जाहिरात

Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला अशी करा भगवान विष्णुंची पूजा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Tulsi Niyam : वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पूजा करताना तुळशीच्या रोपाशी संबंधित या चुका केल्यास लक्ष्मीमाता नाराज होऊ शकते.

Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला अशी करा भगवान विष्णुंची पूजा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला भगवान विष्णुंची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णुंची विधिवत पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात, असे म्हणतात. पण या दिवशी विष्णुंना प्रिय असणाऱ्या तुळशी रोपाशी (Tulsi) संबंधित चुका केल्यास धनाची देवता लक्ष्मीमाता (Goddess Laxmi) नाराज होऊ शकते. त्यामुळे कटाक्षाने या चुका करणे टाळा.   

(नक्की वाचा: Vastu Tips: महालक्ष्मीचा आशीर्वाद हवाय? हे उपाय ठरतील फलदायी)

तुळशीला स्पर्श करणे टाळाणे

वैशाख पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस तुळशीची पूजा करताना रोपाला स्पर्श करणे टाळावे. यावेळेस तुळशीला स्पर्श केल्यास लक्ष्मीमाता नाराज होण्याची शक्यता असते.  

केस मोकळे न सोडणे 

मान्यतांनुसार, तुळशीच्या रोपाच्या पूजेदरम्यान महिलांनी केस मोकळे सोडण्याची चूक करू नये. पूजेदरम्यान महिलांनी केस मोकळे सोडल्यास माता लक्ष्मीचा कृपादृष्टी राहणार नाही, असे मानतात.

(नक्की वाचा: Tulsi Plant Rules: घरामध्ये तुळशीचे रोप असेल तर या गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल मोठे नुकसान)

हे काम काळजीपूर्वक करा

वैशाख पौर्णिमेला भगवान विष्णुंची पूजा करण्यासाठी तुळशीची पाने काळजीपूर्वक खुडली पाहिजे. एक दिवस आधीच पाने खुडून ठेवणे योग्य ठरेल. पाने खुडताना नखांचा वापरणे करणे टाळा. 

तुळशीभोवती घालावी प्रदक्षिणा

तुळशीची पूजा करून जल अर्पण केल्यानंतर रोपाभोवती तीन वेळा प्रदक्षिणा नक्की करावी.   

(नक्की वाचा: हनुमान चालीसाचे पठण करताना अजिबात करू नका या चुका, जाणून घ्या नियम)

स्वच्छता राखावी

तुळशीच्या रोपाजवळ नेहमी स्वच्छत राखावी. रोपाजवळील परिसर अस्वच्छ असल्यास लक्ष्मीमाता नाराज होऊ शकते. तसेच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये सात्विक खाद्यपदार्थ तयार करा आणि मांसाहार-मद्यपानापासून दूर राहा. 

भगवान विष्णुंना अर्पण करा तुळशीची माळ 

वैशाख पौर्णिमेला भगवान विष्णुंची पूजा करताना तुळशीची माळ अवश्य अर्पण करा. यासह तुळशीची माळ हातात घेऊन लक्ष्मीमातेच्या 'ऊं श्रीं ह्नीं क्लीं श्री सिद्ध लक्ष्म्यै नम:' या मंत्राचा जप करावा.

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

VIDEO: वैशाख पौर्णिमेनिमित्त पुण्याच्या दगडुशेठ गणपतीला शाहळ्यांची आरास

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com