Viral Video: गुलाबी साडी नेसून, पदर खोचून किचनमध्ये ऑक्टोपस शिजवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एका तरुणीकडे तिच्या बॉयफ्रेंडने भोजपुरी स्टाइल ऑक्टोपस डिश खाण्याची इच्छा व्यक्त केली. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बॉयफ्रेंड तिच्या गर्लफ्रेंडला विचारतो की, पौर्णिमा भोजपुरी स्टाइल ऑक्टोपस डिश तयार करशील का? यावर होकार देत, पदर खोचून तिने लगेचच रेसिपी तयार करण्यास सुरुवात केली. एवढा मोठा महाकाय ऑक्टोपस पाहून नेटकऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले.
झणझणीत ऑक्टोपस रेसिपी तयार करण्यासाठी देसी लुक | Bhojpuri Octopus Recipe Viral Video| Bhojpuri Octopus Recipe In Marathi
- व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता तिने मिठाच्या पाण्यामध्ये ऑक्टोपस स्वच्छ धुतले आणि पाण्यामध्ये शिजत ठेवले.
- यानंतर कांदे चिरले आणि पाट्यावर वरवंट्याने आले-लसूण वाटून त्याची पेस्ट तयार केली.
- शिजवलेल्या ऑक्टोपसचे तिने बारीक-बारीक तुकडे केले.
- आता दुसऱ्या भांड्यामध्ये चिरलेला कांदा, आले, काळी मिरी, जीरे, दगडफुले, वेलची, लवंग, धणे पाडवर, लाल तिखट मसाला, गरम मसाला, कसुरी मेथी, चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि ऑक्टोपसचे तुकडे एकत्रित घेतले.
- सर्व सामग्रीवर तेल आणि मीठ मिक्स केले आणि सामग्री व्यवस्थित एकजीव केली.
- यानंतर कुकरमध्ये तेल गरम करत ठेवले.
- तेलामध्ये लसूण, तेजपत्ता, बेडगी मिरची आधी ठेवली त्यानंतर मॅरीनेड केलेले ऑक्टोपस सर्व सामग्रीसह कुकरमध्ये शिजण्यास ठेवले.
- आवश्यकतेनुसार पाणी मिक्स केले. एका शिटीत भोजपुरी स्टाइल ऑक्टोपस रेसिपी तयार झाली.
- गरमागरम भोजपुरी ऑक्टोपस भातासोबत तिने बॉयफ्रेंडला खायला दिले.
भोजपुरी ऑक्टोपस रेसिपी व्हिडीओ | Watch Bhojpuri Octopus Recipe Video
There is something called Bhojpuri Octopus dish as well 💀
— Hindutva Knight (@HPhobiaWatch) November 5, 2025
Quite tempting pic.twitter.com/QUlw4rNAgo
(नक्की वाचा: Jemimah Rodrigues Dance Video: दिसते मी भारी...! जेमिमा रॉड्रिग्सने गुलाबी साडी या मराठी गाण्यावर मैदानात धरला ठेका)
सोशल मीडियावर झणझणीत ऑक्टोपस रेसिपी व्हिडीओचा धुमाकूळ (Octopus Curry India)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरील @HPhobiaWatch नावाच्या हँडलवर भोजपुरी ऑक्टोपस रेसिपी व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओन सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. रेसिपी पाहून नेटकऱ्यांच्याही तोंडाला पाणी सुटलंय.
(नक्की वाचा: Viral Video: जेवण करता-करता 18 वर्षांची मेहुणी बहिणीच्या 55 वर्षांच्या पतीच्या प्रेमात पडली, Love Storyचे काय आहे सत्य?)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

