Monotrophic Diet Plan : वजन वाढीच्या समस्येपासून तुम्हालाही सुटका हवीय का? यासाठी आपण एक रामबाण उपाय जाणून घेऊया... पटापट वेटलॉस करायचे असेल तर मोनोट्रोफिक डाएट प्लान फॉलो करू शकता. विराट कोहली, अनुष्का शर्मा, दिशा पाटनी यासारखे सेलिब्रिटी देखील हा प्लान फॉलो करतात. मोनोट्रोफिक डाएट प्लानमध्ये तुम्हाला एकाच पद्धतीचे खाद्यपदार्थ सलग काही दिवस किंवा काही आठवडे खावे लागते. अशा पद्धतीचे डाएट फॉलो केल्यास वजन झटपट कमी होण्यास मदत मिळू शकते. यामध्ये तुम्ही मायक्रो न्युट्रिएंट्सचाही (Micro Nutrients) सहजरित्या समावेश करू शकता. या डाएट प्लानचे आणखी काय वैशिष्ट्य आहे, हे देखील सविस्तर जाणून घेऊया...
(नक्की वाचा : Weight Loss Drinks : पोट काही दिवसांत जाईल आत, प्या फक्त हे ड्रिंक्स)
मोनो डाएट म्हणजे काय? (What is Mono Diet)
मोनो डाएट प्लानमध्येही कित्येक प्रकार आहेत. ज्यामध्ये सफरचंद, बटाटे, अंडी, फळे, भाज्या यासारख्या सामान्य पदार्थांचा समावेश केला जातो. पण तुम्हाला हवे असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वेगवेगळ्या पदार्थाचाही समावेश करू शकता. काही लोक एक आठवडा किंवा दोन आठवडे हा डाएट प्लान फॉलो करतात.
(नक्की वाचा : वजन पटापट कमी करायचंय? या पांढऱ्या गोष्टी खाणे आजच करा बंद)
मोनोट्रोफिक आहारामुळे मिळणारे लाभ (Benefits Of Monotrophic Diet)
- मोनो डाएट प्लान फॉलो केल्यास शरीराचे वजन कमी होण्यास मदत मिळते.
- तसेच जंक फुड, फास्ट फुडचे सेवन कमी होण्यास मदत मिळते.
- वारंवार भूक लागण्याची समस्याही कमी होऊ शकते.
(नक्की वाचा : Weight Loss Tips: वजन पटकन कमी करायचंय? प्या हा चहा)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )