जाहिरात

Changes From 1st January 2026 : नवीन वर्षात काय बदलणार? शेतकऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर होणार मोठा परिणाम

येत्या वर्षभरात बँक, वेतन, सोशल मीडिया, इंधन, सरकारी योजना याच्यात मोठे बदल होणं अपेक्षित आहे. याचा थेट परिणाम नागरिकांवर होणार आहे. 

Changes From 1st January 2026 : नवीन वर्षात काय बदलणार? शेतकऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर होणार मोठा परिणाम

२०२६ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. नवी वर्षात नवं प्लानिंग केलं जातं. अनेक क्षेत्रांमध्ये सुधारणेसाठी हा बदल केला जातो. त्यामुळे गोंधळ टाळण्यासाठी १ जानेवारीपासून होणारे बदल तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. येत्या वर्षभरात बँक, वेतन, सोशल मीडिया, इंधन, सरकारी योजना याच्यात मोठे बदल होणं अपेक्षित आहे. याचा थेट परिणाम नागरिकांवर होणार आहे. 

१ जानेवारी २०२६ पासून होणारे बदल...

१ १ जानेवारी २०२६ पासून ८ वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. महागाई भत्त्यात वाढ होण्याची अपेक्षा असून केंद्रासह काही राज्यांमध्ये किमान वेतनवाढ होईल असं सांगितलं जातं. 

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे बदल...

२ उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांचे युनिक आयडी तयार केले जात आहे. ज्याच्या माध्यमातून पंतप्रधान पीक विमान योजनेत हफ्ता घेण्यासाठी आवश्यक असेल. याशिवाय खात्यात पैसे येणार नाही. दुसरीकडे पीएम शेतकरी पीक विमा योजनेअंतर्गत आता प्राण्यांनी पीक उद्ध्वस्त केलं असेल तर शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली जाईल. नुकसान झाल्याच्या पुढील ७२ तासांच्या आत रिपोर्ट दाखल करणं आवश्यक असेल. 

Weight Loss : 1 किलो फॅट बर्न करण्यासाठी दररोज किती चालावं? तज्ज्ञांनी दिला जबरदस्त फॉर्म्युला

नक्की वाचा - Weight Loss : 1 किलो फॅट बर्न करण्यासाठी दररोज किती चालावं? तज्ज्ञांनी दिला जबरदस्त फॉर्म्युला

सर्वसामान्यांसाठी काय बदलेल? 

3 जानेवारीपासून इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा नवा फॉर्म जारी करण्यात येऊ शकतो. ज्यामध्ये तुमचे बँकिंग आणि खर्चाचे तपशील आधीच भरलेले असतील. १ जानेवारीपासून एलपीजी म्हणजे स्वयंपाकघरातील गॅस आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या नवी किमती लागू होतील. 

४ १ जानेवारीपासून हवाई इंधनाच्या किमतीत बदल होईल, ज्यामुळे विमानाच्या तिकिटांवर परिणाम होईल. 

क्रेडिट कार्डावरील सुविधांवर परिणाम..

५ आयसीआयसीआय बँकेच्या इन्स्टंट प्लॅटिनम कार्डावर बुक माय शोद्वारे मिळणाऱ्या मोफत चित्रपटांचा लाभ १ फेब्रुवारी २०२६ पासून बंद होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

६ पॅन-आधार लिंक करणे १ जानेवारीपासून अनिवार्य असणार आहे. लिंक न केल्यास बँकिंग आणि सरकारी सेवा बंद होण्याची शक्यता आहे. 

कोणत्या सुविधा महागणार? 

7 पेटीएम, अॅमेझॉन, मोबिक्लिक यांसारख्या थर्ड पार्टी अॅप्सवर ५ हजारांपेक्षा जास्त रक्कम पाठविल्यास १ टक्का शुल्क लागेल. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com