जाहिरात

25व्या वर्षी अंगावर आले पांढरे डाग, हा आजार संसर्गजन्य? या समस्येपेक्षा लोकांचे वर्तन भयंकर? डॉक्टर म्हणाले...

Vitiligo Recovery: 25व्या वर्षी अंगावर पांढरे डाग आलेल्या देवीलाल यांची संघर्षमय कहाणी आणि व्हिटिलिगो (पांढरे डाग) या समस्येकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन. AIIMS च्या तज्ज्ञांच्या मते, ही समस्या वैद्यकीय नसून सामाजिक कशी आहे, याविषयी सविस्तर विश्लेषण.

25व्या वर्षी अंगावर आले पांढरे डाग, हा आजार संसर्गजन्य? या समस्येपेक्षा लोकांचे वर्तन भयंकर? डॉक्टर म्हणाले...
"Vitiligo Recovery: पांढऱ्या डागांसह देवीलाल यांनी कशी काढली 23 वर्ष"
Canva

Vitiligo Recovery: व्हिटिलिगो ही समस्या केवळ त्वचेपुरती मर्यादित न राहता व्यक्तीच्या आत्मविश्वासावर आणि सामाजिक जीवनावरही परिणाम करते. 48 वर्षांचे देवीलाल यांच्या जीवनावरही यामुळे नेमका काय परिणाम झाला, जाणून घेऊया.  48 वर्षांचे देवीलाल हे चमोली जिल्ह्यातील रामबगढचे रहिवासी आहेत. त्यांच्या शरीरावर वयाच्या 25 व्या वर्षी पांढरे डाग दिसू लागले होते. सुरुवातीला हे डाग खूप कमी प्रमाणात होते, पण वर्तमानपत्रात येणाऱ्या जाहिराती आणि एका बाबाच्या प्रभावाखाली येऊन त्यांनी काही औषधोपचार केले. यानंतर डाग कमी होण्याऐवजी आणखी वाढतच गेले.

देवीलाल यांनी सांगितलं, सुरुवातीच्या दिवसांत त्यांना स्वतःबाबत अतिशय वाईट वाटायचं. लोकांना भेटायला आणि त्यांच्यात मिसळायलाही संकोच वाटायचा. पण आता ते या परिस्थितीसोबत जगायला शिकले आहेत. जेव्हा कोणी तोंडावर याविषयी बोलते तेव्हा वाईट नक्कीच वाटते, पण पूर्वीसारखा आता मी यावर जास्त विचार करत नाही, असेही ते म्हणाले.

पांढऱ्या डागांपेक्षा लोकांचे वर्तन ही मोठी समस्या आहे का?

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV

पांढऱ्या डागांबाबत समाजात आजही अनेक गैरसमज पसरलेले आहेत. अनेक लोक याला संसर्गजन्य आजार समजतात. अशा वातावरणात संबंधित व्यक्ती त्वचेच्या समस्येसोबतच समाजाच्या प्रतिक्रिया आणि पूर्वग्रहांशीही सतत झगडत असते. देवीलाल यांच्या उदाहरणाचा विचार केला, तर 23 वर्षांनंतरही या परिस्थितीसोबत जगणाऱ्या व्यक्तीला एखाद्याच्या टिप्पणीमुळे वाईट वाटते. मग ही समस्या केवळ त्वचेपुरतीच मर्यादित आहे का?

हाच विषय समजून घेण्यासाठी आम्ही एम्स (AIIMS) बिलासपूर येथील मेडिकल सोशल वेलफेयर ऑफिसर रोहित गुप्ता यांच्याशी संवाद साधला.
 

रोहित गुप्ता यांचे म्हणणे आहे की, व्हिटिलिगो (पांढरे डाग) यासारख्या प्रकरणांमध्ये सर्वात मोठे आव्हान वैद्यकीय नसून सामाजिक असते. लोक काळासोबत स्वतःची परिस्थिती स्वीकारायला शिकतात, पण समाजाचे वर्तन त्यांच्या आत्मविश्वासाला आणि सामाजिक जीवनाला सतत प्रभावित करत राहते.

त्यांनी अमेरिकन समाजशास्त्रज्ञ चार्ल्स हॉर्टन कुली यांच्या लुकिंग ग्लास सेल्फ' (Looking Glass Self) सिद्धांताचाही उल्लेख केला आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर, हा सिद्धांत स्पष्ट करतो की, समाज आपल्याकडे ज्या नजरेने पाहतो, व्यक्ती अनेकदा स्वतःलाही त्याच नजरेने पाहू लागते. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे तिच्या त्वचेच्या रंगामुळे वारंवार वेगळ्या नजरेने पाहिले जाते किंवा त्यावर टिप्पण्या केल्या जातात, तेव्हा त्याचा थेट परिणाम तिच्या आत्मसन्मानावर होऊ शकतो.

रोहित गुप्ता यांनी पुढे दिव्यंगत्त्वाचे अभ्यासक माईक ऑलिव्हर यांच्या 'सोशल मॉडेल ऑफ डिसेबिलिटी' (Social Model of Disability) चा देखील उल्लेख केला. त्यांच्या मते, कोणत्याही व्यक्तीच्या अडचणींचे कारण केवळ तिची शारीरिक स्थिती नसते तर समाजात असलेले पूर्वग्रह आणि लोकांचे वर्तन देखील तिच्यासमोरील आव्हाने वाढवू शकतात.

(नक्की वाचा : Uric Acid Control Tips: 'मी फक्त डाळ खातो,तरीही युरिक अ‍ॅसिड का वाढतंय?' जाणून घ्या काय खावे आणि काय टाळावे)

रोहित यांचे म्हणणे आहे की, खरा बदल तेव्हाच येईल जेव्हा प्रभावित व्यक्ती आणि समाज, हे दोघेही मिळून आपल्या दृष्टिकोनात बदल करतील. वैज्ञानिक तथ्यांचा स्वीकार करून एखाद्या व्यक्तीचे मूल्यांकन तिच्या त्वचेच्या रंगावरून न करता तिचे व्यक्तिमत्त्व, क्षमता आणि योगदानाच्या आधारावर केले पाहिजे.

पद बदलले की दृष्टिकोनही बदलतो

रोहित गुप्ता यांनी आणखी एका महत्त्वाच्या मुद्याकडे लक्ष वेधले. समाजाचे वर्तन हे आजारावरून किंवा शारीरिक स्थितीवरून ठरत नसून व्यक्तीची सामाजिक ओळख आणि तिच्या पदावरूनही प्रभावित होते,असे ते म्हणाले.

जर एखादी व्यक्ती मोठ्या पदावर कार्यरत असेल किंवा समाजात प्रभावशाली मानली जात असेल, तर लोक तिच्या या परिस्थितीकडे वेगळ्या नजरेने पाहतात. याउलट एका सामान्य व्यक्तीला मात्र अधिक प्रश्न, टोमणे आणि पूर्वग्रहांचा सामना करावा लागतो. त्यांच्या मते, हेच दर्शवते की समस्या केवळ पांढरे डाग ही नाही; तर प्रश्न समाजाची मानसिकता आणि त्या आधारे होणाऱ्या वर्तनाचाही आहे.

(नक्की वाचा: Ayurveda Wheat Eating Rules: रोज गव्हाची पोळी खाताय? पीठ चाळताय? कोंडा फेकताय? मग डॉ. पै यांनी सांगितले आयुर्वेदाचे 3 नियम वाचाच)

रोहित गुप्ता यांनी सांगितले की, पांढऱ्या डागांविषयी समाजात जागरूकता वाढवण्याची गरज आहे. लोकांनी हे समजून घेतले पाहिजे कि हा कोणताही संसर्गजन्य (एकापासून दुसऱ्याला होणारा) आजार नाही. अशा लोकांपासून दूर राहणे किंवा त्यांना वेगळ्या नजरेने पाहणे याला कोणताही वैद्यकीय आधार नाही. त्यांच्या मते, हे कुटुंब, मित्र, शेजारी आणि समाजाच्या वर्तनावर अवलंबून असते की ते एखाद्या व्यक्तीचे जीवन सोपे करतात की कठीण.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com