाळी 6.28 वाजेपर्यंत आहे.

ठाणे शहर तुलसी विवाह 2025 शुभ मुहूर्त | Thane City Tulsi Vivah 2025 Shubh Muhurat

  • 2 नोव्हेंबर 2025 गोधूलि मुहूर्त : संध्याकाळी 6.04 वाजेपासून ते संध्याकाळी 6.29 वाजेपर्यंत आहे.
  • 3 नोव्हेंबर 2025 गोधूलि मुहूर्त : संध्याकाळी 6.04 वाजेपासून ते संध्याकाळी 6.29 वाजेपर्यंत आहे.
  • 4 नोव्हेंबर 2025 गोधूलि मुहूर्त : संध्याकाळी 6.03 वाजेपासून ते संध्याकाळी 6.28 वाजेपर्यंत आहे. 
  • 5 नोव्हेंबर 2025 गोधूलि मुहूर्त : संध्याकाळी 6.03 वाजेपासून ते संध्याकाळी 6.28 वाजेपर्यंत आहे. 

पुणे शहर तुलसी विवाह 2025 शुभ मुहूर्त | Pune City Tulsi Vivah 2025 Shubh Muhurat

  • 2 नोव्हेंबर 2025 गोधूलि मुहूर्त : संध्याकाळी 6.01 वाजेपासून ते संध्याकाळी 6.26 वाजेपर्यंत आहे. 
  • 3 नोव्हेंबर 2025 गोधूलि मुहूर्त : संध्याकाळी 6.01 वाजेपासून ते संध्याकाळी 6.26 वाजेपर्यंत आहे.
  • 4 नोव्हेंबर 2025 गोधूलि मुहूर्त : संध्याकाळी 6.00 वाजेपासून ते संध्याकाळी 6.26 वाजेपर्यंत आहे.
  • 5 नोव्हेंबर 2025 गोधूलि मुहूर्त : संध्याकाळी 6.00 वाजेपासून ते संध्याकाळी 6.25 वाजेपर्यंत आहे.

तुलसी विवाह पूजा विधी |  Tulsi Vivah 2025 Puja Vidhi

  • तुळशीच्या लग्नाच्या दिवशी घर स्वच्छ करावे. घराच्या प्रवेशद्वारासमोर रांगोळी काढावी. 
  • फुले, आंबाच्या डहाळ्यांच्या मदतीने सजावट करावी.  
  • तुळशीच्या रोपाची कुंडी गेरूनू रंगवून सुंदर सजावट करावी.  
  • सौभाग्य अलंकार, पूजा सामग्रीसह नव्या वस्त्राने तुळशीच्या रोपास नववधुप्रमाणे सजवावे.  
  • पाटावर तुळशीचे रोप ठेवावे, त्यासमोर रांगोळी काढावी. धूप-अगरबत्ती, दिवा प्रज्वलित करावे. 
  • तुळशीचे रोप आणि शाळिग्रामामध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टकं म्हणावी.
  • विवाह संपन्न झाल्यानंतर तुलसी माता आणि शाळिग्राम यांची पूजा-आरती-प्रार्थना करावी. 
  • प्रसादाचे वाटप करावे.  

Tulsi Vivah 2025 Shubh Muhurat: तुलसी विवाह तारीख, तिथी, मुहूर्त, पूजा विधी-सामग्री आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

(नक्की वाचा: Tulsi Vivah 2025 Shubh Muhurat: तुलसी विवाह तारीख, तिथी, मुहूर्त, पूजा विधी-सामग्री आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या)

तुलसी विवाहची विधीवत पूजा केल्यास कोणते लाभ मिळतात?
  • वैवाहिक जीवनात सुख-शांती येते. 
  • घरामध्ये सुख-समृद्धी येतो आणि आनंद निर्माण होतो. 
  • जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com